मदरसा आधुनिकीकरण योजनेसाठी मुदतवाढ!
नंदुरबार दि. १८ फेब्रुवारी ( फिरोज खान ) :-
राज्यातील मदरसांच्या आधुनिकीकरणासाठी सुरू असलेल्या ‘डॉ. झाकीर हुसेन मदरसा आधुनिकीकरण योजने’ अंतर्गत अनुदानासाठी अर्ज करण्याची मुदत 22 फेब्रुवारी 2025 पर्यंत वाढविण्यात आली आहे!
योजनेचा उद्देश:
मदरसांचे आधुनिकीकरण
विद्यार्थ्यांसाठी दर्जेदार शिक्षणाची संधी
राज्यातील सर्व नोंदणीकृत मदरसांना लाभ
अर्ज कोठे सादर करायचा?
जिल्हा नियोजन समिती, जिल्हाधिकारी कार्यालय, नंदुरबार
