शिंदेगटाचे जिल्हाप्रमुखांच्या उपस्थिती बुथ कमिटीची सभा अमळनेर येथे उत्साहात संपन्न..
अमळनेर ||दि.२२ऑक्टोबर २०२४ ||(रिजवान मन्यार):- विधानसभा निवडणूक २०२४ च्या पार्श्वभूमीवर २१ रोजी अमळनेर येथील इंद्रभवन मध्ये सकाळी ११ वाजता जिल्हा प्रमुख वासुदेव पाटील यांच्या अध्यक्षतेखाली शिवसेना बूथ कमिटी कार्यकर्त्यांची सभा उत्साहात झाली.
यावेळी जिल्हाप्रमुख वासुदेव पाटील यांनी महायुतीचे उमेदवार जास्तीत जास्त कसे निवडून येतील यासाठी सर्व कार्यकर्त्यांनी मतदारांना मतदानासाठी प्रेरित करून बूथवर मतदानाची टक्केवारी वाढविण्याचे आवाहन केले.
या बैठकीत विधानसभा क्षेत्र प्रमुख सुरेश अर्जुन पाटील यांनीदेखील शिवसैनिकांना मार्गदर्शन केले. यावेळी शिवसेना शहरप्रमुख संजय कौतिक पाटील, शहर संघटक साखरलाल महाजन, उप तालुका प्रमुख निंबा चौधरी, संतोष पाटील, आकाश भदाणे, सुरेश पाटील, सुभाष पाटील व युवा उपशहर प्रमुख प्रवीण पाटील यांनी सर्व शिवसैनिकांना आपल्या प्रभागात शाखा जास्तीच जास्त अनावरण करण्याचा संदेश दिला व एक शिवसैनिक हजार कार्यकर्ता पेक्षा प्रबळ आहे असेही त्यांनी सांगितले.

यावेळी तालुक्यातील शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. सूत्रसंचालन व आभार युवा शहर प्रमुख भरत पवार यांनी मानले.