सुझलॉन कंपनीचे कॉपर विक्रीचे बहाण्याने दरोडा घालणा-या दरोडेखोरांना २४ तासात अटक..
धुळे/निजामपुर || दि.२७ नोव्हेंबर २०२४ || {सैय्यद परवेज}:- २३ नोव्हेंबर रोजी दुपारी ०२.०० वाजेच्या सुमारास सोहेल उमेदखान पठाण वय २५ वर्षे रा. खुंटेपाडा ता. शेवगाव, जि. अहिल्यानगर यांचेकडुन निजामपुर पोलीस स्टेशन हद्दीतील जामदा गाव शिवारात सुझलॉन कंपनीमधे गुंतवणुकीचे नावाखाली ३०,०००/- रुपये रोख रक्कम व दोन मोबाईल असे त्यांना काठीने मारहाण करुन तसेच चाकुचा धाक दाखवुन लुटले त्यावरुन त्यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन निजामपुर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला होता.
सदर गुन्हा गंभीर स्वरुपाचा असल्याने सदर घटनेचे गांभीर्य लक्षात घेवुन निजामपुर पोलीस स्टेशनचे प्रभारी मयुर एस. भामरे, सहा.पोलीस निरीक्षक यांनी लागलीच निजामपुर पोलीस स्टेशन येथील पोलीस उप-निरीक्षक प्रदीप पंडीत सोनवणे, पोलीस उप-निरीक्षक मधुकर एल. सोमासे,पोलीस उप-निरीक्षक यशवंत आर.भामरे, पोहेकॉ माळचे, पोहेको नागेश सोनवणे, पोकॉ सागर थाटशिंगारे, पोकॉ प्रवीण दामु पवार, पोकॉ जयवंत राजेंद्र वाघ यांचे पथक बनविले व पथकास सदरचे गुन्ह्यातील आरोपीतांचा शोध घेण्याबाबत आदेशीत केल्याने पोलीस पथकाने अथक परिश्रम घेवुन गुप्तबातमीदारामार्फत माहीती काढुन निजामपुर पोलीस स्टेशन येथे दाखल गुन्ह्यातील संशयीत आरोपी १ ) सचिन चक्कर चव्हाण, २ ) मगन बच्चन चव्हाण दोन्ही रा.जामदा ता. साक्री जि. धुळे यांना गुन्हा घडल्याचा २४ तासाच्या आत अटक करण्यात आली आहे.
तसेच त्यांना तिन दिवसाच्या पोलीस कोठडी दरम्यान त्यांचे कडुन मोबाईल व इतर मुद्देमाल व गुन्ह्यात वापरलेले हत्यार हस्तगत करुन त्यांचे इतर साथीदारांचा तपास सुरु आहे.
तसेच सुझलॉन कंपनीचे नावाखाली स्वस्त दरात कॉपर केबल वायर,सोने चांदी, नाणे, कंपनीत गुतवणुक करुन अवघ्या काही दिवसात पैसे डबल असल्या आमिषाला बळी पडु नये बाबत निजामपुर पोलीसांतर्फे नागरीकांना आवाहन करण्यात येत आहे.
सदरची कारवाई श्रीकांत धिवरे, पोलीस अधीक्षक, धुळे, किशोर काळे, अपर पोलीस अधिक्षक, धुळे, एस.आर.बांबळे, उपविभागीय पोलीस अधीकारी, साक्री, यांचे मार्गदर्शनाखाली निजामपुर पोलीस स्टेशनचे प्रभारी अधीकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक मयुर भामरे,पोलीस उप निरीक्षक प्रदिप सोनवणे, मधुकर सोमासे, यशवंत आर.भामरे, पोलीस हेड कॉन्स्टेबल माळचे, नागेश सोनवणे, सागर थाटशिंगारे, यांचे
पथकाने केली आहे.