शिरसोली येथे अवैध गॅस वाहनांत भरायचे गॅसचे ७३ सिलेंडरसह एका संशयिताला अटक ; जळगाव एलसीबीची मोठी कारवाई !
जळगाव || दि.३० सप्टेंबर२०२४ || {शाहिद खान}-: शिरसोली येथे खाजगी वाहनांमध्ये गॅस भरण्यासाठी बेकायदेशीररीतये करून ठेवलेल्या गॅस सिलेंडरचा साठा व रिक्षा असा एकूण ५ लाख २९ हजार ६०० रुपयांचा मुद्देमाल स्थानिक गुन्हे शाखेचा पथकाने जप्त केला आहे. सादिक सिराज पिंजारी (वय-४१) रा. शिरसोली जि. जळगाव असे अटक केलेल्या तरुणाचे नाव आहे
अधिक माहिती अशी की,
जळगाव शहरातील शिरसोली येथे दि.२९ रोजी मा वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. बबन आव्हाड सो स्थानिक गुन्हे शाखा जळगाव यांना गोपनीय माहिती मिळाली होती की, सादीक पिंजारी, रा.मलीक नगर, शिरसोली प्रन तालुका जिल्हा जळगाव, हा त्याचे राहते घराचे कंपाउन्डमधील मोकळ्या जागेत मानवी जिवन धोक्यात येईल अगर अन्य कोणत्याही व्यक्तीस दुखापत अगर नुकसान पोहचण्याचा संभव निर्माण होईल अश्या पद्धतीने ज्वलनीशल अश्या भारत गॅस, एच.पी. गॅस, इंडियन गॅस कंपनीच्या घरघुती वापराच्या व व्यवसायीक वापराच्या गॅस सिलेंडर या बेकायदेशीर रित्या जिवनावश्यक वस्तु गॅस सिलेंडर याचा साठा करून खाजगी वाहनामध्ये भरूण देण्याच्या उद्देशाने गॅस सिलेंडर अश्या जिवनावश्यक वस्तु कब्जात बाळगत असलेबाबतची माहिती मिळाली.
सदर ठिकाणी जाऊन दुपारी १२ वाजता सुमारास सादिक पिंजारी हा सदर मुद्देमालासह मिळुन आला होता. म्हणुन त्याचेवर कारवाई करण्यात येवुन त्याचेकडुन एकूण भारत, एचपी व इंडीयन कंपनीचे असे एकूण ७३ नग घरघुती व व्यवसायीक सिलेंडर, सिलेंडर असलेलेली एप्पे रिक्षा क्रमांक एम एच-१९ बी एम २७८४ व गॅस भरण्याची मशीन, नळ्या असे एकूण ५,२९,६००/- रू किमतीचा मुददेमाल जप्त करण्यात आलेला आहे. त्याचेविरूद्ध एमआयडीसी पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.
सदरची कारवाई ही मा पोलीस अधिक्षक श्री महेश्वर रेड्डी सो, मा अपर पोलीस अधिक्षक श्री. अशोक नखाते सो, मा उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. संदिप गावीत सो, यांचे मार्गदर्शनाखाली, वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. बबन आव्हाड सो, मा. पोलीस निरीक्षक /श्री दत्तात्रय निकम सो, पोउपनिरी/ दत्तात्रय पोटे, सफौ / अतुल वंजारी, अधिकार पाटील, पोहेका / विजय पाटील, हरीलाल पाटील, पोकों / प्रदिप चवरे, ईश्वर पाटील, प्रदिप सपकाळे, शुद्धोधन ढवळे अश्यांनी केली असुन पुढील तपास हा पोलीस निरीक्षक श्री दत्तात्रय निकम हे करीत आहेत.