रामानंद पोलिसांची दहशत माजविणारा ३ आरोपींवर कारवाई…
जळगाव || दि.२७ नोव्हेंबर २०२४ || {प्रतिनिधी – विठ्ठल भालेराव} -: गावठी कट्ट्यासह दहशत मजविनाऱ्या 3 आरोपींना रामानंद पोलिसांनी केली अटक जळगाव रामानंद पोलिस स्टेशन हद्दीत पिंप्राळा हुळको दूध फेडरेशन येथे ३ संशयित फिरत असल्याचे रामानंद पोलिस स्टेशन प्रभारी पोलिस निरीक्षक राजेंद्र गुंजाळ यांना गुप्त बातमी मिळाली.
सदर बातमी वरून रामानंद पोलिस स्टेशनचे सहाय्यक पोलिस निरीक्षक विठ्ठल पाटील, सफो संजय सपकाळे, पोहेकॉ इरफान मलिक, सुनील चौधरी, जितेंद्र राजपूत,जितेंद्र राठोड, पोना हेमंत कळसकर, रेवानंद साळुंखे, विनोद सूर्यवंशी, रविंद्र चौधरी, पोशि उमेश पवार, जुलालशिंग परदेशी या सर्वांनी परिसर सापळा रचून त्याठिकाणी दहशत मजविणाऱ्या ३ गुंडास ताब्यात घेतले असता त्यांचे नाव १) कल्पेश ( प्रबुद्ध ) गुलाब सपकाळे वय -21 रा पिंप्राळा हूडको दूध फेडरेशन जळगांव , २) गौरव समाधान सोनवणे वय -21 रा गलॅक्सी कॉलनी प्लॉट नो 25 गुजराल पेट्रोल पंपमागे जळगांव, ३) लिलाधर देविदास कोळी वय -35 रा ह मु हिरशिवा कॉलनी खोटेनगर जळगांव मू पो मुंगसे सवखेडा अमळनेर असे असून यापुर्वीही वेगवेगळ्या स्वरूपाचे गुन्हे दाखल असून सदर एसम ही सराईत गुन्हेगार असून त्याच्या ताब्यातून घटना स्तळाहून एकूण ७५००० रु किमतीचे गावठी बनावटीचे ३ लोखंडी पिस्टल ३ जिवंत काडतुसा सह हस्तगत करून त्यांच्यावर रामानंद पोलिस स्टेशन येथे भारतीय शस्त्र अधिनियम 1959 चे कलम 3,25 प्रमाणे गुन्हा दाखल केला असून आरोपींना अटक करण्यात आली आहे.
सदर गुन्ह्याचा पुढील तपास सपोनि विठ्ठल पाटील करीत आहेत. आरोपींच्या हातून सामान्य जनतेच्या जीवितास व मलमत्तेस नुकसान होवू नये याकरिता मा पोलिस अधिक्षक श्री डॉ महेश्वर रेड्डी , मा अप्पर पोलीस अधिक्षक अशोक नखाते, मा उपविभागीय पोलिस अधिकारी श्री संदीप गावीत यांच्या मार्गदर्शनाने सदर कार्यवाही पोलिस निरीक्षक राजेंद्र गुंजाळ, सहाय्यक पोलिस निरीक्षक विठ्ठल पाटील , साफो संजय सपकाळे , पोहेको इरफान मलिक, सुशील चौधरी, जितेंद्र राजपूत,जितेंद्र राठोड, पोना हेमंत कळसकर, रेवानंद साळुंखे,विनोद सूर्यवंशी, पोशि रवींद्र चौधरी ,उमेश पवार , जुलालाशिंग परदेशी यांनी पार पडली.