एमआयडीसी पोलसांनी परजिल्ह्यातील आरोपी कडून पाच चोरीच्या मोटार सायकली केल्या हस्तगत..
जळगाव || दि .२२ डिसेंबर 2024 || (विठ्ठल भालेराव):- एमआयडीसी पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक संदीप पाटील यांना गुप्त माहिती मिळाली की अजिंठा चौकात एक इसम हाचोरीच्या मोटार सायकली विक्री साठी येणार आहे.
अशा गोपनीय बातमीनुसार गुन्हे शोध पथकाचे पोकॉ विशाल कोळी ,राहुल रगडे यांना माहिती काढण्याचे सांगितले. त्यांनी आपले कौशल्य पणाला लावून सोबत पोऊपनी राहुल तायडे, पाउपनि चंद्रकांत धनके,पोना योगेश बारी,पोकॉ फिरोज तडवी अशांसह अजिंठा चौफुली येथे साध्या वेषात थांबून दीपक प्रेमसिंग सोळंके रा वरठाण ता सोयगाव जि छत्रपती संभाजी नगर यास ताब्यात घेतले व त्याचे जवळ मिळून आलेल्या एच एफ डिलक्स कंपनीच्या मोसा बद्दल माहिती काढली असता तो उडवाउडवीची उत्तरे देत असल्याने सदर मोसा बाबत अधिक माहिती घेतली असता जिल्हा पेठ पोलिस स्टेशन येथे मोटार सायकल चोरीचा गुन्हा दाखल असल्याची माहिती मिळून आली .
यावरून दिपक सोळंके यास विश्वासात घेऊन विचारपूस केली असता त्याने अजून जळगांव शहरातून 03 , छत्रपती संभाजी नगर येथून 01 आणि अडावद येथून 01 अशा एकूण 05 मोटार सायकली चोरी केल्याची कबुली दिली. सदर मोसा ह्या त्याच्या कडून हस्तगत कऱण्यात आलेल्या आहेत.
खालील पोलिस स्टेशन हद्दीतील मोसा मिळून आलेल्या आहे.
1) हिरो एच एफ डिलक्स मो सा क्रं MH-19 DL-0980 चेसीस नं MBLHAR234J5J01493 जिल्हापेठ पो स्टे गुरनं 399/2024 BNS कलम 303( 2) प्रमाणे
2) हिरो एच एफ डिलक्स मोसा क्रं MH-19 CA-4293 चेसीस क्रं MBLHA11ALE9E27230 जळगांव शहर पो स्टे गूरनं 132/2024 भा द वि कलम 379 प्रमाणे
3) हिरो एच एफ डिलक्स मो सा क्रं MH-19 DH-6528 चेसीस नं MBLHAR239JHH04151 अडावद पो स्टे
4) हिरो एच एफ डिलक्स MH-18 AV-2312 चेसीस क्रं MBLHA11ATG9H37159 जळगाव शहर पो स्टे गुरनं 637/2024 बीएनएस कलम 303 (2) प्रमाणे
5) हिरो एच एफ डिलक्स MH-20 DZ-6817 चेसीस क्रं MBLHA11ATG9B38558 क्रांती चौक पो स्टे छ संभाजी नगर गुरनं 365/2024 बीएनएस कलम 303(2) प्रमाणे आहे.
सदरची कार्यवाही ही मा पोलिस अधिक्षक सो महेश्वर रेड्डी, मा अप्पर पोलीस अधीक्षक श्री अशोक नखाते, मा उपविभागीय पोलिस अधिकारी श्री संदीप गावीत, मा पोलिस निरीक्षक संदीप पाटील यांचे मार्गदर्शना खाली पाउपनि राहुल तायडे, पोउपनि चंद्रकांत धनके, पोना योगेश बारी, पोकॉ राहुल रगडे, विशाल कोळी, फिरोज तडवी यांनी केलेली आहे. आरोपितास जळगांव शहर पोलीस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आले आहे.