धुळे चाळीसगाव रोड पोलीस स्टेशनची कामगिरी; बनावट नोटासह आरोपीतास अटक..
धुळे || दि.24 मे 2025 || {प्रशांत कोलते} -: काल दुपारी 2.30 वाजेचे सुमारास पोलीस निरिक्षक सुरेशकुमार घुसर यांना चाळीसगाव रोड पो.स्टे हद्दीतील 80 फुटी रोड वरील लोकमान्य पेट्रोलपंप मँनेजर मोसीन शेख यांनी फोनव्दारे संपर्क साधुन बातमी दिली की, एक इसम हा दिनांक 22/05/2025 रोजी आमचे पेट्रोलपंपवर पेट्रोल भरून 500/- दराच्या बनावट नोटा देवुन निघुन गेला होता तोच व्यक्ती आज पुन्हा पेट्रोल भरण्यासाठी पेट्रोलपंपावर आला असुन अशा प्राप्त माहीती वरून पोलीस निरिक्षक सुरेशकुमार घुसर यांनी तात्काळ सदर बातमीची खात्री करणे दोन शासकीय पंचासमक्ष पोलीस स्टेशनचे गुन्हे शोध पथकासह 15.23 वाजेचे सुमारास पेट्रोलपंप मँनेजर यांनी दिलेल्या माहीती प्रमाणे नमुद इसम यास पकडुन त्यास त्याचे नाव गाव विचारले असता त्याने त्याचे नाव नासीर अब्दुल शेख, वय 41 वर्षे, रा. गफुर नगर, काझी प्लाट, वडजाई रोड, धुळे याचे ताब्यात 500/- रू दराच्या बनावट मिळुन आल्याने त्यास ताब्यात घेवुन विचारपुस करून सदर बनावट नोटा ह्या त्याचा साथीदार संतोष शरद चौधरी, वय 48 वर्षे, रा. अमर नगर, मनोहर टाँकज पाठीमागे, धुळे याचे कडुन घेतल्याने त्यास देखील ताब्यात घेवुन पोकाँ/ 434 अभिलेश बोरसे यांनी सरकार तर्फे फिर्यादी होवुन चाळीसगाव रोड पोलीस स्टेशन येथे गु.र.नं. 117/2025 भारतीय न्याय संहिता कलम 179, 180 प्रमाणे गुन्हा दाखल करून वरील दोन्ही आरोपीतांना अटक करण्यात आली.गुन्हयातील आरोपीतांनकडुन खालील वर्णनाचे बनावट नोटा मिळुन आल्या.1) 1000 /- रूपये किंमतीच्या भारतीय चलनाचे 500/- रू किंमतीच्या दोन बनावट नोटा त्याचा सिरीयल क्र. 8EG3131112) 1000 /- रूपये किंमतीच्या भारतीय चलनाचे 500/- रू किंमतीच्या दोन बनावट नोटा त्याचा सिरीयल क्र. 8EG313123) 1000 /- रूपये किंमतीच्या भारतीय चलनाचे 500/- रू किंमतीच्या दोन बनावट नोटा त्याचा सिरीयल क्र. 8EG3131134) 500/- रूपये किंमतीच्या भारतीय चलनाचे 500/- रू किंमतीची एक बनावट नोट त्याचा सिरीयल क्र. 8EG3131145) 1,500/- रूपये किंमतीच्या भारतीय चलनाचे 500/- रू किंमतीच्या तीन बनावट नोट त्याचा सिरीयल क्र. 8EG3131156) 1,500/- रूपये किंमतीच्या भारतीय चलनाचे 500 /- रू किंमतीच्या तीन बनावट नोट त्याचा सिरीयल क्र. 8EG3131167) 1000/- रूपये किंमतीच्या भारतीय चलनाचे 500/- रू किंमतीच्या दोन बनावट नोट त्याचा सिरीयल क्र. 8EG3131178) 15,000/- रूपये किंमतीच्या भारतीय चलनाचे 500/- रू किंमतीच्या तीन बनावट नोट त्याचा सिरीयल क्र. 8EG3131189) 500/- रूपये किंमतीच्या भारतीय चलनाचे 500/- रू किंमतीची एक बनावट नोट त्याचा सिरीयल क्र. 8EG31931310) 500 /- रूपये किंमतीच्या भारतीय चलनाचे 500/- रू किंमतीची एक बनावट नोट त्याचा सिरीयल क्र. 8EG319314एकुण 10,000/- रूपये किंमतीचे बनावट नोटासदरची कामगीरी मा. पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, मा. अपर पोलीस अधीक्षक किशोर काळे, मा. उपविभागीय पोलीस अधिकारी धुळे शहर, विभाग धुळे राजकुमार उपासे यांचे मार्गदर्शनाखाली चाळीसगाव रोड पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी पोलीस निरिक्षक सुरेशकुमार घुसर, पोउपनि / शरद लेंडे, पोउपनि / हरिश्चंद्र पाटील, पोहेकाँ / 30 सुनिल पाथरवट, 1120 अविनाश वाघ, पोकाँ/575 सिराज खाटीक, पोकाँ/ 301 विनोद पाठक, पोकाँ/ 1085 अतिक शेख, पोकाँ/ 434 अभिलेश बोरसे, पोकाँ/ 1480 देवेंद्र तायडे, यांनी केली आहे.
