किरकोळ कारणावरुन जातिवाचक शिवीगाळ व मारहाण करणा-या आरोपींना सत्र न्यायालयाकडून 3 वर्षे कारावास व 6,500/- रुपये दंड..!
नंदुरबार दि.२३ एप्रिल ( फिरोज खान ):-
नंदुरबार शहर पोलीस ठाण्याचे हद्दीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक येथे राहणारे फिर्यादी हे दि. 17/11/2020 रोजी रात्रीचे सुमारास घरी अभ्यास करीत असतांना त्यांचे घराजवळ फटाके फोडण्याचा आवाज आला.
त्यावेळी घरात झोपेत असलेली त्यांची आई हीस जाग येऊन ती घराबाहेर आली व फटाके फोडणा-या इसमांना समजावत होती त्यावेळी फिर्यादी हे देखील घराबाहेर आले व त्यांचे घराचे मागे राहणारे अल्लाबक्ष बागवान, जावेद, आकीब बागवान, नदीम बागवान असे घराबाहेर उभे असलेले त्यांना दिसले.
त्यांना फिर्यादी व त्यांची आई यांनी येथे फटाके फोडू नका असे सांगितल्याचा सदर इसमांना राग आला व त्यांनी फिर्यादी तसेच त्यांचे आई वडील यांना जातिवाचक शिवीगाळ करुन जबर मारहाण केली होती.
त्याअन्वये नंदुरबार शहर पोलीस ठाणे येथे गु.र.नं. 1486/2020 भा.द.वि. कलम 324,323,504,34,452 सह अनुसुचित जाती जमाती कायदा कलम 3(1)(r)(s), 3(2) (5अ) प्रमाणे दि. 18/11/2020 रोजी गुन्हा दाखल करण्यात आला होता.
गुन्हयाचा तपास तत्कालीन नंदुरबार उपविभागीय पोलीस अधिकारी. सचिन हिरे यांनी केला असुन त्यामध्ये त्यांनी अत्यंत शास्त्रोक्त पध्द्तीने तपास करीत महत्वाचे पुरावे जमा केले होते.
तसेच गुन्हा दाखल झ पाल्यानंतर आरोपी यांचे विरुध्द् मुदतीत दोषारोपपत्र मा. प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश, नंदुरबार यांचे न्यायालयात दाखल केले होते.
सदर खटल्याची सुनावणी मा. अति. जिल्हा व सत्र न्यायाधीश, नंदुरबार यांचे समक्ष झाली असुन खटल्यामध्ये सरकार पक्षाचे वतीने साक्षीदार तपासण्यात आले.
त्यात प्रत्यक्षदर्शी साक्षीदार, पंच व तपास अधिकारी यांच्या साक्ष महत्वाच्या ठरल्या आहेत. यावरुन आरोपीविरुध्द गुन्हा सिध्द झाल्याने मा. अति. जिल्हा व सत्र न्यायाधीश, नंदुरबार यांनी आरोपी क्रमांक 1. अल्लाबक्ष मेहमुद बागवान 2. जावेद इस्माईल बागवान 3.अकीब इस्माईल बागवान 4. नदीम युसुफ बागवान, सर्व रा. बागवान गल्ली, नंदुरबार यांना वर नमुद कायदयांन्वये दोषी ठरवत प्रत्येकी तीन वर्ष कारावास आणि 6,500/- रुपये प्रत्येकी अशी दंडाची शिक्षा ठोठावली आहे.
सदर खटल्याचे कामकाज सरकारी पक्षाचे वतीने अति. सरकारी अभियोक्ता अॅड. तुषार कपाडीया यांनी काम पाहिले होते. तसेच पैरवी अधिकारी पोउपनि सागर नांद्रे, पैरवी अंमलदार पोहेकॉ/170 नितीन साबळे व पंकज बिरारे, राजेंद्र गावीत, शैलेंद्र जाधव यांनी कामकाज पाहीले आहे.
तपास अधिकारी व त्यांचे पथक तसेच अति. सरकारी अभियोक्ता यांचे नंदुरबार जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्रवण दत्त. एस, अपर पोलीस अधीक्षक. आशित कांबळे, उप विभागीय पोलीस अधिकारी, नंदुरबार. संजय महाजन यांनी अभिनंदन केले आहे.