सिंहस्थ कुंभमेळा 2026-27 प्रकाशा येथे पूर्वतयारीस प्रारंभ
नंदुरबार दि ९ फेब्रुवारी ( फिरोज खान ) :-
प्रकाशा येथे होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळा 2026-27 च्या आयोजनाच्या अनुषंगाने गौतमेश्र्वर मंदिर, प्रकाशा येथे जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांच्या उपस्थितीत स्थळ निरीक्षण करण्यात आले.
कुंभमेळ्याच्या प्रभावी व्यवस्थापनासाठी आवश्यक पायाभूत सुविधांची पाहणी व नियोजनासाठी हे निरीक्षण करण्यात आले.
उपस्थित मान्यवर…
शहादा तहसिलदार दीपक गिरासे
माजी जि.प. उपाध्यक्ष रामचंद्र दशरथ पाटील
सरपंच राजनंदिनी भील
ग्राम महसूल अधिकारी डी. एम. चौधरी सिंहस्थ पर्वणी कार्यकर्ते सतीषचंद्र चौधरी, प्रशांत पाटील, मनोज पाटील, पवन चौधरी
पत्रकार – नरेंद्र गुरव, विजय जैन, भटू वडीले, राजू साळी ग्राम विस्तार अधिकारी बी. जी. पाटील
प्रकाशा ग्रामस्थ
सिंहस्थ कुंभमेळा 2026-27 च्या आयोजनासाठी महत्त्वाची तयारी सुरू:
पायाभूत सुविधा उभारणी व नियोजन
रस्ते आणि वाहतूक व्यवस्थापन
पार्किंग आणि गर्दी नियंत्रण उपाययोजना
स्वच्छता आणि पाणीपुरवठा सुविधा
आरोग्य सेवा आणि आपत्कालीन मदत व्यवस्था
सुरक्षा आणि कायदा-सुव्यवस्था नियोजन
भाविकांसाठी निवास व आवश्यक सुविधा
प्रशासन आणि स्थानिक स्वराज्य संस्थांचा समन्वय साधून, भाविकांसाठी उत्तम व्यवस्था निर्माण करण्याचा संकल्प आहे.
भाविकांच्या सोयीसाठी प्रशासन कटिबद्ध!
सिंहस्थ पर्वणी 2026-27 साठी प्रकाशा सज्ज!