दरोड्याच्या तयारीत असलेली आंतरराज्यीय टोळी जेरबंद; नंदुरबार स्थानिक गुन्हे व शहर पोलीस ठाण्याची संयुक्त कारवाई…!!

दरोड्याच्या तयारीत असलेली आंतरराज्यीय टोळी जेरबंद, 11 लाख 71 हजार 580 रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत…!!

स्थानिक गुन्हे शाखा व नंदुरबार शहर पोलीस ठाण्याची संयुक्त कारवाई…!!

नंदुरबार || दि.०४ ऑक्टोंबर२०२४ || {फिरोज खान}-: दिनांक 02/10/2024 रोजी अमावस्या असल्याने दिनांक 01/10/2024 रोजीचे 20.00 ते दिनांक 02/10/2024 रोजीचे 05.00 वाजे दरम्यान नंदुरबार जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्रवण दत्त. एस, अपर पोलीस अधीक्षक आशित कांबळे यांचे नेतृत्वाखाली संपूर्ण नंदुरबार जिल्ह्यात नाकाबंदी व कोंबिंग ऑपरेशन राबविण्यात आले होते.

दिनांक 01/10/2024 रोजी स्थानिक गुन्हे शाखा व नंदुरबार शहर पोलीस ठाण्याचे नंदुरबार शहरात नाकाबंदी व कोंबिंग ऑपरेशन राबवित असतांना नंदुरबार जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्रवण दत्त. एस यांना गुप्त बातमीदारामार्फत बातमी मिळाली की, नंदुरबार शहरातील जगतापवाडी परीसरात 5 ते 6 इसम संशयास्पदरीत्या फिरत आहे

त्या अनुषंगाने त्यांनी सदरची माहिती तात्काळ आपल्या नंदुरबार शहरात नाकाबंदी व कोंबिंग ऑपरेशन राबवित असलेल्या स्थानिक गुन्हे शाखा व नंदुरबार शहर पोलीस ठाण्याच्या पथकांना देवून संशयीत इसमांचा शोध घेवून त्यांना ताब्यात घेवून त्यास विचारपूस करुन त्याचेविरुध्द् योग्य ती कायदेशीर कारवाई करण्याचे आदेश दिले.

स्थानिक गुन्हे शाखा व नंदुरबार शहर पोलीस ठाण्याच्या पथकांनी नंदुरबार शहरातील जगतापवाडी परीसरात मिळालेल्या बातमीमधील संशयीत इसमांचा शोध घेतला असता डुबकेश्वर महादेव मंदिराकडे जाणाऱ्या रस्त्यावर 5 इसम दिसून आल्याने पथकातील पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी संशयीत इसमांना पकडण्याचा प्रयत्न केला असता 01 संशयीत इसम रात्रीच्या अंधाराचा फायदा घेवून पळून गेले व 04 इसमांना जागीच शिताफीने पकडण्यात आले.

ताब्यात घेण्यात आलेल्या इसमांना नाव गाव विचारले असता त्यांनी त्यांचे नाव
1) जोगिंदरसिंग बचपणसिंग शिकलीकर वय-32 वर्षे
2) इम्रान दिलवर शेख वय-19 वर्षे व दोन अल्पवयीन सर्व रा. सोरापाडा ता. अक्कलकुवा जि. नंदुरबार असे सांगितले.

तसेच त्यांची अंगझडती घेतली असता जोगिंदरसिंग शिकलीकर याचे ताब्यातील बॅगमध्ये एक गावठी बनावटीचे पिस्टल, 2 जिवंत काडतूस,एक लोखंडी गुप्ती व एक पांढऱ्या रंगाची दोरी व 11 लाख 15 हजार 830 रुपये किमतीचे सोन्याचे दागिने व रोख रुपये मिळून आले.

संशयीत इसमांच्या ताब्यात मिळून आलेल्या सोन्याचे दागिने व रोख रुपये मिळून आल्याने कायदेशीर प्रक्रिया करुन सर्व मुद्देमाल जप्त करण्यात आला.

तसेच त्याबाबत त्यांना अधिक विचारपूस केली असता त्यांनी 2 ते 3 दिवसापूर्वी नागपूर शहरात रात्रीच्यावेळी 7 ते 8 ठिकाणी घरफोडी चोरी केली होती त्यातील दोन ठिकाणावर त्यांना वरील सोन्याचे दागिने व रोख रुपये मिळाले होते बाबत सविस्तर माहिती दिली.

त्याबाबत नागपूर येथे खात्री केली असता जरीपटका व अजनी पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल असल्याचे निष्पन्न झाले. ताब्यात घेण्यात आलेल्या आरोपीतांना अधिक विचारपूस केली असता सर्व आरोपी नंदुरबार शहरात दरोडा करण्याच्या उद्देशाने आले होते व दरोडा करुन पुन्हा त्यांच्या मुळ गावी जाणार होते बाबत सविस्तर माहिती दिली.

ताब्यात घेण्यात आलेला जोगिंदरसिंग बचपणसिंग शिकलीकर व त्याचा फरार साथीदाराविरुध्द् दिल्ली, गुजरात येथे घरफोडी, चोरी मालमत्तेविरुध्चे इत्यादी गुन्हे दाखल असल्याचे समजून आले आहे.

ताब्यात घेण्यात आलेले
1) जोगिंदरसिंग बचपणसिंग शिकलीकर वय-32 वर्षे
2) इम्रान दिलवर शेख वय-19 वर्षे व दोन अल्पवयीन सर्व रा. सोरापाडा ता. अक्कलकुवा जि. नंदुरबार व एक फरार आरोपीतांविरुध्द् नंदुरबार शहर पोलीस ठाणे येथे 594/2024 310(4), 310 (5) भारतीय हत्यार कायदा कलम 3/25 प्रमाणे नंदुरबार शहर पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सदरची कामगिरी नंदुरबार जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्रवण दत्त. एस, अपर पोलीस अधीक्षक आशित कांबळे, नंदुरबार उप विभागाचे उप विभागीय पोलीस अधिकारी संजय महाजन यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार खेडकर, नंदुरबार शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुनिल भाबड, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस उप निरीक्षक मुकेश पवार, पोलीस हवालदार राकेश मोरे, दादाभाई मासुळ, पोलीस अंमलदार विजय ढिवरे, अभय राजपुत, आनंदा मराठे नंदुरबार शहर पोलीस ठाण्याचे पोलीस उप निरीक्षक विकास गुंजाळ, पोलीस हवालदार विनोद जाधव, पोलीस अंमलदार अनिल बढे, प्रविण वसावे, निंबाबाई वाघमोडे, अरविंद वळवी यांच्या पथकाने केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Call Us