धुळे स्थानिक गुन्हे शाखा यांच्याकडून सांगवी गावाजवळ बेकायदेशीर दारू विक्री करणाऱ्यास अटक….

धुळे/ शिरपूर || दि. १२ मे २०२५ || {समीर शेख} -: धुळे स्थानिक गुन्हे शाखा यांना गुप्त बातमी आधारे राष्ट्रीय महामार्ग क्रंमाक ३ सांगवी गावाच्या पुढे पनाखेड गावाच्या जवळ आशीर्वाद हॉटेलच्या बाजूला बेकायदेशीरपणे देशी दारु विक्री होत असल्याची माहिती मिळाली.

त्याचे आधारे पोहेकॉ 1004 आरिफ रमजान पठाण वय 38 नेमणूक स्थानिक गुन्हे शाखा, यांच्या सोबत दि.०७/०५/२०२५ रोजी व पोसई अमित माळी, पोहेकॉ पवन गवळी, पोकॉ राहुल गिरी, पोकॉ कमलेश सुर्यवंशी पोकॉ/जगदिश सुर्यवंशी, चापोकॉ/गुलाब पाटील असे शिरपुर गांवाकडे सरकारी वाहन क्रमांक एम.एच.१२. आर वाय ४७११ या वाहनाने पेट्रोलिंग करीता होते तेव्हा मा.पोसई अमित माळी यांना गुप्त बातमी मिळाली होती की, राष्ट्रीय महामार्ग क्रंमाक 3 सांगवी गावाच्या पुढे पनाखेड गावाच्या अगोदर आशीर्वाद हॉटेलच्या बाजूला देशी दारु कब्ज्यात बाळगुन तिची चोरटी विक्री करीत आहे.

अशी खबर त्यांना मिळाल्याने सदरील खबरची खात्री करुन कायदेशिर कारवाई करणे कामी वरील सर्व पो. कर्मचारी आशीर्वाद हॉटेल जवळ १७:४५ वाजता पोहोचून तेथे पंचाना बोलावुन त्यांना मिळालेल्या माहितीच्या आधारे हकीकत कळविल्या नंतर ते पंच म्हणुन हजर राहण्यास स्वखुशीने तयार झाल्याने सदरील ठिकाणी एक इसम नमुद ठिकाणी त्याच्या कडील प्लॉस्टीक पिशवीत काही तरी घेवून बसलेला दिसून आला. त्याचेवर पंचासमक्ष १७:४५ वाजता छापा टाकून जागीच पकडले व त्यास पंचासमक्ष नांव गांव विचारता त्याने त्याचे नांव अब्बास अली ईरानी वय 35 रा देवजिरी, ईरानी कॉलनी नगर पालिका सेंधवा तहसील सेंधवा जि. बडवानी असे सांगीतले त्याचे कब्जात खालील वर्णनाचा दारुबंदी गुन्हयाचा माल व रोख रुपये मिळून आले ते, 1)१४००/- रु. किं.चे देशी दारु टँगो पंच त्यात १८० ml चे एकुण २० काचेची बॉटल, प्रत्येकी बॉटल ७० रु किं चे एकुण १४००/- रु. येणे प्रमाणे सदर इसमाच्या कब्ज्यात वरील वाहनात बेकायदेशिर रित्या देशी दारु मिळून आल्याने ते जप्त केले.

जप्त मुद्देमालातुन प्रत्येकी एक एक बाटली असे सी.ए. नमुन्यासाठी काढून त्यावर पंचाचे व पोहेका/२५७ पवन गवळी यांचे सहीचे कागदी लेबल जागीच लावण्यात येवून वरील इसमास मुद्देमालासह दारुबंदी गुन्हयाकामी जागीच ताब्यात घेतले. व नंतर आरोपी विरुध्द महाराष्ट्र दारु बंदी कायदा कलम ६५ (ई) प्रमाणे कायदेशिर करण्यात आली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Call Us