निजामपूर ग्रामसभा बेकायदेशीर ग्रामसेवक सरपंच यांचा मनमानी कारभार- प्रकाश बच्छाव यांचे आरोप….
धुळे/निजामपुर || दि.२८ ऑगस्ट२०२४ || (सैय्यद परवेज)-: दि. २८ ऑगस्ट रोजी सकाळी १० वाजता सरपंच शीतल शाह अध्यक्षता खाली ग्रामसभा निजामपूर ग्रामपालिकेच्या सभा गृहात घेण्यात आली होती.
सकाळी दहा तें अकरा वाजेच्या दरम्यान 30 तें 35 ग्रामस्थ उपस्थित असल्याने प्रकाश बच्छाव यांनी अक्षकेप घेतला ग्राम सांभाला पूर्ण कोरम नसल्याने ग्रामसभा स्थगित करावी अशी विनंती केली.
त्यानुसार ग्रामविकास अधिकारी राहुल मोरे यांनी सरपंच शीतल शहा यांच्याशी चर्चा करून कोरम अभावी सभा तहकूब केले असा निर्णय घेतला त्या नंतर सरपंच प्रतिनिधी गजाननं शाह व मा.प.स सदस्य वासुदेव वाणी यांनी ग्रामस्थ येत आहे असा दबाव टाकून सरपंच व ग्रामसेवक यांना ग्रामसभा घेण्यास भाग पाडले यात वादावादी होऊन आपसात शाब्दिक बाचा बाची आपसात सुरू झाली.प्रकाश बच्छाव यांनी सांगितले कि कोराम अभावी सभा तहकूब झाल्या नंतर सभा कशी सुरू होते याचा उत्तर दया याचे उत्तर सरपंच व ग्रामसेवक यांना देता आले नाही. बच्छाव यांनी सांगितले कि कोरम अभावी सभा तहकूब झाली शासनाच्या नियमांनुसार कोरम सभा सात दिवसाच्या आत घ्यावी अशी विनंती केली होती.
मात्र सरपंच व ग्रामसेवक यांनी आपल्या मनमानी कारभार व दडपशाही राजकीय दबावा खाली सभा घेण्यात आली त्यानंतर ग्रामस्थांना बोलून बेकादशीर प्रोसेडींग वरती सह्या घेऊन कोरम पूर्ण केला तसेच सरपंच प्रतिनिधी यांनी कामात हस्तक्षेप केल्यामुळे व ग्रामसभा स्वतः चालून शासनाच्या कायदाची पायमाल्ली केली आहे.
याबाबत वरिष्टांकडे तक्रार करू अशी भूमिका प्रकाश बच्छाव यांनी घेतली ग्रामपंचायतच्या कामामध्ये सरपंच प्रतिनिधी यांनी जर हस्तक्षेप केला तर फौजदारी गुन्हा दाखल करून सरपंच यांना अपात्र करण्यासाठी आयुक्त नाशिक यांच्या कडे अपील दखल करण्यात येईल अशी भूमिका प्रकाश बच्छाव यांनी घेतली आहे व यापुढे ग्राम पालिकेमध्ये दडपशाही,मनमानी कारभार,व कोणाचेही हस्ताक्षेप खपून घेणार नाही अशी प्रतिक्रिया बच्छाव यांनी दिली.
या ग्रामसेभेच्या वेळी सदस्य उपसरपंच शाम पवार,ताहीर बेग मिर्झा,परेश पाटील,मुशताक पठाण रमेश कांबळे,विजय राणे .सखाराम विसपुते,वासुदेव वाणी,दिलीप पवार,रविद मोरे सुनिल बागले,तन्वीर शेख अफजल सैय्यद,मनोहर ठाकरे,सुरेश मोरे,राजेश माळचे,चिधुशेठ शिंपी,मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.
यात विकास कामांबाबत ठराव करण्यात आले यावेळी चिधू शिंपी मुश्ताक पठाण, परेश पाटील, ताहीरबेग मिर्झा, रवींद्र मोरे, सुनिल बागले, वासुदेव वाणी आदी चर्चा भाग घेतला पंरतु ग्रामसभेत कमी ग्रामपंचायत सदस्य असल्याने ग्रामस्थांनी नाराजी व्यक्त केली.
ग्रामसभेत मागील इतिवृत्त वाचुन मंजुरी देण्यात आली १००टक्के करवसुली फेर आकारणी करण्याचा पंधराव्या वित आयोगाच्या कामांना मंजुरी देण्यात आली.