कर्नाटक दि.१३ जुलै २०२४-: जन्म देणाऱ्या पिताने मुलीच्या नात्याला काळिमा फासणारी धक्कादायक घटना कर्नाटकमधील उडुपी येथे घडली. येथे मुलीच्या प्रेमप्रकरणामुळे नाराज झालेल्या एका जन्मदात्याने त्याच्या मुलीचे खासगी व्हिडीओ आणि फोटो सोशल मीडियावर व्हायरल केले असुन या घटनेमुळे धक्का बसलेल्या मुलीने फिनाईल प्राशन करून जीवन संपवण्याचा प्रयत्न केले. पण वेळीच उपचार झाल्याने मुलगी वाचली आता त्या मुलीवर रुग्णालयात उपचार सुरू असून त्याच वेळी पीडितेच्या आईने पोलिसांना दिलेल्या तक्रारीवरून त्या जन्मदात्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पुढील माहिती अशी की उडुपीच्या सीईएन पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहणाऱ्या एका व्यक्तीच्या मुलीचं तीर्थ हल्लीमध्ये राहणाऱ्या एका नातेवाईकासोबत प्रेमप्रकरण सुरू होतं. दोघेही एकमेकांना नियमितपणे भेटायचे. मात्र हे नातं मुलीच्या वडिलांना अमान्य होतं. त्यांनी मुलीला याबाबत अनेकवेळी समजावून दमदाटी सुद्धा केली.
परंतु सज्ञान असल्याने मुलीने त्याच मुलासोबत लग्न करण्याचा तगादा लावला होता. त्यामुळे हे वडील संतप्त झाले होते. काही दिवसांपूर्वी या मुलीच्या वडिलांनी तिच्या प्रिसकराला घरी बोलावून समजावे होते. व कधी कधी त्याला मारहाण सुद्धा केली.
इथेच न थांबता मुलीच्या वडिलांनी त्याचा मोबाईल हिसवाकून घेतले त्यामध्ये असलेले मुलीचे प्रायव्हेट फोटो आणि व्हिडीओ काढून घेतले. नंतर ते सोशल मीडियावर शेअर केले. एवढंच नाही तर त्यांनी मुलगी आणि पत्नीला सुद्धा मारहाण केली. त्यात हे दोघेही जखमी झाले. तसेच हे फोटो सोशल मीडियावर शेअर केल्याने मुलीला धक्का बसला. त्यानंतर या तरुणीने फिनाईल पिऊन घेतलं आणी जीवन संपवण्याचा प्रयत्न केला.
तिच्या आईने तिला वेळीच रुग्णालयात नेले. सध्या तिची प्रकृती स्थिर असली तरी चिंताजनक आहे. पीडितेच्या आईने दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपी वडिलांन विरोधात गुन्हा दाखल केला असुन आहे. पुढील अधिक तपास सीईएन पोलीस ठाण्याच्या पोलीस करीत आहे.