निजामपूर पोलीसांचा विधानसभा निवडणुकीसाठी रूट मार्च; सुरक्षिततेचे आश्वासन…
निजामपूर/साक्री ||दि.३०ऑक्टोंबर २०२४|| (परवेज सय्यद ): दि.३० बुधवार रोजी निजामपूर पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये धुळे जिल्हा पोलीस अधिक्षक मा.श्रीकांत धिवरे यांच्या आदेशाप्रमाणे साक्री विधानसभा मतदारसंघात निवडणूक शांततेत पार पडावी व मतदारांनी सुरक्षितरित्या मतदानासाठी बाहेर पडावे आणी मतदान कालावधीत कुठलाही अनुचित प्रकार घडणार नाही या उद्देशाने शहरात रूट मार्चचे आयोजन केले होते.
हा रूट मार्च पोलीस स्टेशन येथून आखाडे रोड मार्गे , मेंडपाळ चौक, सावता चौक ,बाजारपेठ गुजरी, गांधी चौक, भोई गल्ली, एकलव्य चौक, गुरव गल्ली, साक्री रोड, निजामपूर बस स्टॅन्ड, खुडाणे चौफुली या रस्त्यांवरून करण्यात आला. रूट मार्चच्या प्रारंभाला केंद्र सरकारच्या वतीने आलेले सीआरपीफचे सेकंड फोर्स चे असिस्टंट कमांडर हंसराज व त्यांच्या फोर्स च्या जवानांचे औपचारिक स्वागत झाले.नंतर उपस्थित जवानांनी मार्चला प्रारंभ केला.
या मार्चमध्ये विभागीय पोलीस अधिकारी संजय बांबळे यांच्या नेतृत्वाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक मयूर भामरे ,पोलीस उप निरीक्षक प्रदीप सोनवणे , पोलीस उप निरीक्षक भामरे , गोपनीय शाखेचे पृथविराज शिंदे , परमेश्वर चव्हाण,सुनील अहिरे,आखाडे, गौतम अहिरे असे एकूण १५ ते २० अधिकारी व कर्मचाऱ्यांचा सहभाग होता तसेच सीआरपीफ चे जवानसह असे एकूण ७० ते ८० कर्मचारी सहभागी होते.
या वेळी सहायक पोलीस अधिकारी श्री मयूर भामरे यांनी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील नागरिकांनी कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवावी व प्रशासनाला सहकार्य करून सुरक्षित भावनेने मतदान करावे असे आवाहन करण्यात आले.