निजामपुर पोलीस स्टेशन हद्दीत दोन जुगार अड्यावर छापा रोख रक्क्म, मोबाईल, मोटार सायकल सह एकुण अडीच लाख रुपये चा मुद्देमाल जप्त…
धुळे/निजामपुर || दि.३१ ऑक्टोंबर || (सैय्यद परवेज):- दिनांक ३०/१०/२०२४ रोजी मा. प्रभारी अधिकारी मयुर भामरे सहाय्यक पोलीस निरीक्षक, निजामपुर पोलीस स्टेशन यांना गुप्त् बातमीदारामार्फत बातमी मिळली की, निजामपुर पोलीस स्टेशन हद्दीत आखाडे व भडगाव गावात काही इसम जुगाराचा खेळ खेळवित व खेळत आहेत
सदर ठिकाणी छापा मारुन कारवाई करणेबाबत निजामपुर पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक, मधुकर सोमासे, पोहेकॉ मोरे, पोहेकॉ आखाडे, पोना पवार, पोकॉ वाघ, पोकॉ वसावे, पोकॉ चव्हाण, पोकॉ अहीरे, चालक पोकॉ माळी अशांना आदेशीत झाल्याने सदर पथकाने भडगाव गावात सार्वजनीक शौचालयाचे पुढे झोपडीचे आडोश्याला सार्व जागी.
दिनांक ३०/१०/२०२४ रोजी २३.३० वा. छापा मारला तसेच आखाडे गावातील फोफादे रोड लगत पीर बाबाच्या दर्गाजवळ एका बंद घराच्या आडोश्याला सार्व.जागी. दिनांक ३१/१०/२०२४ रोजी ०१.१५ वा. छापा मारला असला सदर ठिकाणी १० इसम नामे- निजामपुर पोलीस स्टेशन गुरन ३१८ / २०२४ महाराष्ट्र जुगार प्रतीबंध कायदा कलम १२ (अ) प्रमाणे दाखल गुन्ह्यातील आरोपी नामे दादाभाई दाजभाऊ बागुल वय – ३६ वर्षे, राहुल शिवदास राठोड वय २५ वर्षे, दगडु वंजी महाले वय ३० वर्षे सर्व रा. भडगाव ता. साक्री जि.धुळे, सदर आरोपीतांकडुन रोख रक्कम, मोबाईल, मोटार सायकल सह एकुण १,३०,६५०/- रुपये तसेच
२) निजामपुर पोलीस स्टेशन गुरन ३१९ / २०२४ महाराष्ट्र जुगार प्रतीबंध कायदा कलम १२ (अ) प्रमाणे दाखल गुन्ह्यातील आरोपी नामे
१) समाधान ब्रिजलाल कापडे, वय ३५ वर्षे,
२) राजधर दाजभाऊ पिंपळे, वय ४१ वर्षे,
३) गणेश मोतीलाल सोनवणे, वय-२७ वर्षे,
४) भुषण लक्ष्मण ठाकरे, वय – ३२ वर्षे,
५) शरद चुनिलाल ठाकरे, वय – ३३ वर्षे,
६) शशिकांत रमेश वेंडाईत, वय २५ वर्षे,
७) भुषण गोरख ठाकुर, वय-२३ वर्षे, सर्व रा. आखाडे ता. साक्री जि.धुळे,
सदर आरोपीतांकडुन रोख रक्कम, मोबाईल, मोटार सायकल सह एकुण १,२४,५००/- रुपये असे एकुण- २,५५,१५०/- रुपये मुद्देमाल पोलीसांनी जप्त केला आहे.
सदरची कारवाई श्रीकांत धिवरे, पोलीस अधीक्षक, धुळे, किशोर काळे, अपर पोलीस अधिक्षक, धुळे, मा. एस. आर. बांबळे, उपविभागीय पोलीस अधीकारी, साक्री, यांचे मार्गदर्शनाखाली निजामपुर पोलीस स्टेशनचे प्रभारी अधीकारी सपोनि मयुर भामरे, पोउनि प्रदिप सोनवणे, पोउनि यशवंत भामरे, पोउनि मधुकर , पोहेकॉ मोरे, पोहेकॉ आखाडे, पोना पवार, पोकॉ वाघ, पोकॉ वसावे, पोकों चव्हाण,पोकॉ अहीरे, पोकॉ पृथ्वीराज शिंदे, चालक पोकॉ माळी यांचे पथकाने केली आहे.