अमळनेर येथील पेट्रोलपंपाजवळ मोटर सायकलचा कट मारल्यामुळे सारबेटा येथे तुफान हाणामारी..

अमळनेर येथील पेट्रोलपंपाजवळ मोटर सायकलचा कट मारल्यामुळे सारबेटा येथे तुफान हाणामारी..

अमळनेर. ll दि.२९ऑक्टोबर २०२४ ll (रिजवान मन्यार):- अमळनेर तालुक्यातील सुमारे 3 ते 4 दिवसापूर्वी सारबेटा येथील रहेवाशी अमळनेर पेट्रोलपंपाजवळ फैजलखान शफीकखा मेवाती याने गुलताज खा हनिफ खा मेवाती याना मोटर सायकलचा कट मारल्यामुळे सदर ठिकाणी त्याच्यात आपसात वाद झाले गुलताजखा हनिफ खा होते. सदर झालेला वाद हा त्यांनी मनात ठेवलेला होता व त्यावेळी फैजलखा यांने गुलताजखा यांना जिवे मारण्याची धमकी दिली होती.

सविस्तर वृत्त असे की,दि. २६ ऑक्टोबर रोजी बस स्टॅन्डजवळ गुलताजखा हनीफखा मेवाती हे उभे असतांना सदर वेळी ताहीर अब्दुल रहेमान खान मेवाती याने माझे वडील यांना शिविगाळ केली त्यावेळी सदर ठिकाणी असलमखा गुलामनबी मेवाती,अक्रमखा गुलाबनबी मेवाती,फरीदखा गुलामनबी मेवाती,मशीदखा मस्तानखा मेवाती,फैजलखा शफिकखा मेवाती,ताहेर अ. रहेमान मेवाती,कादरखा गुलामनबी मेवाती,सरफराज गुलाम हुसैन मेवाती, समीरखा गुलाम हुसैन मेवाती,आजमखा गुलामनबी मेवाती,बरिदखा मस्तानखा मेवाती,कदामद अब्दुल रहेमान मेवाती व इतर असे जमा झाले व शिविगाळ करुन लाथाबुक्कांनी मारहाण करु लागले.

सदर ठिकाणी त्याच्या गाडीतुन लोखंडी पाने, टॉमी, रॉड असे काढुन डोक्यावर लोखंडी रॉड मारला,तसेच आमचावर दगडफेक केला व पाठीवर, दंडावर, हातापायाना गंभीर दुखापत करुन, शिवागाळ केले व जिवे ठान मारण्याची प्रयत्न केला सदर भांडण चालु असतांना गावातील रहिवासीनी भांडण सोडला व जखमीना उचलुन खाजगी वाहनात टाकुन ग्रामिण रुग्णालय अमळनेर येथे औषधउपचारासाठी दाखल केले. नाजिमखान याने दिलेल्या फिर्यादी नुसार अमळनेर पोलिसांत गुन्ह्याची नोंद करण्यात आला. पुढील तपास रामकृष्ण कुमावत हे करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Call Us