अमळनेर मतदारसंघातील राजपूत समाज सदैव मराठा समाजासोबतच राजपुत समाजाचा कुणीही स्वार्थासाठी वापर ठरू नये; प्रकाश भीमसिंग पाटील…

अमळनेर मतदारसंघातील राजपूत समाज सदैव मराठा समाजासोबतच राजपुत समाजाचा कुणीही स्वार्थासाठी वापर ठरू नये; प्रकाश भीमसिंग पाटील…

अमळनेर || ०५ नोव्हेंबर २०२४ || (रिजवान मन्यार):- विधानसभा मतदारसंघातील समस्त राजपूत समाज नेहमीच मराठा समाजसोबत राहिला असून आमचे नाते कायम घट्टच आहे,मात्र निवडणुकीत कुणीही स्वार्थासाठी समाजाचा वापर ठरू नये,कुणी केल्यास समाज त्यांचे समर्थन कधीही करणार नाही असा इशारा आटाळे गावचे माजी सरपंच तथा राजपुत एकता मंचचे सदस्य प्रकाश भीमसिंग पाटील (सदाबापू)यांनी दिला आहे.

यासंदर्भात दिलेल्या पत्रकात त्यांनी म्हटले आहे की अमळनेर तालुका तसेच मतदारसंघात गेल्या अनेक वर्षांपासून अनेक गावांत राजपुत समाज प्रस्थापित असून मराठा समाजाप्रमाणेच शेती हा आमचा मुख्य व्यवसाय आहे.ज्या ज्या गावात राजपुत समाज असेल तेथील मराठा व इतर समाजाशी कौटुंबिक असे नाते प्रत्येकाचे निर्माण झाले आहे.

असे असताना निवडणुकीच्या मैदानात असलेली काही मंडळी राजपुत समाज आमच्या सोबत असून मराठा समाजसोबत नाही हे दर्शविण्यासाठी काहींचे माथे भडकवून अतिशय खालच्या स्तरावरील प्रकार करीत आहेत.परंतु असले प्रकार योग्य नसून विनाकारण जातीय तेढ निर्माण करण्याचा हा प्रयत्न आहे.

राजपुत समाज अश्या निंदनीय प्रकारचे कधीही समर्थन करणार नाही,राजपुत समाजाच्या एका गावात जो प्रकार घडला, तो कुणीतरी वैयक्तिक स्वार्थापोटी घडविला असावा राजपुत समाज मात्र मराठा समाजसोबतच राहील असेल प्रकाश पाटील यांनी म्हटले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Call Us