दोन गावठी पिस्टल व दोन जिवंत काडतुस हस्तगत भुसावळ बाजारपेठ पोलिसांची कारवाई…

दोन गावठी पिस्टल व दोन जिवंत काडतुस हस्तगत केले.

जळगाव /भुसावळ || दि.०६ ऑक्टोंबर २०२४ || {शाहिद खान}-: ०५ ऑक्टोंबर रोजी पो.नि. राहुल वाघ यांना गोपनिय माहितीच्या आधारे भुसावळ शहरातील वांजोळा रोडवरील प्रेरणा नगर जवळ इसम नामे १. मुकेश मोहन अटवाल २. यश किरण बोयत दोघे रा.भुसावळ असे त्याच्या कब्जात गावठी पिस्टल बाळगुन फिरत आहे.

म्हणुन पो. निरी. राहुल वाघ यांच्या आदेशाने पो. उपनि. मंगेश जाधव, पोहेका./2692 विजय बळीराम नेरकर, पोहेका./2816 निलेश बाबुलाल चौधरी, पोहेका./ 1539 महेश एकनाथ चौधरी, पोका./2053 प्रशांत निळकंठ सोनार, पोका./1817 अमर सुरेश अढाळे, पोका./59 जावेद शहा हकीम शहा, पोका./272 भुषण सजंय चौधरी, पो. का./2301 राहुल विनायक वानखेडे अंशानी सदर इसमाचा शोध घेतला असता तो भुसावळ शहरातील वांजोळा रोडवरील प्रेरणा नगर फाटया जवळ जावुन तेथे आमचे मोटार सायकलीं लावुन आम्ही पोलीस स्टॉप व पंच असे पायी पायी जावुन बातमीची खात्री केली असता प्रेरणा नगर जवळील बोर्डा जवळ उभे असल्याचे दिसल्याने आमची व पंचाची खात्री झाल्याने आम्ही त्यांना 16.20 वा ताब्यात घेवुन घेवुन पंचासमक्ष त्यांना त्याचे नाव गाव विचारता त्यांनी त्यांचे नाव १.मुकेश मोहन अटवाल वय 20 वर्ष रा. वाल्मीक नगर, भुसावळ जि. जळगांव. २. यश किरण बोयत वय 22 वर्ष रा. अंजली हॉस्पीटल जवळ, तनारिका हॉटेल, भुसावळ जि. जळगांव असे सांगितले.

यातील पकडलेल्या दोन्ही इसमाची पंचासमक्ष अंगझडती घेतली असता त्याच्या कडे १) 20,000/-रु. कि.चा एक लोखंडी गावठी पिस्टल मॅगझीनसह ग्रीपवर काळ्या रंगाची प्लॅस्टीकची पट्टी असलेला. (आरोपी मुकेश मोहन अटवाल याच्या ताब्यात मिळुन आलेला) २) 30,000/-रु.कि.चा एक लोखंडी गावठी पिस्टल मॅगझीनसह ग्रीपवर तपकीरी रंगाची प्लॅस्टीकची पट्टी
असलेला (आरोपी यश किरण बोयत याच्या ताब्यात मिळुन आलेला) ३) 1,000/-रु.कि.चे दोन जिवंत काडतुस (आरोपी मुकेश मोहन अटवाल याच्या ताब्यात मिळुन आलेले) 51,000/-

सदर कारवाई बाबत भुसावळ बाजारपेठ पोलीस स्टेशन गुन्हा रजि. नं. 401/2024 भारतीय शस्त्र कायदा कलम 3/25 प्रमाणे गुन्हा रजि.दाखल करण्यात आलेला आहे.

सदरची कार्यवाही जळगांव मा. पोलीस अधिक्षक श्री महेश्वर रेड्डी, तसेच मा. अप्पर पोलीस अधिक्षक श्री. अशोक नखाते व मा. उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. कृष्णात पिंगळे भुसावळ भाग भुसावळ यांचे मार्गदर्शनाखाली मा. पो. निरी. श्री राहुल वाघ, पो.उपनिरी. मंगेश जाधव, पोहेका./2692 विजय बळीराम नेरकर, पोहेका./2816 निलेश बाबुलाल चौधरी, पोहेका./1539 महेश एकनाथ चौधरी, पोका./ 2053 प्रशांत निळकंठ सोनार, पोका./1817 अमर सुरेश अंढाळे, पोका./59 जावेद शहा हकीम शहा, पोका./ 272 भुषण सजंय चौधरी, पो. का./2301 राहुल विनायक वानखेडे अशांनी केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Call Us