रामानंद नगर पोलीसांनी गावठी कट्ट्यासह दहशत माजविणाऱ्या गुंडास केले जेरबंद…..
जळगाव || दि.१४ नोव्हेंबर २०२४ || {प्रतिनिधी शाहिद खान}-: रामानंद नगर पोलीस स्टेशन हद्दितील गिरणा टाकी परीसर कंपाऊंडजवळ एक इसम इसम संशयास्पदरित्या फिरत असल्याचे रामानंद नगर पोलीस स्टेशन चे प्रभारी अधिकारी पोलीस निरीक्षक राजेंद्र गुंजाळ यांना गुप्त बातमी मिळाल्या वरुन सदर बातमी वरुन रामानंद नगर पोलीस स्टेशनचे सहा. पोलीस निरीक्षक विठ्ठल पाटील, सफौ / संजय सपकाळे, पोहेकॉ/इरफान मलिक, पोहेकॉ / सुशिल चौधरी, पोहेकॉ /जितेंद्र राजपुत, पोहेकॉ / जितेंद्र राठोड, पोना /
हेमंत कळसकर, पोना/रेवानंद साळुखे, पोना/विनोंद सुर्यवंशी, पोशि/रविंद्र चौधरी, पोशि/ उमेश पवार पोशि/जुलालसिंग परदेशी अशांनी सदर परिसरात जावुन सापडा रचुन त्याठिकाणी गावठी कट्ट्यासह दहशत माजविणाऱ्या गुंडास ताब्यात घेतले.

त्याचे नाव शुभम ऊर्फ मणी दिनेश अहिरे वय-27 वर्षे रा. प्लॉट नं 02 सिध्दार्थ हौसींग सोसायटी, हरिविठ्ठल नगर जळगाव असे असल्याचे त्याने सांगितल्या वरुन त्याचेवर यापुर्वीही वेगवेगळया स्वरुपाचे गुन्हे दाखल असुन सदर इसमहा सराईत गुन्हेगार असुन त्याचे ताब्यातुन घटनास्थळा वरुन एक 20,000/- रु किंचे गावठी बनावटीचे लोखंडी पिस्टल हस्तगत करुन त्यास रामानंद नगर पोलीस स्टेशन येथे आणुन त्याचेवर कायद्याचा वचक रहावा व भिती रहावी तसेच त्याच्या हातुन सामान्य लोकांच्या जिवीतास नुकसान होऊ नये याकरीता त्याचे वर शस्त्र अधिनियम 1959 चे कलम 3,25 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असुन आरोपीतास अटक करण्यात आली आहे. सदर गुन्हयाचा पुढील तपास सपोनि /विठ्ठल पाटील, हे करीत आहेत.