सना फाऊंडेशनच्या वर्धापन दिनानिमित्त विविध क्षेत्रातील मान्यवरांचा गौरव…

सना फाऊंडेशनच्या वर्धापन दिनानिमित्त विविध क्षेत्रातील मान्यवरांचा गौरव…

लातूर || दि. ०९ सप्टेंबर २०२६ || सना फाऊंडेशनच्या १४ व्या वर्धापन दिनानिमित्त  समाजाच्या विविध क्षेत्रांत उल्लेखनीय योगदान देणाऱ्या व्यक्तींच्या कार्याची दखल घेऊन फाऊंडेशनच्यावतीने आदर्श शिक्षक, युवा प्रेरणा, आदर्श प्रशासक, महिला सक्षमीकरण व जीवनगौरव पुरस्कार मयुर फंक्शन हॉल येथे प्रदान करण्यात आला. या पुरस्कार सोहळ्याला महाराष्ट्र विकास आघाडी अध्यक्ष ऍड. अण्णाराव पाटील हे कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी तर प्रमुख पाहुणे म्हणून आ. विक्रम काळे, माजी खा. डॉ. सुनिल गायकवाड, फिल्म अभिनेते अनिल मोरे, , सौ. फराह नाज, लातूर मनपा नगरसेविका तबस्सुम मुख्तार शेख उपस्थित होते.

यावेळी पुरस्कार प्राप्त मान्यवरांच्या कार्याचा गौरव करताना त्यांच्या सामाजिक योगदानामुळे समाजातील इतरांना प्रेरणा मिळत असल्याचे उपस्थित मान्यवरांनी सांगितले. तसेच प्रतिकूल परिस्थितीतही सामाजिक बांधिलकी जपत विविध क्षेत्रांत कार्य करणाऱ्या व्यक्तींचा सन्मान करणे ही कौतुकास्पद बाब आहे.

या सोहळ्यामुळे विविध क्षेत्रांत कार्यरत असलेल्या व्यक्तींना प्रोत्साहन मिळाले असून, सामाजिक कार्याची प्रेरणा पुढील पिढीपर्यंत पोहचविण्यास या उपक्रमाची निश्चितच मदत होईल.        

सना फाऊंडेशनच्या १४ वर्षांच्या सामाजिक प्रवासात विविध उपक्रमांच्या माध्यमातून समाजातील गरजू घटकांना मदत, जनजागृती, महिला व युवा सक्षमीकरण तसेच सामाजिक विकासासाठी सातत्याने प्रयत्न करण्यात येत असल्याचे फाऊंडेशनच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले.

पुरस्कार प्राप्त मान्यवरांचा शाल, सन्मानपत्र, स्मृतिचिन्ह, मेडल व पुष्पगुच्छ देऊन यथोचित गौरव करण्यात आला. हा कार्यक्रम यशस्वी  करण्यासाठी प्रा. शफीयोद्दीन शेख, हारुण सय्यद, हाजी सलीम आळंद,  दिगंबर काळे, महेश गाडेकर, शोएब शेख, एम. एच. शेख, अभय पोतदार, सय्यद वाजीद, फरहान सय्यद,‌ फजल चौधरी, मुस्तफा काझी, अन्वर खान यांचे सहकार्य लाभले. तसेच या कार्यक्रमाला विविध क्षेत्रातील मान्यवर, सामाजिक कार्यकर्ते, पत्रकार, शिक्षक, उद्योजक सह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Call Us