शनिपेठ पोलिसांची कारवाई
अवैधरीत्या देशी-विदेशी दारूची चोरटी व विक्री; ३१ हजारांचा मुद्देमालासह अटक..
जळगाव || दि. १९ ऑक्टोंबर २०२४ || {प्रतिनिधी शाहिद खान}-: जळगाव शहरातील जोशी पेठ परिसरात विकी टेलर चौकात खानावळीत विनापरवाना देशी-विदेशी दारूच्या साठा करून ओळखीच्या गिऱ्हाईकांना विक्री करणाऱ्या एका वर्षानंतर पोलिसांनी गुरुवारी १७ ऑक्टोबर रोजी दुपारी कारवाई करत अटक केली आहे.
सनत अनिल घोरुल (वय-५५) रा. जोशी पेठ सीताराम प्लाझा जवळ जळगाव असे अटक केलेल्या तरुणाच्या नाव आहे. त्यांच्याकडून ३१ हजार ८०० रुपयांच्या दारू साठा जप्त केला असून शनिपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अधिक माहिती अशी की, जळगाव शहरातील जोशी पेठ परिसरात विकी टेलर चौकातील खानावळ विनापरवाना देशी विदेशी दारूच्या साठा करून ओळखीच्या गिऱ्हाईकांना विक्री होत असल्याची गोपनीय माहिती.
पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रंगनाथ धारबळे यांना मिळाली. त्यानुसार त्यांनी पथकाला कारवाई करण्याच्या सूचना दिल्या. पोलिसांनी गुरुवारी १७ ऑक्टोबर रोजी दुपारच्या सुमारास कारवाई करत संशयित आरोपी सनत अनिल घोरुल (वय-५५) रा. जोशी पेठ सिताराम प्लाझा जळगाव याला ताब्यात घेतले.
ही कारवाई शनिपेठ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रंगनाथ धारबळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक नितीन पाटील, सहायक फौजदार परेष जाधव, योगेश माळी, विकी इंगळे, गणेश ढाकणे, अमोल वंजारी, यांनी कारवाई केली आहे. पुढील तपास पोलीस पोलीस हेड कॉन्स्टेबल योगेश माळी हे करीत आहे.