अवैध मद्यतस्करी रोखली
धुळे तालुका पोलीसांची कारवाई
धुळे || दि.२४ ऑक्टोंबर {हुसैन शेख}-: सार्वत्रिक विधानसभा निवडणुक-2024 चे पार्श्वभुमीवर विशेष पोलीस महानिरीक्षक, नाशिक परिक्षेत्र, नाशिक यांचे आदेशाने पोलीस अधीक्षक, धुळे यांनी संपुर्ण धुळे जिल्हयातील पोलीस दलातील अधिकारी व अंमलदारांना दिनांक-24/10/2024 रोजीचे 00.00 ते 04.00 वाजेपावेतो ऑल आऊट स्किमसाठी राबविली त्यात नाकाबंदी करुन जिल्हयातील सराईत गुन्हेगार तपासणी, पाहिजे असलेले आरोपी शोध मोहीम, नाकाबंदी करुन वाहने तपासणी, हिस्ट्रीशिटर तपासणी, अवैध दारु, गुटखा, अंमली पदार्थ तस्करी रोखण्याची प्रामुख्याने जबाबदारी दिली होती.
त्यानुसार पोलीस अधीक्षक, धुळे श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक किशोर काळे, उप- विभागीय पोलीस अधिकारी संजय बांबळे यांचे मार्गदर्शनाखाली धुळे तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक पोलीस निरीक्षक अभिषेक पाटील, यांनी अधिनस्त अधिकारी व अंमलदारांसोबत नाकाबंदीचे आयोजन केले
त्यात त्यांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, दिव दमन येथून मारुती इग्नीस गाडी क्रमांक- DD-03-M-3613 व महिन्द्रा TUV गाडी क्रमांक- GJ-15-CF-2742 यांचेत दिव दमन येथील उत्पादीत केलेली दारु नंदुरबार येथे तस्करी करुन घेवून जात असल्याची माहिती मिळाली
त्यानुसार बातमीतीची गांभीर्य लक्षांत घेवून अधिनस्त असलेले पोलीस उप निरीक्षक विजय पाटील,पोलीस हवालदार -किशोर खैरनार, कुणाल पानपाटील,उमेश पवार,पोलीस कॉन्स्टेबल-विशाल पाटील,धिरज सांगळे, चालक पोलीस हवालदार -महेन्द्र पाटील अशांनी मुंबई आग्रा रोडवर पुरमेपाडा गावाजवळ नाकाबंदी करुन वाहनांची तपासणी सुरू केली
त्यात मिळालेल्या बातमीतील मारुती इग्नीस गाडी क्रमांक- DD-03-M-3613 व लाल रंगाची महिन्द्रा TUV गाडी क्रमांक- GJ-15-CF-2742 वाहन आढळून आले असता पोलीसांची नाकाबंदी सुरु असल्याचे पाहून नमुद वाहनावरील चालकाने पोलीसांना चुकवण्यासाठी पळून जात असतांनाच कर्तव्यावरील पोलीसांनी त्यांस थांबवण्याचा प्रयत्न केला परंतू आरोपींनी पोलीसांना जिवे ठार मारण्याच्या उद्देशाने त्यांच्या अंगावर गाडी चालवुन नेण्याचा प्रयत्न केला
तेव्हा पोलीसांनी प्रसंगावधान व समय सुचकता पाळून त्यांनी रोडचे बाजुला उडी मारली म्हणून ते बचावले अशा परिस्थितीत पोलीसांनी जिवा पर्वा न करता पुन्हा वाहनांचा पाठलाग करुन त्यांना पकडून त्यांच्या ताब्यातील वाहनांसह अवैध मद्य तस्करीचे प्रकरण उघडकिस आणुन एकुण 600000/-रुपये किंमतीची विदेशी दारु, 200000/-रुपयाचे दोन चार चाकी वाहने, असा मुद्येमाल जप्त केला असुन या कारवाई आरोपी नामे
1] जयेश शैलेश डामरे वय-22 रा. सर्वोदय सोसायटी वृंदावन अपार्टमेंन्ट तिन बत्ती नानी दमन
2] गणेश विलास सोनवणे वय-21 रा.दिलीप नगर नारायण पार्क जयेश भायजी चाळ नाणी दमन
3] निलेश कुमार सदगुनभाई हरीजन वय-28 रा. झापाबार धाकली निवाडी रुम नं-4 प्रविणभाई चाळ, नाणी दमन
4] हार्दीक शैलेश ओड वय-24 रा. मशाल चौक दिपांजली अपार्टमेंन्ट साई कृपा 4 नाणी दमन यांना अटक करण्यात आली असुन नमुद प्रकरणाचा तपास धुळे तालुका पोलीस करीत आहेत.