वाहनामध्ये गॅस भरीत असताना गॅसचा स्फोट दोन वाहने जळून खाक; दहा जण जखमी…
जळगाव || दि.०५ नोव्हेंबर २०२४ || {प्रतिनिधी विठ्ठल भालेराव}-: जळगाव शहरातील नॅशनल हायवे वरती असलेले इच्छादेवी चौकात चारचाकी वाहनामध्ये घरगुती गॅस भरत असताना अचानक गॅस सिलेंडरचा स्फोट झाल्याने उभी असलेली चारचाकी वाहनासह एक दुचाकी जळून खाक झाले असून जवळच उभे असलेले व वाहनात बसलेले एकुण १० जण गंभीर भाजले गेल्याची घटना आज रोजी सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास घडली आहे. जखमींना तातडीने जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले. दरम्यान दोन अग्निशमन बंबाच्या मदतीने ही आग आटोक्यात आणण्यात आली.
सविस्तर माहिती अशी की माहिती अशी की, जळगाव
शहरातील इच्छादेवी चौकातील एमआयडीसी पोलीस चौकीच्या बाजूला असलेल्या एका पत्राच्या शेडमध्ये वाहनांमध्ये घरगुती गॅस भरत असताना अचानकपणे गॅस सिलेंडरचा स्फोट झाल्याने भीषण आग लागली.
या आगीत एकुण १० जण गंभीररित्या भाजले गेले तर चारचाकी वाहन क्रमांक (एमएच १५ बीएक्स २८१२ आणि
एका दुचाकीने पेट घेतल्याने दोन्ही वाहने जळून खाक झाली आहे. दरम्यान या घटनेची माहिती मिळाल्यानंतर जळगाव महानगरपालिकेचे दोन अग्निशमन बंब घटनास्थळी दाखल झाले व ही आग आटोक्यात आणण्यात आली, या भीषण आगीत भाजले गेलेल्या जखमींना तातडीने (जळगाव जिल्हा शासकीय रुग्णालय) शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
पोलीस पुढील तपास करीत असून ही आग कशामुळे कोणत्या कारणाने लागलेली आहे याचा तपास एमआयडीसी पोलीस करीत आहे.