महाराष्ट्र विविध विधायक कार्य समिती संचलित नॅशनल गर्ल्स हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय नंदुरबार ची समशेरपूर येथे साखर कारखान्यास भेट…
नंदुरबार || दि.०५ जानेवारी २०२५ || (फिरोज खान) :- नंदुरबार येथील महाराष्ट्र विविध विधायक कार्य समिती संचलित नॅशनल गर्ल्स अँड ज्युनिअर कॉलेज च्या विद्यार्थिनींनी समशेरपूर येथे साखरखान्यास भेट देऊन साखर निर्मितीची प्रक्रिया जाणून घेतली.
रोजच्या आहारात साखरेचा वेगवेगळया पदार्थामध्ये उपयोग होत असतो याचा निर्मिती उद्योग कसा होतो, याची माहिती व्हावी या उद्देशाने भूगोल शिक्षक खान फ़हीम सर मुख्याध्यापक शेख अल्ताफ़ सर, मोहसिन सर यांच्या पुढाकाराने साखर कारखाना भेटीचे नियोजन करण्यात आले होते.
या अभ्यास दौऱ्यात विद्यार्थिनींनी साखर कारखाना चालवण्यासाठी भव्य जागा, या शिवाय मोठमोठ्या मशिनरी पाहून साखर निर्मिती ची प्रक्रिया जाणून घेताना गाळप प्रोसेस पाहून रस गरम करण्याची प्रक्रिया,साखर निर्मिती होऊन गोडाऊन पर्यंतचा सर्व प्रवास
माळी व्ही. एस. साहेब (कॅन डेव्हलपमेंट ऑफिसर)
जयसिंग पाटील ( चीफ केमिस्ट)
गोविंद भगत (लेबर ऑफिसर)
अरविंद पाटिल (चीफ अग्री ऑफिसर) यांनी प्रत्यक्षरीत्या दाखविला.
सहलीसाठी क़ाज़ी निकहत मॅडम,इनामदार अब्दुर्रब सर, सैय्यद ज़ैद सर, अल्ताफ़ रज़ी सर, पर्यवेक्षक कुरैशी अब्दुल रहीम सर,प्राध्यापक पठान सोहेल सर, क्रीड़ा शिक्षक शेख असलम सर, खाटिक नीलोफर मॅडम, आरिफ़ भैय्या, नाज़िम भैय्या यांनी विशेष परिश्रम घेतले.