मुक्ताईनगर तालुक्यात स्वीपअंतर्गत मतदार रॅली व मतदार जनजागृती
मुक्ताईनगर || दि.३०ऑक्टोंबर २०२४ || {मुक्ताईनगर प्रतिनिधी कैलास कोळी}-: येत्या विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुक्ताईनगर तालुक्यात विविध शाळांमार्फत तसेच ग्रामपंचायत मार्फत मतदार रॅली काढण्यात आली.व घरोघर जाऊन मतदारांची जनजागृती करण्यात आली. सोबतच भ्रमणध्वनीवर मतदाराचा मतदान यादीतील क्रमांक कसा शोधावा ? याविषयी सुद्धा मार्गदर्शन करण्यात आले.
सदरचे मार्गदर्शनगट शिक्षणाधिकारी तथा स्वीप नोडल अधिकारी मदन मोरे यांनी केले. विशेष म्हणजे वरिष्ठ कार्यालयाकडून सूचना प्राप्त झाल्यानंतर सुट्टीच्या कालावधीत सुद्धा तालुक्यातील शाळांमध्ये मतदार जनजागृती बाबत प्रभात फेरी काढण्यात आली.
यात घरोघर जाऊन मतदारांना मतदानाचा हक्क बजावणे बाबत गट शिक्षणाधिकारी तथा स्वीप नोडल अधिकारी मदन मोरे यांनी महत्त्व पटवून दिले. त्यासोबतच मुक्ताईनगर येथील गट साधन केंद्रात मतदार जागृती बाबत सामूहिक शपथ घेण्यात आली.
याप्रसंगी गट शिक्षणाधिकारी तथा नोडल अधिकारी एम.व्ही.मोरे, विषय तज्ञ महेंद्र मालवेकर, विषय तज्ञ योगेश भोसले, विषय तज्ञ भगवान कांबळे, केंद्रप्रमुख धनलाल भोई, वरिष्ठ लेखा मधुकर सैतवाल, समावेशित शिक्षण तज्ञ विनोद कोळी फिरते विशेष शिक्षक, भूषण सोनवणे तसेच मोहन हिरटकर आदींची उपस्थिती होती.