मुस्लिम समाजाची भेदभाव करणाऱ्या शिंगणापूर ग्रामपंचायत बरखास्त करा.ताहीर बेग मिर्झा ..

धुळे निजामपूर : दि.१८ सप्टेंबर ( सैय्यद परवेज )

अल्पसंख्याक मुस्लिम चा भेदभाव करणाऱ्या व मतदानापासून वंचित ठेवण्याचा विचारांची शिंगणापूर ग्रामपंचायत बरखास्त करा अशी तक्रार जेष्ठ पत्रकार ताहीर बेग मिर्झा यांनी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री ना एकनाथ शिंदे व उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अजीतदादा पवार व ग्रामविकास मंत्री गिरीष महाजन यांच्या कडे केली आहे

याबाबत सविस्तर वृत्त असे की शिंगणापुर ता. करवीर जि. कोल्हापुर येथील ग्रामपंचायत दिनांक 28/08/2024 ग्रामसभा (गावसभा ) ठराव क. 29 अन्वये असा ठराव घेण्यात आला की, अल्पसंख्याक मुस्लीम नोंदणी यांची नविन मतदान यादीत नावे समाविष्ठ करण्यात येवु नये.

असे सर्वानुमते ठरले. तसेच ज्या ज्या वेळी नविन मतदार यादी प्रसिध्द होईल तेव्हा नविन अल्पसंख्याक यांची नावे नोंद झालेचे निर्दशनास आल्यास त्यावर ग्रामपंचायत मार्फत हरकती घेवुन सदरची नावे कमी करणेंत यावीत असे हि सर्वानुमते ठरले त्यास आजची गावसभा सर्वानुमते मंजुरी देत आहे.

असा ठराव पारित करुन दि. 5/9/2024 रोजी शिंगणापूर ग्रामपंचायत लेटर हेड वर लोकनियुक्त सरपंच व ग्रामविकास अधिकारी यांच्या सह्या करुन सुचक अनुमोदकचे नांव टाकुन नक्कल दिली आहे ठरावाची नक्कल असा ठराव पारित केला आहे.

सर्व सोशल मिडियाच्या माध्यमावर जोमाने प्रसिध्द करण्यात
आला आहे. सरपंच उपसरपंच सदस्य ग्रामसेवक यांनी आपले कर्तव्य पार पाडताना बेकायदेशीर कृत्य केल्याने यांच्यावर ग्रामपंचायत अधिनियम ३९(१) अन्वये कारवाई करण्यात यावी तसेच सरपंच उपसरपंच ग्रामसेवक सुचक अनुमोदक वर गुन्हा नोंद होऊन‌ बडतर्फ कारवाई करण्यात यावी अशी मागणी केली आहे

पदाचा गैरवापर करुन एका समाजास टार्गेट करुन असंवैधानिक ठराव पास करुन दोन
समाजात तेढ निर्माण होईल व संविधानाने दिलेल्या अधिकारांस हानि होईल असे कृत्य केले आहे

सदरचे कृत्य माफ होण्यासारखे नाही त्यामुळे सरपंच, उपसरपंच ग्रामसेवक सुचक व अनुमोदक यांच्यावर कायदेशिर कारवाई करुन नविन भारतीय
न्यायसंहिता.196.197(1).299 353 (2) 61 (2) अन्वये फौजदारी गुन्हा दाखल करण्यात
यावा.

तसेच त्याच्याविरुध्द दोन समाजात तेढ निर्माण करण्याबाबत माझी रितसर तक्रार आहे. तसेच याबाबत अल्पसंख्याक मुस्लीम समाजाच्या लोकांना मतदाना पासुन वंचित ठेवले आहे का याबाबत सविस्तर चौकशी करण्यात यावी.

नविन मतदार यादीत नमुना नंबर सहा भरुन दिलेले सर्व अल्पसंख्याक मुस्लीम लोकांची चौकशी करून त्यांना
मतदानापासून वंचित राहणार नाही. याची काळजी शासनाने व राज्य निवडणूक आयोगाने घ्यावी अशी तक्रार महामहिम राज्यपाल व राज्य निवडणूक आयोग.अध्यक्ष‌ अल्पसंख्याक आयोग . जिल्हाध्यक्ष धुळे यांच्या कडे पाठवल्या आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Call Us