जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांची परीक्षा केंद्राला भेट
नंदुरबार दि. १७ फेब्रुवारी ( फिरोज खान )
आज जिल्हाधिकारी, नंदुरबार डॉ. मित्ताली सेठी यांनी उच्च माध्यमिक शालांत परीक्षा (१२ वी) दरम्यान भौतिकशास्त्र विषयाच्या पेपरावेळी नंदुरबार शहरातील एकलव्य विद्यालयास भेट देऊन पाहणी केली.
विद्यार्थ्यांसाठी शांत व सुरळीत परीक्षा वातावरण आहे याची खात्री करण्यासाठी त्यांनी संपूर्ण केंद्राची तपासणी केली.
परीक्षा प्रक्रियेबाबत शिक्षक व विद्यार्थ्यांशी संवाद साधत त्यांना आत्मविश्वास दिला

