विशाळगड प्रकरणात आरोपींवर युएपीए अंतर्गत कारवाई करा व इतर मागण्यासाठी एम आय एम चे धरणे प्रदर्शन.
जळगांव || दि.१९ जुलै २०२४ || [पूनम महाजन] -: विशाळगड येथे मुस्लिम समाजावर झालेल्या हल्ल्याचा तीव्र निषेध करण्यात येऊन या धरणेद्वारे जिल्हाधिकारी मार्फत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांच्याकडे सहा मागण्या करण्यात आल्या आहे. या प्रामुख्याने हल्लेखोरांवर युएपीए अंतर्गत कारवाई करा, निष्क्रिय व कर्तव्यात कसूर करणारे प्रशासकीय अधिकारी यांच्यावर निलंबनाची कारवाई करा, हल्ल्यामध्ये धार्मिक स्थळ व लोकांची घराचे नुकसान झाले आहे त्यांची नुकसान भरपाई द्या, जे या हल्ल्यात जखमी झाले त्यांना सरकारने प्रत्येकी ५ लाख रुपये द्यावे, मुस्लिम समाजावर होत असलेल्या हल्ले थांबवण्यासाठी मुस्लिम समाजासाठी संरक्षण कायदे विशेष अधिवेशन बोलवून पारित करण्यात यावे व या संपूर्ण घटनेची सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांमार्फत चौकशी करण्यात यावी. अश्या मांगण्या जी. एस. ग्राउंड येथे एमआयएम पक्षातर्फे झालेल्या धरणे आंदोलना मार्फत करण्यात आल्या.
एमआयएमचे महाराष्ट्र राज्याचे प्रमुख इम्तियाज जलील यांच्या आदेशाने संपूर्ण महाराष्ट्रात १९ जुलै रोजी धरणे प्रदर्शन आयोजित करण्याचे आदेश होते त्यानुसार जळगांव जिल्हा एमआयएम अध्यक्ष अहमद हुसेन यांनी दुपारी २ ते ४ वाजे पर्यंत धरणे प्रदर्शन चे आयोजन जी. एस. ग्राउंड, जळगांव येथे केले होते. त्यात हजारोच्या संख्येने लोकांची उपस्थिती होती.
सर्वप्रथम एमआयएम अध्यक्ष अहमद हुसेन यांनी
विशाळगड अतिक्रमण, मस्जिद व रहिवासी लोकांवर झालेल्या अन्यायाचे कथन प्रास्ताविके द्वारे सादर केले. त्यानंतर उपस्थितांनी मार्गदर्शन केले. त्यात जळगांव जिल्हा मनियार बिरादरीचे अध्यक्ष फारुक़ शेख, तांबापुर फाउंडेशनचे अरशद शेख (सोनू) एमआयएमचे महानगराध्यक्ष अक्रम देशमुख, ईश्वर पाटील ( उस तोड संघटना अध्यक्ष) सुनील गायकवाड ( आदिवासी एकता परिषद विभागीय अध्यक्ष) हे आहेत. ज्येष्ठ पत्रकार अली अंजुम रज़्वी यांनी मार्गदर्शन करून कायद्यानुसार व संविधानानुसार पुढे काय करता येईल व काय करायचे आहे हे उपस्थितांसमोर सांगितले.
आंदोलन संपल्यावर माननीय जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांची शिष्टमंडळाने भेट घेऊन त्यांना मागण्याचे निवेदन दिले असता त्यांनी आपल्या भावना शासनाला त्वरित कळवतो असे आश्वासन दिले.
अहमद सर, अली अंजूम रज़्वी, फारुक़ शेख, अक्रम देशमुख, अरशद शेख, साबीर खान, वासिफ सय्यद, खालिद खाटीक, एरंडोल चे असलम पिंजारी आदींचा समावेश होता.