गावठी कट्ट्या बाळगणाऱ्यास एमआयडीसी पोलिसांनी केली अटक..
जळगाव || दि.२९ ऑक्टोंबर २०२४ || {शाहिद खान}-: जळगाव शहरातील मेहरूण तांबापुरा परिसरात बेकायदेशीरपणे अग्निशस्त्र बाळगणाऱ्या एका तरुणाला एमआयडीसी पोलिसांनी ताब्यात घेत अटक केली आहे. साहिल मोहम्मद तडवी (उर्फ सोनु वय-२२) रा. मच्छी बाजार तांबापुरा जळगाव, असे अटक केलेले आरोपीचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेली माहिती अनुसार, दिनांक 27/10/2024 रोजी रात्री 1:30 वाजेच्या सुमारास तसेच वे.पो.उप. निरी. श्री. संजय गणसिंग पाटील, पो.का अफजल रफीयोदिन बागवान, सो. पोकों 1575/सिद्धेश्वर डाफ्कर, पोकों 2030/ गणेश ठाकरे, पोकों 206/चंद्रकांत पाटील असे आम्ही मेहरुण तांबापुरा परीसरात रेकार्डवरील आरोपी व मोटार सायकल चोरीचे राराईत गुन्हेगार यांना चेक करण्या बाबत मा. सी. आर.ओ. सर जळगाव कंट्रोल व मा पोलीस निरिक्षक श्री दत्तात्रय निकम सो यांच्या आदेशाने आम्ही शासकिय वाहनासह सदर परीसरात गस्त करीत असतांना तांबापुरा परीस्त्रात महादेव मंदिरा जवळ दोन-तिन इसम हे संशयीत रित्या पायी फिरत असतांना रात्री 01.30 वाजेच्या सुमारास आढळून आल्याने त्यांना त्यांचे फिरण्याबाबत चौकशी केली असता ते उड़वा उडपीचे उत्तरे देत असल्याने त्यांचेवर आम्हास संशय आल्याने आम्ही त्यांना चेक केले असता सदर दोन ईसमांपैकी एकाने काळे शर्ट परिधान केलेले होते तसेच दुस-या ईसमाने पिवळ्या रंगाचे शर्ट परिधान केलेले होते.
त्यापैकी काळे शर्ट परिधान केलेल्या इंरामाच्या डाव्या बाजुस कमरेच्या वर काहीतरी वस्तु लपवल्यासारखे दिसुन आल्याने आम्ही खात्री केली असता त्याचे कमरेजवळ एका गावठी कट्टा मिळुन आला तसेब त्यासोबत असलेल्या मैगजीनमध्ये दोन जिवंत काडतुस मिळुन आले.
तसेच त्यांची अंगझडती घेता पँटचे खिशात गांज्या पिण्यासाठी लागणारी चिलम मिळून आली त्यास त्याचे नाव गाव विचारता त्याने आपले नाव साहील मोहम्मद तडवी (वय-22) वर्षे रा. मच्छी बाजार तांबापुरा ता. जि. जळगाव असे सांगीतले तसेच त्याचे सोबत असलेला पिवळा शर्ट परिधान केलेल्या इसमास त्याचे नाव गाव विचारता त्याने आपले नाव दिपक शांताराम रेणुके (वय-21) वर्षे रा. शामाफायर गोडाऊन समोर तांबापुरा ता. जि. जळगाव असे सांगीतले तरी वरिल ईसमांना हत्यार बाळगंण्याबाबत विचारले असता त्यांनी आमचे कडे कोणताही परवाना नसले बाबत सांगितले. त्यावेळी ग्रेड पोलीस निरिक्षक संजय पाटील यांनी दोन प्रतीष्ठीत पंचाना बोलावुन त्यांच्या समक्ष त्यांची अंगझडती घेतली असता त्यांच्या अगझडतीत खालील वर्णनाच्या व किमतीच्या वस्तु मिळुन आल्याने तसा सविस्तर पंचनाना ग्रेड पोलीस उपनिरिक्षक संजय पाटील यांनी केला आहे.
तसेच सदर इसमांजवळ विना परवाना अझी शय गैर कायदा गावठी कड्डा व दोन जियंत काडतुस, तसेच अंदाजे 1 ग्रॅम वजनाचा गांजा व गांजा
पिण्याचे साहीत्य मिळून आले आहेत त्याचे वर्णन खालील प्रमाणे.
1)15,000/- रुपये किंमतीचे एक गावठी बनावटीचे पिस्टल काळ्या व गंजलेल्या धातुचे त्याच्या मुठेवर लाल रंगाची पट्टी असलेली तसेच त्यावर काळ्या रंगाचा रटार असलेला त्यावर लावलेले मॅक्झीन सह जु.वा. कि.अ.
2)1000/-रुपये किमंतीचे दोन जिवंत काडतुस त्यावर पितळी रंगाचे कोटेड असलेले जु.वा.कि.अ. 3)100/- रुपये किमंतीचे अंदाजे 01 ग्रॅम वजनाचा गाजा व त्यास ओढण्यासाठी लागणारे दोन चिलम इत्यादी. एकूण 16,100/- रुपये
येणे प्रमाणे वरील वर्णनाचा व किंमतीचा गावठी कट्टा व दोन जिवंत काडतुस हे
1) साहील मोहम्मद तडवी (वय -22) वर्षे रा. मच्छी बाजार तांबापुरा ता. जि. जळगाव
2) दिपक शांताराम रेणुके (वय-21) वर्षे रा. शामाफायर गोडाऊन समोर तांबापुरा ता. जि. जळगाव याचे ताब्यात मिळुन आल्याने ग्रेड पोलीस उपनिरीक्षक संजय पाटील यांनी पंचासमक्ष सदरचा गावठी कट्टा लिफाफ्यात सिलबंद करुन त्यावर पंचाच्या व ग्रेड पोलीस उपनिरीक्षक संजय पाटील यांचे सहह्यांचे लेबल लावुन त्यावर पो. स्टे. चे लाखेचे सिल करुन सविस्तर पंचनामा जागीच पंचासमक्ष करून गावठी कट्टा व आरोपी मजकुर यास ताब्यात घेतले आहे. तसेच मा. जिल्हादंडाधिकारी सो. जळगाव यांचे कडील आदेशांन्वये शस्त्र, सोटे, भाले, तलवारी, बंदुका, सुरे, लाठया काठ्या किंवा शारीरीक दुखापती करण्यासाठी वापरात येतील अशी कोणतेही हत्यारे अथवा वस्तु घेवुन फिरण्यास मनाई असतांना देखील त्याचे कब्जात गैरकायदा विना परवाना वरील वर्णनाचा व किंमतीचा गावठी बनावटीचा कट्टा (अग्रिशस्त्र) बाळगतांना मिळून आले. म्हणुन माझी त्याचे विरुध्द भारतीय हत्यार अधिनियम कलम 3/25 सह मुंबई पोलीस अधिनियम 1951 चे कलम 37 (1) (3) चे उल्लंघन प्रमाणे कायदेशीर फिर्याद आहे.