नंदुरबार :- दि.१४ जुलै २०२४ (फिरोज खान) सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट टाकणाऱ्या आणि व्हायरल करणाऱ्यांवर आता आयटी अॅक्ट नुसार कडक कारवाई होणार आहे. विकृत मानसिकतेच्या माथेफिरुंनीं आता सामाजिक सौहार्द बिघडविण्याच्या दृष्टीने सोशल मीडियाचा वापर सुरु केला असुन यात यापुढे कोणाचीही गय केली जाणार नाही अशी माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक श्रावण दत्त यांनी दिली.
नंदुरबार शहर पोलीस ठाण्याच्या आवारात शांतता कमिटीची बैठक शनिवार रोजी सायंकाळी घेण्यात आली. त्यावेळी ते बोलत होते. नंदुरबार शहरातील एका अल्पवयीन मुलाने राष्ट्रीय पुरुषांचा आक्षेपार्ह पोस्ट ठेवला होता ज्याच्या विरोधात शहरातील विविध संघटना आक्रमक झाली होती.
या अनुषंगाने दिनांक 15 जुलै सोमवार रोजी नंदुरबार शहर बंदची हाक ही देण्यात आली होती, त्यामुळे जिल्हा पोलीस अधीक्षक श्रवण दत्त यांनी शांतता कमिटीची बैठक घेऊन शांतता रहावी असे आवाहन केले. पोलीस अधीक्षक यांच्या आवाहनाला मान देऊन संघटने शहर बंदची हाक मागे घेतले आहे.
अल्पवयीन मुलांमध्ये कळत नकळत सोशल मिडियाच्या माध्यमातून होणारे धार्मीक पोस्ट, स्टेटस दोन समाजामध्ये द्वेष पसरवुन तेढ निर्माण करणारे व दुसऱ्या समाज मनाच्या भावना दुखावणारे पोस्ट आपल्या मोबाइल व्दारे टाकणे आदी विषयांवर आता आयटी कायद्या व भारतीय न्याय संहितेच्या कलमान्वय कडक कारवाई होणार.
तरी देखील जागृत पालकांनी आपल्या मुलांवर मोबाइलचा वापर करतांना नजर ठेवणे अत्यंत महत्वाचे आहे, असे मार्गदर्शन ही जिल्हा पोलीस अधीक्षक श्रवण दत्त यांनी यावेळी केले.
नंदुरबार शहरात आक्षेपार्ह व वादग्रस्त पोस्ट टाकल्यासंबंधी कायदेशीर कार्यवाही होऊन गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे कोणत्याही आक्षेपार्ह पोस्ट टाकण्याअगोदर किंवा ती शेअर करण्या अगोदर प्रत्येकांनी विचार करावा असे आवाहनही जिल्हा पोलीस अधीक्षक श्रवण दत्त यांनी केले आहे. तसेच सामाजिक शांततेला धक्का पोहोचविणाऱ्या आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्यांवर कारवाई करण्याचा इशारा दिला आहे.
या बैठकीला जिल्हा पोलीस अधीक्षक सह स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक, उप नगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक, नंदुरबार शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक यांच्यासह शहरातील विविध सामाजिक संस्थांचे पदाधिकारी तसेच शहरातील हिंदू – मुस्लीम बांधव या बैठकीस उपस्थित होते..