कॉपर केबल चोरी करणारा मुददेमालासह स्थानिक गुन्हे शाखेकडून जेरबंद, दोन गुन्हयांची उकल धुळे : निजामपुर दि.21 ऑगस्ट ( सैय्यद परवेज ) निजामपुर पोलीस स्टेशन हददीतील सोलर विदयुत निर्मिती प्लांट परिसरात कॉपर केबल चोरी होत असल्याने त्यावर अंकुश ठेवणेकरिता व गुन्हयांची उकल होणेकरिता पोलीस अधिक्षक धुळे यांनी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकास आदेशीत केले होते. त्याअनुषंगाने स्थानिक गुन्हे शाखेचे पथक साक्री-निजामपुर रोडवरील सोलर विदयुत निर्मिती प्लांट परिसरात फिरत असतांना गोपनिय बातमीदारामार्फत बातमी मिळाली की, कॉपर केबल चोरीचे गुन्हे ईसम नामे अबरार अली फत्तु सैय्यद रा.निजामपुर ता. साक्री याने त्याचे इतर साथीदारांसह केले असुन तो अशाच प्रकारच्या चो-या करण्यासाठी सोलर प्लांट परिसरात त्याचे ताब्यातील मोटार सायकलने फिरत असल्याची माहिती मिळाल्याने त्याचा शोध घेतला असता तो मिळुन आल्याने त्याने त्याचे नांव १) अबरार अली फत्तु सैय्यद वय-३४ व्यवसाय-भंगार दुकान रा. मरकस मस्जिद जवळ निजामपुर ता. साक्री असे सांगितले. त्यास गुन्हयासंबंधी कसुन विचारपूस केली असता सदरचा गुन्हा त्याने त्याचा साथीदार ०२) योगेश गोरख वाघमोडे ०३) रतन हरी बोरकर ०४) सागर ताथु बोरकर सर्व रा. वाघापुर ता. साक्री ०५) आदिल अश्पाक तांबोळी रा. निजामपुर ता. साक्री व इतर दोन आरोपी यांचेसह गुन्हा केला असल्याची कबुली देवुन त्याने साथीदारांसह चोरी केलेला मुददेमाल सोलर प्लांट परिसरातील काटेरी झुडपातुन काढुन दिला त्याचे वर्णन खालील प्रमाणे.मुद्येमालाचे वर्णन१- ५२,५००/-रूपये किंमतीची ९५ स्क्वेअर एमएम ची सुमारे १५० मीटर कॉपर केबल२- ४,५००/-रूपये किंमतीची ०६ स्क्वेअर एमएम ची सुमारे १०० मीटर कॉपर केबल१५८/२०२४ क.३७९ प्रमाणे भादवि३ – ३७,८००/-रूपये किंमतीची ९५ स्क्वेअर एमएम ची सुमारे ६३० मीटर कॉपर केबल४ – ४,५००/-रूपये किंमतीची ०६ स्क्वेअर एमएम ची सुमारे १०० मीटर कॉपर केबल१९६/२०२४ बीएनएस क.३०३ (२), ३(५) प्रमाणे५ – ३०,०००/-रुपये किंमतीची हिरो कंपनीची स्प्लेंडर प्लस मो.सा.क्र. जीजे-०५ एमएच-८३०४ तिचा चेसीस MBLHA१०BWFHF१०८४८ जुवाकिंअं. क्रमांकगुन्हयात वापरलेली मोटार सायकलएकुण :- १,२९,३००/- रुपये किंमतीचा मुददेमालअशा प्रकारे निजामपुर पोलीस स्टेशन भाग-5 गु.र.नं. १५८/२०२४ भादवि क.३७९ प्रमाणे व गु.र.नं १९६/२०२४ बीएनएस क.३०३ (२), ३ (५) प्रमाणे असे दोन गुन्हे उघडकीस आले आहेत.सदरची कारवाई पोलीस अधिक्षक श्री. श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधिक्षक, धुळे किशोर काळे यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पो.नि.श्रीराम पवार, सपोनी/मयुर भामरे, पोसई/प्रदीप सोनवणे निजामपुर पो.स्टे., पोसई / बाळासाहेब सुर्यवंशी, असई / संजय पाटील, पोहेकॉ/संतोष हिरे, पोहेकॉ मुकेश वाघ, पोना/रविकिरण राठोड पोकॉ/हर्षल चौधरी, गुणवंत पाटील, महेंद्र सपकाळ, सुशिल शेंडे, सुनिल पाटील, चापोकों/राजु गिते तसेच निजामपुर पो. स्टेचे कर्मचारी पोहेकॉ रतन मोरे, पोहेकॉ प्रदीप आखाडे, पोकों/परमेश्वर चव्हाण, पोकॉ/अर्जुन पवार अशांनी केली आहे.