16 ऑगस्ट शुक्रवार रोजी नंदुरबार बंद नाही : शहर पोलीस निरीक्षक नंदुरबार

16 ऑगस्ट शुक्रवार रोजी नंदुरबार बंद नाही : शहर पोलीस निरीक्षक नंदुरबार : दि.16 ऑगस्ट ( फिरोज खान ) बंगलादेशातील हिंसाचाराविरुद्ध दो दिवसांपासून सोशल मीडियावर दिनांक 16 ऑगस्ट 2024 शुक्रवारी नंदुरबार बंद चे पोस्टर बनवून व्हायरल केले जात असतांना आज दिनांक 15 ऑगस्ट गुरुवार रोजी रात्री 10 वाजता अचानक शहर पोलिस ठाण्याचा वतीने शांतता समितीची तडकाफडकी बैठकीचे आयोजन करण्यात आली होती यात शहर पोलिस निरीक्षक वासुदेव देसले यांनी शहरात दोन्ही समाजातील सर्व प्रतिष्ठीत मान्यवर व पत्रकारांना बैठकीचे कारण सांगत संबोधित केले की,काल दिनांक 16 ऑगस्ट 2024 शुक्रवार रोजी सकल हिंदू समाजाच्या वतीने नंदुरबार बंद बाबत सोशल मीडियावर चालणारे पोस्टर हे फेक असुन यात कुठले ही तथ्य नसुन आम्ही याबाबत सर्वस्तरावर तपासणी केली असता असं कुठल्याही संगठन अथवा राजकीय पक्षाने नैतिक जबाबदारी घेऊन अधिकृत रित्या बंद बाबत जाहीर केले अथवा आमच्याकडे अर्ज किंवा निवेदन सादर केले नसल्याने शहरातील नागरिकांनी अफवांना बळी पडू नये.तसेच जिल्ह्यात मा. जिल्हाधिकारी कार्यालया मार्फत 37(1) (3) जमावबंदी आदेश लागू असुन आमच्या कार्यालयात व्ही एच पी व बजरंग दल च्या वतीने शुक्रवारी रोजी सकाळी 10 वाजता शहरात मोठा मारुती मंदिर पासुन दोशाह तकिया, जळका बाजार, सोनार खुंट, गणपती मंदिर, अहिल्याबाई विहीर, हाट दरवाजा, गांधी पुतळा, नेहरू पुतळा मार्गे नगर पालिका, अंधारे चौक, ते मोठा मारुती मंदिरला परत येऊन विसर्जन असे निषेध मोर्चाचे आयोजन असल्याचे नमुद करून परवानगीचा अर्ज आमच्याकडे आला असुन आम्ही कुठलीही परवानगी दिली नसली तरीही पोलिस दलाच्या वतीने पूर्ण शहरात चोख बंदोबस्त असणार असुन कोणीही कायदा व सुव्यवस्था बिगडविण्याचा प्रयत्न केल्यास कडक कार्यवाही केली जाईल.उपस्थितांमधुन ऊबाठा चे पंडित माळी यांनी प्रश्न उपस्थित केले की दोन दिवसांपासून जर बंदचे पोस्ट व्हायरल होत असुन सगळीकडे पसरली आहे यावर पोलिसांनी वेळीच उपाय ना करता ऐन आदल्या रात्री अधिकृत खुलासा करणे कुठपर्यंत योग्य आहे?व्यापारी मोहिनीराज राजपूत यांनी माहिती दिली की मंगल बाजार पोलिस चौकी येथे एकही पोलिस अधिकारी किंवा कर्मचारी उपस्थित नसल्याने भाजीपाला विक्रेते तेथे आपली भाजी व इतर वस्तू ठेवत आहे, दररोजचा भरगच्च बाजार असल्याने लहान लहान करणावरून वाद निर्माण होत असतो, यावरून पोलिस निरीक्षक देसले यांनी त्वरीत एक कर्मचारीला तेथे नेमणूकीचे आदेश दिले तसेच बाजार समिती सभापतीशी दूरध्वनी वरून बंद नसल्याबाबत सूचना केल्या.या बैठकीत एम.आई.एम चे उत्तर महाराष्ट्र कार्याध्यक्ष सैय्यद रफअत हुसैन, तालुका अध्यक्ष आरिफ सैय्यद, वाहतूक अध्यक्ष मुखतार बेग, अजमाल खान, माजी नगर सेवक परवेज खान उर्फ ( माक्कु सेठ ), मोहन माळी, लक्ष्मण माळी, मौलवी जकरिया, मौलवी अब्दुल्ला, अब्दुल बारी साहब, माणिक माळी, आदी मान्यवरासह पत्रकारही उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Call Us