साडे आठ वर्षाच्या मोहंमद पठाण याने रमजान च्या महिनेभराचे रोजा ( उपास ) केले पूर्ण

साडे आठ वर्षाच्या मोहंमद पठाण याने रमजान च्या महिनेभराचे रोजा ( उपास ) केले पूर्ण

नंदुरबार दि .३१ मार्च ( फिरोज खान )

नंदुरबार शहरातील चिराग अली मोहल्ला भागात राहणाऱ्या मोहंमद खान माजीद खान पठाण या साडे आठ वर्षीय बालकाने रमजानच्या महिन्याभराचे रोजे ( उपास ) पूर्ण केले आहे त्यामुळे त्याचे परिसरात कौतुक केले जात आहे

शहरातील मंडपाचे व्यावसायिक माजीद खान हमीद खान पठाण यांचा मुलगा मोहंमद खान या चिमुकल्याने रमजानचे महिन्याभराचे रोजे ( उपास ) पूर्ण केले आहे

त्याचे वय फक्त साडे वर्ष आहे लहान वयातच रोजे ठेवणे हे त्याचे धार्मिक शिक्षणाचे आणि आध्यात्मिक जगाकडे झुकाव दर्शवते

रमजान हा इस्लाम धर्मातील एक पवित्र महिना आहे रमजान हा इस्लामिक कॅलेंडरचा नववा महिना आहे ज्यामध्ये मुस्लिम समुदायाचे लोक सूर्योदया पासून सूर्यास्ता पर्यंत काही न खाता पाण्याचा थेंब देखील न घेता रोजा ( उपवास ) करतात

हा महिना आत्मशुध्दी प्रार्थना आणि समुदायाच्या एकात्मेतेचा असतो .लहान मुलांना सहसा पूर्ण रोजा ठेवण्याची अपेक्षा केली हात नाही

परंतु मोहंमद खान या चिमुकल्याने साडे आठ वर्षांच्या वयात महिनेभराचे रोजे पूर्ण केले आहे .हे त्याच्या धार्मिक आणि आध्यात्मिक प्रगतीचे प्रतीक आहे

त्याच्या कुटुंबीयांसाठी हा अत्यंत आनंदाचा क्षण आहे .एवढ्या कमी वयात त्याने वाढत असलेल्या उन्हाच्या तडाख्यात पूर्ण केलेले रोजे ( उपास ) मुळे त्याचे परिवारात व परिसरात कौतुक होत आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Call Us