सण उत्सवात ध्वनिक्षेपक वापरास वर्षभरात १५ दिवस असेल विशेष सवलत !
नंदुरबार, दिनांक १७ फेब्रुवारी २०२५ ( फिरोज खान )
जिल्ह्यात ध्वनी प्रदूषण (नियमन व नियंत्रण) नियम, २०१७ नुसार रात्री १० ते सकाळी ६ या वेळेत ध्वनिक्षेपक वापरण्यास बंदी आहे.
मात्र, जिल्ह्यातील नागरिकांच्या धार्मिक, पारंपरिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी जिल्हादंडाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांनी या वर्षात १५ दिवसांसाठी रात्री १२ वाजेपर्यंत ध्वनिक्षेपक वापरण्यास विशेष परवानगी दिली आहे.
अधिक माहितीसाठी आदेशाची प्रत खाली संलग्न आहे.

