निवडणूक दरम्यान जळगाव शहर विधानसभा अपक्ष उमेदवार शेख अहमद शेख हुसेन याचे घरावर बनावट गोळीबार उघडकीस…

निवडणूक दरम्यान जळगाव शहर विधानसभा अपक्ष उमेदवार शेख अहमद शेख हुसेन याचे घरावर बनावट गोळीबार उघडकीस…

जळगाव || दि.०९ डिसेंबर २०२४ || (प्रतिनिधी विठ्ठल भालेराव)-: दि.18/11/2024 जळगांव शहर विधानसभा निवडणूकीतील अपक्ष उमेवार शेख अहमद शेख हुसेन गुलाम हुसेन हे राहत असलेल्या जिदान अपार्टमेंट सदाशिव नगर, शेरा चौक, जळगांव हे राहत असलेल्या घरावर सकाळी 04/00 वाजेच्या सुमारास मोटार सायकलवरील दोन अज्ञात इसमांनी गोळाबार केला होता. म्हणुन सदर बाबतीत अहमद शेख यांनी दिलेल्या फिर्याद वरुन दोन अज्ञात इसमाविरुध्द् गुन्हा दाखल करण्यात आलेला होता,

सदर गुन्हा दाखल झाले नंतर दि.05/12/2024 रोजी स्था.गु. शाखा जळगांव पथकाने इरफान अहेमद मोहम्मद हुसेन, दरेगांव ता. मालेगांव यास ताब्यात घेतले होते त्यांचे चौकशी करता त्याने सदरचा गुन्हा हा अहमद हुसेन याचा शालक व त्याचा मित्र मोहम्मद शफीक शेख अहमद उर्फ बाबा रा.मालेगांव यांचे सोबत केल्याचे कबुल करुन त्याने व मोहम्मद शफीक बाबा याने मालेगांव येथुन मोटार सायकलवर येवुन शफीक याने त्याचे मेहुने अपक्ष उमेदवार शेख अहमद शेख हुसेन यांचे घरावर 3 राऊंड फायर केल्याचे कबुल केले होते व सदर फायरिंग करण्या करण्याचा कट हा अपक्ष उमेदवार शेख अहमद शेख हुसेन व त्यांचा मुलगा शेख शिबान फाईज अहमद हुसेन व दुसरा मुलगा शेख उमर फारुख अहमद हुसने तसेच इरफान अहमद मोहम्मद हुसेन रा.मालेगाव व शरिफ उर्फ बाबा रा.मालेगांव अंशानी रचुन फायरिंग केली व तसा बनाव रचले बाबत सांगीतले होते.

त्याप्रमाणे दि.05/12/2024 रोजी 1) शेख अहमद शेख हुसेन (अपक्ष उमेदवार) (2) शिबान फाईज अहमद हुसेन रा. जळगांव (3) इरफान अहमद मोहम्मद हुसेन रा. मालेगांव यांना अटक करण्यात आली होती व त्यांची दि. 10/12/2024 रोजी पोलीस कस्टडी रिमांड होती सदर फायरिंग करणारा मोहम्मद शफीक शेख अहमद उर्फ बाबा व शेख उमर फारुख अहमद हुसेन हे दोघे पसार झाले होते त्यांचा शोध सुरु होता त्यादरम्यान ते दि.08/12/2024 रोजी मालेगांव येथे आले असल्याबाबतची माहिती मा. वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. बबन आव्हाड सो. यांना मिळाली होती त्याप्रमाणे स्था.गु. शाखा पथकाने मालेगांव येथुन त्या दोघांना ताब्यात घेतले होते व त्या दोघांना सदर गुन्ह्यात अटक करुन अटक मुदतीत त्यांचे कडुन गुन्ह्यात वापरलेली मोटार सायकल व गावठी कट्टा हस्तगत करण्यात आला होता त्यांना आज रोजी न्यायालयात हजर केले असता दि.10/12/2024 पावेतो पोलीस कस्टडी रिमांड दिलेली आहे. व सरकार तर्फे अॅड. स्वाती निकम यांनी कामकाज पाहिले आहे.

सदर कारवाई ही मा. पोलीस अधीक्षक श्री. महेश्वर रेड्डी सो. मा.अपर पोलीस अधीक्षक श्री. अशोक नखाते सो. मा. उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. संदीप गावीत सो., मा. वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. बबन आव्हाड सो. पोउनि. दत्तात्रय पोटे, सफौ/विजयसिंग पाटील, सफौ. अतुल वंजारी, पोहवा/अक्रम शेख, हरिलाल पाटील, राहुल पाटील, ईश्वर पाटील, चालक भरत पाटील अंशानी केलेली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Call Us