जळगाव || दि.२० नोव्हेंबर २०२४ || {प्रतिनिधी विठ्ठल भालेराव}-: जळगाव शहरातील दूध फेडरेशन भागातील राजमालती नगरामध्ये जुन्यावादा च्या कारणातून दोन गटांमध्ये तुफान हाणामारी झाली आहे. यात सिद्धार्थ वानखेडे नामक तरुणाला बेदम मारहाण करण्यात आली. त्यात त्याचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना आज रोजी सकाळी ६ वाजता घडली आहे.
घटनेनंतर शासकीय रुग्णालयात देखील एका तरुणाला बेदम मारहाण करण्यात आली त्यात तो तरुण गंभीर रित्या जखमी झाला असुन त्यावरती औषधोपचार सुरू आहे.
या घटनेत पाच जण गंभीर जखमी झाले असून जळगाव शहर पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून या घटनेचा तपास पोलीस करीत आहेत. या घटनेनंतर शासकीय रुग्णालयात पोलिसांचा चोख बंदोबस्त ठेवण्यात आले आहे.
सिद्धार्थ माणिक वानखेडे (वय ३६ रा.राज मालती नगर, जळगाव) असे मयत मयत झालेले तरुणाचे नाव आहे. त्या तरुणाच्या पश्चात आई, पत्नी, मुले असा परिवार आहे. मजुरी काम करून तो परिवाराचा उदरनिर्वाह करीत होता. दरम्यान, आज दि २० नोव्हेंबर रोजी मतदानाच्या दिवशी बुधवारी जळगाव शहरातील दूध फेडरेशन भागात दोन गटांमध्ये पूर्ववैमनस्यातून आज सकाळी वाद झाले.
त्या वादातून दोन गटात तुफान हाणामारी झाल्याची घटना आज बुधवारी २० नोव्हेंबर रोजी सकाळी घडली. त्यामध्ये सिद्धार्थ माणिक वानखेडे यांच्या छातीवर आठ ते दहा जणांनी लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केल्यामुळे त्याचा मृत्यू झालेला आहे. यामध्ये विशाल अजय सुरवाडे (वय-२८), जानू संजू पटेल (वय-२०), फैजान राजू पटेल (वय-२४) आणि मेहमूद हाजी बिस्मिल्ला पटेल (वय-४२, सर्व रा. राजमालती नगर) हे सर्व जण जखमी झाले असून त्यांचे वरती शासकीय जिल्हा रुग्णालयामध्ये औषधोपचार सुरू आहे.
जखमींना तातडीने शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारासाठी दाखल केले असून त्यांचे वरती औषधोपचार सुरू आहे. या प्रकरणातील ७ ते ८ जणांना जळगाव शहर पोलिसांनी ताब्यात घेतले त्यांची चौकशी सुरू आहे.
अशी माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी यांनी दिली आहे.
यासंदर्भात शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे. दरम्यान दुसरीकडे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात देखील अजय पांडुरंग सुरवाडे (वय ४५) यांला बेदम मारहाण करण्यात आली. काही लोकांनी सोडवासोडव करून त्यांना रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे.
यामुळे या घटनेत ५ जण गंभीर जखमी झाले आहे. पोलिसांना घटनेची माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी व जळगाव जिल्हा रुग्णालय येथे डीवायएसपी संदीप गावित, पोलीस निरीक्षक अनिल भवारी, शनिपेठचे निरीक्षक रंगनाथ धारबळे यांच्यासह स्टाफ रुग्णालयात दाखल झाले आहे.
पुढील उपचार जखमी झालेल्यान वरती जिल्हा रुग्णालय येथे सुरू आहे. जळगाव शहर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू असून या घटनेत अजून कोण कोण आरोपी आहेत त्यांचा सुद्धा पोलीस तपास करीत आहे.