पैगंबर महंमद जयंती निमित्ताने दूध कोल्ड्रिंक्स वाटप करून जशने ईद मिलाद उन नबी उत्साहात साजरा
नंदुरबार दि.१७ सप्टेंबर ( फिरोज खान )
इस्लामचे प्रेषित महंमद पैगंबर जयंती निमित्त १६ सप्टेंबर रोजी सायंकाळी सुतार मोहल्ला नंदुरबार येथे सालाबादप्रमाणे दूध कोल्ड्रिंक्स वाटप करून जशने ईद मिलाद उन नबी उत्साहात साजरा करण्यात आले
इतरांना मार्गदर्शन, उपदेश व आदेश करण्यापूर्वी सर्वप्रथम स्वतः आचरण करणे हा प्रेषित हजरत मोहम्मद पैगंबर यांचा विशेष स्वभावगुण होता.
मनमिळावू, सभ्यता,विनम्रता, प्रेमळ स्वभाव, शत्रूना माफ करणे, द्वेषभावना न बाळगणे आदी विशेष गुण त्यांच्यात होते.
त्यांच्या तोंडून विरोधकांविषयी कधीही अपशब्द्व निघाले नाही. उलट ते त्यांच्याशी प्रेमानेच वागले, बोलले. सर्वश्रेष्ठ अल्लाहताअलाच या सृष्टीचा निर्माता आहे.
त्याच्याइतका कोणीही श्रेष्ठ नाही, असे ते अपल्या प्रवचनातून उपदेशकरीत असत. कितीही कठीण प्रसंग आले, तरी सत्याचा मार्ग सोडायचा नाही असे ते सांगत.
वयाच्या ६३ व्या वर्षी त्यांनी जगाचा निरोप (परदा) घेतला. त्यांनी दाखवूनदिलेला सत्याचा मार्ग, त्यांनी केलेल्या उपदेशांवर प्रामाणिकपणे आचरण, त्यांच्या पावलावर पाऊल टाकूनचालण्याचा संकल्पच पैगबरांप्रती खरी श्रद्धा ठरेल.
तसेच त्यांचा सच्चा अनुयायी होण्याचा गौरव प्राप्त होईल. एकाअर्थाने पैगंबर मुहम्मद यांची जयंती साजरी करण्याचे सार्थक होईल.
योगायोग पैगंबर जयंती ईद – ए – मिलाद उन नबी हा मुस्लिमांचे सण १६ सप्टेंबर रोजी आहे व हिंदू बांधवांचे गणेशोत्सव १७ सप्टेंबर रोजी एकत्र येत आहे
गणेश विसर्जन आणि पैगंबर जयंती मिरवणुकीचा मार्ग एकच आहे गणेशोत्सव आणि पैगंबर जयंती उत्साहात साजरे व्हावे दोन्ही धर्मांच्या सणांना गालबोट लागु नये यासाठी पैगंबर जयंतीची मिरवणूक १९ सप्टेंबर रोजी दुपारी शहरातील जामा मस्जीद येथून काढण्याचं निर्णय सिरत कमेटीने जाहीर केला आहे