बनावट बिलांच्या आधारे शासनाची शेकडो कोटीं GST ची लुट; रॅकेटमध्ये कर्मचाऱ्यांच्यानावाने कंपन्या…

बनावट बिलांच्या आधारे शासनाची शेकडो कोटीं GST ची लुट; रॅकेटमध्ये कर्मचाऱ्यांच्या
नावाने कंपन्या…

नागपूर || दि २८ मे २०२५ || {विठ्ठल भालेराव} -: बनावट बिलांच्या आधारे सरकारची शेकडो कोटींनी फसवणूक करणाऱ्या रॅकेटमध्ये राष्ट्रीयीकृत आणि खासगी क्षेत्रातील बँकांमधील १०६ बनावट खात्यांचा वापर करण्यात आला. ही खाती रॅकेटचा मास्टरमाइंड बंटी साहू आणि त्याचा भाऊ जयेश साहू चालवीत होते.

हे दोघेही बनावट कंपन्यांच्या माध्यमातून दररोज कोट्यवधी रुपयांचा अपहार करायचे. आश्चर्याची बाब म्हणजे आरोपींनी त्यांच्या कार्यालयात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या नावावर कुणालाही काहीच न सांगता शेल कंपन्या स्थापन केल्या होत्या.

साहू बंधूंनी ८६ कंपन्यांद्वारे जवळपास ८०० कोटी रुपयांची बनावट बिले तयार केली आहेत. कोणताही माल न विकता बनावट बिले बनवून ही फसवणूक केली जात होती. या रॅकेटमधून बिले खरेदी करणारे लोक बिलाची रक्कम आरोपींच्या खात्यात जमा करीत असत. खात्यांमधून पैसे काढल्यानंतर आणि त्यांचे कमिशन कापल्यानंतर, आरोपी उर्वरित रक्कम बिल खरेदीदाराला रोख स्वरूपात परत करायचे. खात्यांमधून पैसे काढण्यासाठी आठ ते दहा विश्वासू लोकांची नियुक्ती करण्यात आली होती.

बंटीच्या ऑफिसमध्ये २५ कर्मचारी होते. सुनील वानखेडे आणि दिलीप फुलझेले हे कर्मचारी देखील तिथे काम करायचे. त्यांचे जबाब गुन्हे शाखेने नोंदविले आहेत.

त्यांच्याकडून घोटाळ्यातील आणखी एक धक्कादायक पैलू समोर आला आहे. साहूने त्यांच्या नकळत बनावट कंपन्या उघडल्या. साक्षी स्टील नावाची कंपनी वानखेडेच्या नावावर नोंदणीकृत आहे, तर सोनू ग्लास ट्रेडर्स फुलझेलेच्या नावाने नोंदणी झालेली कंपनी आहे. फसवणुकीद्वारे कोट्यवधी रुपये कमवूनही बंटीने दोन्ही कर्मचाऱ्यांना पगारही दिला नाही.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Call Us