अल्पसंख्याक शाळांसाठी मोठी संधी!
शाळांच्या पायाभूत सुविधांसाठी अनुदान आता 10 लाख रुपयांपर्यंत!
नंदुरबार दि. १८ फेब्रुवारी ( फिरोज खान ) :-
शासनाने अल्पसंख्याक विद्यार्थ्यांच्या शिक्षणाच्या विकासासाठी मोठा निर्णय घेतला आहे.
अनुदान योजनेत भरीव वाढ करत रुपये 2 लाखांवरून आता 10 लाख रुपयांपर्यंत निधी मंजूर करण्यात आला आहे.
कोणत्या शाळांना मिळणार लाभ?
✔ शासकीय अनुदानित/विना अनुदानित/ कायम विना अनुदानित शाळा
✔ कनिष्ठ महाविद्यालय
✔ औद्योगिक प्रशिक्षण संस्था
✔ नगरपालिका/नगरपरिषद शाळा
✔ अपंग शाळा
अर्ज करण्याची अंतिम तारीख: 22 फेब्रुवारी 2025
अर्ज सादर करण्याचे ठिकाण:
जिल्हा नियोजन अधिकारी व जिल्हा अल्पसंख्यांक अधिकारी,
जिल्हा नियोजन समिती, जिल्हाधिकारी कार्यालय, नंदुरबार.
इच्छुक शाळांनी त्वरित आपले प्रस्ताव सादर करावेत आणि या सुवर्णसंधीचा लाभ घ्यावा!
