Crime Fir News – Crime Fir News https://crimefirnews.com Online Sat, 24 Oct 2026 17:07:23 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=7.1.3 https://crimefirnews.com/wp-content/uploads/2024/06/cropped-cRIME-LOGO-1-1-32x32.png Crime Fir News – Crime Fir News https://crimefirnews.com 32 32 पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत जीवघेणा हल्ला; आरोपी पतीला जन्मठेप…. https://crimefirnews.com/2255/ Sat, 24 Oct 2026 17:07:16 +0000 https://crimefirnews.com/?p=2255 पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत जीवघेणा हल्ला; आरोपी पतीला जन्मठेप…. नंदुरबार || दि २४ ऑक्टॉबर २०२६ || (फिरोज खान) :- शहादा : पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेऊन […]

]]>
पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत जीवघेणा हल्ला; आरोपी पतीला जन्मठेप….

नंदुरबार || दि २४ ऑक्टॉबर २०२६ || (फिरोज खान) :- शहादा : पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेऊन तिच्यावर जीवघेणा हल्ला करून तिच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेल्या आरोपी पतीला शहादा येथील न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. न्यायालयाने आरोपीला १३ हजार रुपयांचा दंडही ठोठावला आहे. शहादा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील ब्राह्मणपुरी येथील या प्रकरणात विलास अंबर ठाकरे याने पत्नी राधाबाई हिच्या चारित्र्यावर संशय घेत तिच्याशी वारंवार वाद घातल्याचे तपासात समोर आले होते. दारूच्या व्यसनामुळेही पती-पत्नीमध्ये वाद होत असल्याचे पोलिस तपासात निष्पन्न झाले.

२७ ऑगस्ट २०१८ रोजी राधाबाई यांच्यावर लोखंडी भाल्याने हल्ला झाल्याची माहिती कुटुंबीयांना मिळाली. त्यानंतर पोलिसांनी आरोपी विलास अंबर ठाकरे याच्याविरुद्ध भारतीय दंड विधानाच्या कलम ३०२ व ३२४ अन्वये गुन्हा दाखल केला. तत्कालीन पोलीस उपनिरीक्षक दीपक बागुल यांनी तपास करून आरोपीविरुद्ध दोषारोपपत्र न्यायालयात दाखल केले.

या खटल्याची सुनावणी शहादा येथील अतिरिक्त सत्र न्यायालयात झाली. सरकारी पक्षातर्फे साक्षीदार, डॉक्टर, तपास अधिकारी तसेच पीडितेच्या मुलींच्या साक्षी महत्त्वपूर्ण ठरल्या. उपलब्ध पुराव्यांच्या आधारे न्यायालयाने आरोपी विलास अंबर ठाकरे याला दोषी ठरवत जन्मठेप आणि १३ हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. या प्रकरणातील कामकाजासाठी सरकारी अभियोक्ता अॅड. स्वर्णसिंह गिरासे यांनी बाजू मांडली. तपास व न्यायालयीन कामकाजाबद्दल नंदुरबार जिल्हा पोलीस अधीक्षक अश्विनी सानप, अपर पोलीस अधीक्षक आशित कांबळे आणि शहादा उपविभागीय पोलीस अधिकारी गुलाबराव पाटील यांनी संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांचे अभिनंदन केले.

]]>
१७ गुन्हे दाखल असलेला सराईत चोरटा जाळ्यात : ४७ हजारांचा मुद्देमाल जप्त…. https://crimefirnews.com/2252/ Thu, 22 Oct 2026 14:52:35 +0000 https://crimefirnews.com/?p=2252 १७ गुन्हे दाखल असलेला सराईत चोरटा जाळ्यात : ४७ हजारांचा मुद्देमाल जप्त…. नंदुरबार || दि : २२ ऑकटोबर २०२६ || (फिरोज खान) :- नंदुरबार शहरात […]

]]>
१७ गुन्हे दाखल असलेला सराईत चोरटा जाळ्यात : ४७ हजारांचा मुद्देमाल जप्त….

नंदुरबार || दि : २२ ऑकटोबर २०२६ || (फिरोज खान) :- नंदुरबार शहरात घरफोडी व चोरीच्या गुन्ह्यांचा तपास करताना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने १७ गुन्हे दाखल असलेल्या सराईत आरोपीला ताब्यात घेत दोन गुन्ह्यांची उकल केली आहे. आरोपीकडून दोन मोबाईल फोन आणि एक मोटार सायकल असा एकूण ४७ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

नंदुरबार शहरातील प्लॉट क्रमांक ४१, योगेश्वर कॉलनी, नव्हा रोड परिसरात १८ सप्टेंबरच्या रात्री घरफोडीची घटना घडली होती. अज्ञात चोरट्याने घराचा दरवाजा तोडून घरातील लॉकरमधून सुमारे ३० हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने आणि १२ हजार रुपये किमतीचा मोबाईल चोरून नेला होता. याप्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

या गुन्ह्याचा तपास सुरू असताना स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अभिषेक पाटील यांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार संशयित आरोपी प्रविण लोटन कोळी, रा. सुटकार, ता. चोपडा, जि. जळगाव याला ताब्यात घेण्यात आले. चौकशीत आरोपीने नंदुरबार शहरातील दाखल गुन्ह्याची कबुली दिल्याचे पोलिसांनी सांगितले. तसेच चोरीस गेलेल्या मुद्देमालाबाबत विचारणा केली असता त्याच्या खिशातून दोन मोबाईल फोन मिळून आले. त्यापैकी एक मोबाईल नंदुरबार येथून चोरी केल्याची माहिती त्याने दिली.

दरम्यान, आरोपीच्या ताब्यातील मोटारसायकल बाबत चौकशी केली असता ती मोटारसायकल नंदुरबार शहरातून १५ ते २० दिवसांपूर्वी चोरी केल्याचे त्याने सांगितले.

या प्रकरणी गुन्हे अभिलेखाची पडताळणी केली असता उपनगर पोलीस ठाण्यात गु.र.नं. ३८९/२०२६ अन्वये गुन्हा दाखल असल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार आरोपीकडून २२ हजार रुपये किमतीचे दोन मोबाईल आणि २५ हजार रुपये किमतीची मोटारसायकल, असा एकूण ४७ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

पोलिसांच्या माहितीनुसार, आरोपी प्रविण लोटन कोळी याच्याविरुद्ध चोपडा व अमळनेर परिसरात यापूर्वी १७ मालमत्तेविरुद्धचे गुन्हे दाखल आहेत. तसेच त्याच्यासोबत असलेल्या राहुल उर्फ भावशा बळीराम बावीस्कर याच्याविरुद्धही अमळनेर पोलीस ठाण्यात यापूर्वी खुनाचा गुन्हा दाखल असल्याचे निष्पन्न झाले आहे.

ही कारवाई नंदुरबार जिल्ह्याच्या पोलीस अधीक्षक अश्विनी सानप व अपर पोलीस अधीक्षक अशित कांबळे यांच्या मार्गदर्शना खाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अभिषेक पाटील, पोलीस उपनिरीक्षक महेश निकम, विकास गुंजाळ तसेच पोलीस हवालदार आणि अंमलदारांच्या पथकाने केली.

]]>
घरफोडी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश; ५ आरोपी जेरबंद, २ अल्पवयीन ताब्यात…. https://crimefirnews.com/2248/ Mon, 19 Oct 2026 14:07:12 +0000 https://crimefirnews.com/?p=2248 घरफोडी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश; ५ आरोपी जेरबंद, २ अल्पवयीन ताब्यात…. २ लाख ५६ हजार ६०० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत; गावठी कट्टा व दोन जिवंत काडतुसेही जप्त […]

]]>
घरफोडी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश; ५ आरोपी जेरबंद, २ अल्पवयीन ताब्यात….

२ लाख ५६ हजार ६०० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत; गावठी कट्टा व दोन जिवंत काडतुसेही जप्त

नंदुरबार || दि.१९ ऑक्टोबर २०२६ || ( फिरोज खान ) :- नंदुरबार शहरात घरफोडीच्या गुन्ह्यांमध्ये सक्रिय असलेल्या टोळीचा स्थानिक गुन्हे शाखेने पर्दाफाश केला आहे. पोलिसांनी ५ आरोपींना अटक करून २ अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतले असून, त्यांच्याकडून एकूण २ लाख ५६ हजार ६०० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. यामध्ये रोकड, चांदीचे शिक्के, मोबाईल, मोटारसायकल तसेच गुन्ह्यात वापरलेला २५ हजार रुपये किमतीचा गावठी बनावटीचा लोखंडी गावठी कट्टा आणि ४ हजार रुपये किमतीची दोन जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली आहेत.

नंदुरबार शहर पोलीस ठाणे गुरनं. ८२२/२०२६ तसेच उपनगर पोलीस ठाणे गुरनं. ३८२/२०२६ अंतर्गत दाखल घरफोडीच्या गुन्ह्यांचा तपास स्थानिक गुन्हे शाखेकडून सुरू होता.

नंदुरबार जिल्ह्याच्या पोलीस अधीक्षक अश्विनी सानप यांनी मालमत्तेविरुद्धच्या गुन्ह्यांचा आढावा घेत आरोपींना जेरबंद करून मुद्देमाल हस्तगत करण्याच्या सूचना स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अभिषेक पाटील यांना दिल्या होत्या. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने तपासाची चक्रे फिरवत संशयितांचा शोध घेतला. तपासादरम्यान मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे परेश ऊर्फ लल्ला रवी वळवी, दर्शन ऊर्फ लकी प्रविण चौधरी, विक्की ऊर्फ मिक्की रायसिंग तडवी, रघुवीर ऊर्फ रघु गंगाराम पाडवी आणि राजन रायसिंग पाडवी या संशयितांची चौकशी करण्यात आली. चौकशीत आरोपींनी घरफोडीच्या गुन्ह्यांमध्ये सहभाग असल्याची कबुली दिल्याचे पोलिसांनी सांगितले.

त्यानंतर पोलिसांनी त्यांच्या ताब्यातून १ लाख ७४ हजार ४०० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला. यामध्ये ९० हजार रुपये रोख, २२ ग्रॅम वजनाचे चांदीचे शिक्के, तसेच गुन्ह्यात वापरलेली दोन मोटारसायकल वाहने यांचा समावेश आहे. तसेच उपनगर पोलीस ठाणे गुरनं. ३८२/२०२६ मधील चोरीच्या मुद्देमालापैकी ३२ हजार २०० रुपये किमतीची विदेशी दारू, १० हजार रुपये किमतीचा मोबाईल आणि ४० हजार रुपये किमतीची मोटारसायकल, असा एकूण ८२ हजार २०० रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला.

दरम्यान, दोन्ही गुन्ह्यांतील एका विधी संघर्षग्रस्त बालकाकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे त्याच्या ताब्यातून २५ हजार रुपये किमतीचा देशी बनावटीचा लोखंडी गावठी कट्टा आणि ४ हजार रुपये किमतीची दोन जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली. याप्रकरणी तळोदा पोलीस ठाण्यात भारतीय हत्यार कायद्यान्वये स्वतंत्र गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.

या कारवाईत ५ आरोपी आणि २ विधी संघर्षग्रस्त बालकांकडून दोन्ही गुन्ह्यांतील मिळून २ लाख ५६ हजार ६०० रुपयांचा मुद्देमाल, तसेच गावठी कट्टा व दोन जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली आहेत. ही कारवाई पोलीस अधीक्षक अश्विनी सानप, अपर पोलीस अधीक्षक अशित कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अभिषेक पाटील, पोलीस उपनिरीक्षक महेश निकम, विकास गुंजाळ तसेच तळोदा पोलीस ठाण्याच्या पथकाने केली.

]]>
लोकशाही पत्रकार महासंघाच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी किशोर दादा पवार यांची सर्वानुमते निवड… https://crimefirnews.com/2245/ Sun, 18 Oct 2026 17:27:15 +0000 https://crimefirnews.com/?p=2245 लोकशाही पत्रकार महासंघाच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी किशोर दादा पवार यांची सर्वानुमते निवड… जळगांव || दि.१८ ऑक्टॉबर २०२६ || (हमीद तडवी):- राष्ट्रीय निवड समिती आणि महाराष्ट्र प्रदेश […]

]]>
लोकशाही पत्रकार महासंघाच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी किशोर दादा पवार यांची सर्वानुमते निवड…

जळगांव || दि.१८ ऑक्टॉबर २०२६ || (हमीद तडवी):- राष्ट्रीय निवड समिती आणि महाराष्ट्र प्रदेश कोअर कमिटीची संयुक्त मान्यता; पत्रकारांच्या न्याय्य हक्कांसाठी लढा आणि राज्यभर मजबूत संघटन उभारण्याचा निर्धार लोकशाही पत्रकार महासंघ, भारताच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी किशोर दादा पवार यांची सर्वानुमते निवड करण्यात आली आहे.

महासंघाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या मान्यतेने राष्ट्रीय निवड समिती तसेच महाराष्ट्र प्रदेश कोअर कमिटीने त्यांच्या नावावर एकमताने शिक्कामोर्तब केले. या निवडीमुळे महाराष्ट्रातील पत्रकारांचे प्रश्न प्रभावीपणे मांडणे तसेच राज्यभर संघटनेचा विस्तार करण्याची महत्त्वपूर्ण जबाबदारी त्यांच्यावर सोपविण्यात आली आहे.

या निवड प्रक्रियेत महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष संदीप जाधव, राष्ट्रीय कार्यकारिणीचे प्रमुख सदस्य तथा निवृत्त न्यायाधीश डॉ. संतोषकुमार जयस्वाल, राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रतापराव साळुंखे, राष्ट्रीय महामंत्री टी. माधव, राष्ट्रीय संघटनमंत्री ज्ञानेश्वरजी बुधवंत, राष्ट्रीय कायदेशीर सल्लागार ॲड. रमाकांत पाटील तसेच महाराष्ट्र प्रदेश कोअर कमिटीचे सदस्य डॉ. अनिलजी पाटील, सनम पाटील, हलीमा ताई शेख, पंचशीला कांबळे आणि रेणुकाताई जयस्वाल यांनी त्यांच्या निवडीला सर्वानुमते मान्यता दिली. किशोर दादा पवार गेल्या सहा ते सात वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात सक्रिय आहेत. जनहिताचे प्रश्न, ग्रामीण भागातील समस्या, सर्वसामान्य नागरिकांचे प्रश्न तसेच शासन-प्रशासनाशी संबंधित विविध विषयांना त्यांनी सातत्याने वाचा फोडली आहे.

राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातील अनुभवाच्या बळावर त्यांनी विविध स्तरांवर संघटनात्मक कार्य केले असून, या अनुभवाचा उपयोग महासंघाच्या विस्तारासाठी केला जाणार आहे. महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष म्हणून राज्यातील प्रत्येक विभाग, जिल्हा आणि तालुका स्तरावर महासंघाचे मजबूत संघटन उभारणे, पत्रकारांना एकत्र आणणे, त्यांच्या न्याय्य हक्कांसाठी लढा देणे, पत्रकारांच्या अडचणींचा पाठपुरावा करणे आणि आवश्यकतेनुसार कायदेशीर मार्गदर्शन उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करणे, यावर त्यांचा विशेष भर राहणार आहे. तसेच पत्रकारांना लागू असलेल्या शासकीय योजना, विमा, आरोग्य सुविधा आणि इतर पात्रताधारित लाभांची माहिती तळागाळातील पत्रकारांपर्यंत पोहोचविण्यासाठी संबंधित विभागांशी समन्वय साधण्याचा त्यांचा मानस आहे.

“लोकशाही पत्रकार महासंघ हा पत्रकार आणि शासन-प्रशासन यांच्यातील प्रभावी दुवा म्हणून काम करेल. महाराष्ट्रातील पत्रकारांचे प्रश्न संघटितपणे मांडून त्यांच्या न्याय्य हक्कांसाठी सातत्याने पाठपुरावा केला जाईल. राज्यभर सक्षम संघटनात्मक जाळे उभारून प्रत्येक पत्रकाराला संघटनेच्या माध्यमातून आधार आणि योग्य मार्गदर्शन मिळवून देण्यासाठी आम्ही प्रयत्नशील राहू,” अशी भूमिका नवनिर्वाचित प्रदेशाध्यक्ष किशोर दादा पवार यांनी व्यक्त केली. किशोर दादा पवार हे सेवा सोशल वेल्फेअर ग्लोबल फाउंडेशनचे संस्थापक- अध्यक्ष असून, संस्थेच्या माध्यमातून महिला सक्षमीकरण, रोजगाराभिमुख प्रशिक्षण, स्वयंरोजगार आणि विविध सामाजिक उपक्रमांसाठी ते कार्यरत आहेत. पत्रकारिता, सामाजिक कार्य आणि संघटनात्मक नेतृत्व या क्षेत्रांतील अनुभवाच्या आधारे पत्रकारांच्या प्रश्नांना प्रभावी व्यासपीठ मिळवून देण्याचा त्यांचा संकल्प आहे.

किशोर दादा पवार यांच्या निवडीमुळे लोकशाही पत्रकार महासंघाच्या महाराष्ट्रातील संघटनात्मक विस्ताराला नवी दिशा मिळेल आणि पत्रकारांच्या हक्कांसाठी अधिक प्रभावीपणे कार्य करण्यास बळ मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

]]>
कोठारी इंटरनॅशनल ड्रीम स्कूलमध्ये किशोरवयीन मुलींसाठी जनजागृती सत्र उत्साहात संपन्न… https://crimefirnews.com/2242/ Sun, 18 Oct 2026 04:55:45 +0000 https://crimefirnews.com/?p=2242 विद्यार्थिनी व मातांना शारीरिक, भावनिक बदल आणि आरोग्यविषयक काळजीबाबत तज्ज्ञांचे मार्गदर्शन.. जालना || दि.१८ ऑक्टोबर २०२६ || (स्वरूप गुर्बानी) किशोरवयीन वय हा मुलींच्या आयुष्यातील अत्यंत […]

]]>
विद्यार्थिनी व मातांना शारीरिक, भावनिक बदल आणि आरोग्यविषयक काळजीबाबत तज्ज्ञांचे मार्गदर्शन..

जालना || दि.१८ ऑक्टोबर २०२६ || (स्वरूप गुर्बानी) किशोरवयीन वय हा मुलींच्या आयुष्यातील अत्यंत महत्त्वाचा टप्पा असून, या काळात होणारे शारीरिक आणि भावनिक बदल समजून घेणे आवश्यक आहे. याच उद्देशाने जालना येथील कोठारी इंटरनॅशनल ड्रीम स्कूलमध्ये इयत्ता सातवी ते दहावीच्या विद्यार्थिनी आणि त्यांच्या मातांसाठी ‘वाढतं वय : किशोरवयीन मुलींमधील शारीरिक आणि भावनिक बदल समजून घेताना’ या विषयावर विशेष जनजागृती सत्राचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमाला विद्यार्थिनी आणि त्यांच्या मातांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

या सत्रात प्रसिद्ध तज्ज्ञ डॉ. मोनिका मगरे आणि डॉ. आंचल भक्कड यांनी उपस्थित विद्यार्थिनी व मातांना किशोरवयीन वयात होणारे शारीरिक बदल, वैयक्तिक स्वच्छता, आरोग्याची काळजी, भावनिक स्वास्थ्य आणि स्वतःची काळजी घेण्याचे महत्त्व याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. किशोरवयात शरीरात होणारे बदल ही नैसर्गिक प्रक्रिया असून, त्याबाबत भीती किंवा संकोच न बाळगता योग्य माहिती मिळवणे आणि आरोग्याची काळजी घेणे आवश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

शारीरिक आणि भावनिक बदलांविषयी शास्त्रोक्त मार्गदर्शन

किशोरवयात मुलींना अनेक शारीरिक आणि मानसिक बदलांना सामोरे जावे लागते. या बदलांमुळे त्यांच्या मनात विविध प्रश्न आणि संभ्रम निर्माण होऊ शकतात. अशा परिस्थितीत योग्य माहिती, समजूतदारपणा आणि विश्वासपूर्ण संवाद यांना विशेष महत्त्व असते. हे लक्षात घेऊन तज्ज्ञांनी मुलींना त्यांच्या वयात होणाऱ्या बदलांची माहिती सोप्या आणि सहज समजणाऱ्या भाषेत दिली.

तसेच वैयक्तिक स्वच्छता राखणे, संतुलित आहार घेणे, आरोग्यदायी सवयी जोपासणे, भावनिक बदल समजून घेणे आणि स्वतःच्या आरोग्याला प्राधान्य देणे याविषयीही मार्गदर्शन करण्यात आले. किशोरवयीन मुलींनी मनात निर्माण होणाऱ्या शंकांचे निरसन करण्यासाठी आई-वडील, शिक्षक किंवा तज्ज्ञांशी मोकळेपणाने संवाद साधावा, असेही या सत्रातून अधोरेखित करण्यात आले.

आई आणि मुलीतील संवाद महत्त्वाचा

या उपक्रमाचे एक महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे विद्यार्थिनींना त्यांच्या मातांसह उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले होते. शाळेचे प्राचार्य श्री. अरुणकुमार एच. पवार आणि उपप्राचार्या सौ. सरोज कोरे यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत अनेक विद्यार्थिनी आपल्या मातांसह या सत्रात सहभागी झाल्या.

किशोरवयीन मुलींच्या आयुष्यात आईची भूमिका अत्यंत महत्त्वाची असते. या वयात मुलींना केवळ शारीरिक बदलांची माहिती देणे पुरेसे नसून, त्यांच्या भावना समजून घेणे, त्यांच्या प्रश्नांना संयमाने उत्तरे देणे आणि त्यांना मानसिक आधार देणेही आवश्यक आहे. आई आणि मुलगी यांच्यातील नाते अधिक विश्वासपूर्ण व संवादपूर्ण व्हावे, यासाठी अशा उपक्रमांची आवश्यकता असल्याचे या कार्यक्रमातून अधोरेखित झाले.

विद्यार्थिनींच्या सर्वांगीण विकासासाठी शाळेचा पुढाकार

या विशेष जनजागृती सत्राचे आयोजन शाळेचे अध्यक्ष श्री. विनयकुमार कोठारी, सचिव श्री. प्रसन्नकुमार कोठारी आणि संचालिका सौ. तृप्ती प्रसन्नकुमार कोठारी यांच्या प्रेरणेने व मार्गदर्शनाखाली करण्यात आले.

विद्यार्थिनींच्या शैक्षणिक प्रगतीसोबतच त्यांचे शारीरिक आरोग्य, भावनिक स्वास्थ्य आणि व्यक्तिमत्त्व विकास यांनाही महत्त्व देणे गरजेचे आहे. या दृष्टिकोनातून आयोजित करण्यात आलेल्या सत्रामुळे विद्यार्थिनी आणि त्यांच्या मातांना किशोरवयीन बदलांविषयी योग्य माहिती मिळण्यास मदत झाली.

अशा जनजागृतीपर उपक्रमांमुळे मुलींमध्ये आरोग्याविषयी जागरूकता निर्माण होण्यासोबतच आई-मुलगी यांच्यातील संवाद अधिक सुसंवादी होण्यास मदत होते. कोठारी इंटरनॅशनल ड्रीम स्कूलने राबविलेल्या या उपक्रमाचे सर्व स्तरांतून कौतुक होत असून, विद्यार्थिनींच्या सर्वांगीण विकासासाठी शाळेने घेतलेला हा पुढाकार महत्त्वपूर्ण मानला जात आहे.

]]>
दिवसाढवळ्या घरफोडी करणारे इंदूरचे सख्खे भाऊ; मुख्य आरोपी ताब्यात, ५.६९ लाखांचे सोने-चांदी जप्त https://crimefirnews.com/2238/ Thu, 15 Oct 2026 15:04:13 +0000 https://crimefirnews.com/?p=2238 चाळीसगावरोड पोलिसांत गु.र.नं. २८८/२०२६; देवासमधील कारागिराकडून सोन्याची लगड, टोंगल व चांदीची लगड हस्तगत; फरार जावेदचा शोध सुरू धुळे। काकर वाहिदशिंदेनगर, धुळे येथील शिव वसंत अपार्टमेंट, […]

]]>
चाळीसगावरोड पोलिसांत गु.र.नं. २८८/२०२६; देवासमधील कारागिराकडून सोन्याची लगड, टोंगल व चांदीची लगड हस्तगत; फरार जावेदचा शोध सुरू

धुळे। काकर वाहिद
शिंदेनगर, धुळे येथील शिव वसंत अपार्टमेंट, राधेराधे अपार्टमेंट समोर राहणारे फिर्यादी श्री. प्रणय राजेंद्र खंडेलवाल यांच्या घरात ७ ऑक्टोबर २०२६ रोजी दुपारी २ ते ३.३० या दरम्यान अज्ञात चोरट्याने लॉकरमधील एकूण ४,१२,६०० रुपये किमतीचे सोने-चांदीचे दागिने व रोख रक्कम चोरून नेली होती. याप्रकरणी चाळीसगावरोड पोलीस ठाण्यात गु.र.नं. २८८/२०२६ अन्वये BNS कलम ३०५(अ), ३३१(३) नुसार दिवसा घरफोडी चोरीचा गुन्हा दाखल होता.

सदर गुन्ह्याचा स्थानिक गुन्हे शाखा, धुळे यांच्याकडून समांतर तपास सुरू असताना, पोलीस निरीक्षक श्री. ज्ञानेश्वर वारे, प्रभारी अधिकारी, स्थानिक गुन्हे शाखा, धुळे यांच्या सूचना व मार्गदर्शनानुसार करण्यात आलेल्या तांत्रिक विश्लेषणातून महत्त्वाची माहिती समोर आली. त्यानुसार (१) अकरम अब्दुल गफार अब्बासी, वय ४५, रा. ९८, श्रीनगर काकड, पो. एम.आय.जी. इंदूर (मध्यप्रदेश) व त्याचा सख्खा भाऊ (२) जावेद अब्दुल गफार अब्बासी, रा. मदीना नगर, आजादनगर, इंदूर (मध्यप्रदेश) यांनी दिवसा घरफोडी केल्याचे निष्पन्न झाले. दोन्ही आरोपी त्यांच्या घरीच असल्याची माहिती मिळाल्यानंतर पथक इंदूरकडे रवाना करण्यात आले.

पथकाने इंदूर येथे जाऊन मुख्य आरोपी अकरम अब्दुल गफार अब्बासी यास ताब्यात घेतले. सखोल विचारपूस केली असता, त्याने आपला भाऊ जावेद अब्दुल गफार अब्बासी याच्यासोबत घरफोडी केल्याची कबुली दिली. जावेद हा बाहेरगावी गेल्याचे त्याने सांगितले. ताब्यातील आरोपी अकरम याच्याकडे चोरीच्या मुद्देमालाबाबत अधिक विचारपूस केली असता, त्याने चोरी केलेले सोने-चांदीचे दागिने दागिने बनविणारा कारागीर (३) शेख बासेद शेख सबुर, वय ५१, रा. ७७/१, रजपाली मार्ग, देवास, ता. नाहर दरवाजा (मध्यप्रदेश) यास विक्री केल्याचे सांगितले.

लागलीच पथकाने आरोपीसह देवास येथे जाऊन शेख बासेद शेख सबुर याच्याकडे विचारपूस केली असता, त्याने नमूद सोने-चांदीचे दागिने विकत घेतल्याचे सांगून सोने-चांदीच्या दागिन्यांची लगड व टोंगल काढून दिली. त्यानुसार हस्तगत करण्यात आलेला मुद्देमाल खालीलप्रमाणे :

मुद्देमालाचे वर्णन किंमत
१ ६.०६ ग्रॅम सोन्याचे टोंगल ७१,००० रु.
२ २५ ग्रॅम सोन्याची लगड वजा गोळी ३,३०,७५० रु.
३ १३०० ग्रॅम चांदीची लगड १,६७,७०० रु.
एकूण —५,६९,४५० रु.जप्त केले

अशा प्रकारे तांत्रिक विश्लेषणाद्वारे दिवसा घरफोडी करणारे दोन आरोपी निष्पन्न करून, मुख्य आरोपी तसेच चोरीचे दागिने खरेदी करणाऱ्या कारागिरासह एकूण ५,६९,४५० रुपये किमतीचे सोने-चांदीची लगड व सोन्याचे टोंगल ताब्यात घेण्यात आले. त्यामुळे चाळीसगावरोड पोलीस ठाणे गु.र.नं. २८८/२०२६ BNS कलम ३०५(अ), ३३१(३) नुसारचा दिवसा घरफोडी चोरीचा गुन्हा उघडकीस आणला आहे. फरार आरोपी जावेद अब्दुल गफार अब्बासी याचा शोध सुरू आहे.

सदर कामगिरी पोलीस अधीक्षक विशाल आनंद सिंगुरी तसेच अपर पोलीस अधीक्षक अजय देवरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक श्री. ज्ञानेश्वर वारे (प्रभारी अधिकारी, स्थानिक गुन्हे शाखा, धुळे), सपोनि. दीपक ढोके, पोउनि. अमरजित मोरे, पोउनि. धनंजय मोरे आणि पोलीस अंमलदार प्रल्हाद वाघ, दिनेश परदेशी, देवेंद्र ठाकुर, महेंद्र सपकाळ, हर्षल चौधरी, अमोल पाटील, अमोल जाधव व सिद्धार्थ निकम यांनी केली आहे.

]]>
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई; राज्य कर निरीक्षकाकडून ५० हजारांची लाच स्वीकारली…. https://crimefirnews.com/2235/ Fri, 09 Oct 2026 08:41:49 +0000 https://crimefirnews.com/?p=2235 लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई; राज्य कर निरीक्षकाकडून ५० हजारांची लाच स्वीकारली…. नंदुरबार || दि. ०९ ऑक्टॉबर २०२६ || (फिरोज खान) :- राज्य कर विभागातील दोन […]

]]>
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई; राज्य कर निरीक्षकाकडून ५० हजारांची लाच स्वीकारली….

नंदुरबार || दि. ०९ ऑक्टॉबर २०२६ || (फिरोज खान) :- राज्य कर विभागातील दोन कर्मचाऱ्यांनी तक्रारदाराकडे दोन लाख रुपयांची लाच मागितल्याच्या तक्रारीनंतर नाशिक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने कारवाई केली.

या प्रकरणात राज्य कर अधिकारी संदीप पाटील आणि राज्य कर निरीक्षक विवेक घोडके यांच्याविरुद्ध तक्रार नोंदवण्यात आली होती. तडजोडीनंतर ५० हजार रुपये स्वीकारल्याचे प्रेसनोटमध्ये नमूद आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदाराच्या जीएसटी विवरणपत्रांशी संबंधित प्रकरणात आर्थिक वर्ष २०२२-२३ आणि २०२३-२४ मधील विवरणपत्रे न भरल्याबाबत नोटिसा देण्यात आल्या होत्या.

या प्रकरणात मदत करण्याच्या मोबदल्यात संबंधित लोकसेवकांनी दोन लाख रुपयांच्या लाचेची मागणी केल्याचा आरोप तक्रारदाराने केला होता. तक्रारीची पडताळणी केल्यानंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, नाशिक परिक्षेत्राच्या पथकाने सापळा रचला. या कारवाईदरम्यान ५० हजार रुपये स्वीकारल्याप्रकरणी राज्य कर अधिकारी संदीप पाटील आणि राज्य कर निरीक्षक विवेक घोडके यांच्याविरुद्ध कारवाई करण्यात आली.

या प्रकरणी नवापूर पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम १९८८ च्या कलम ७ अन्वये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे प्रेसनोटमध्ये नमूद आहे. ही कारवाई पोलीस निरीक्षक योगेश भास्कर शिंदे यांच्या पथकाने केली. नाशिक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे वरिष्ठ अधिकारी या कारवाईवर देखरेख करत होते.लाच मागणाऱ्या लोकसेवकांविरोधात तक्रार असल्यास नागरिकांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधावा, असे आवाहन विभागाकडून करण्यात आले आहे.

]]>
विदेशी दारूसह ४ लाख ४४ हजारांचा मुद्देमाल जप्त, उपनगर पोलिसांची कारवाई…. https://crimefirnews.com/2232/ Fri, 09 Oct 2026 06:09:08 +0000 https://crimefirnews.com/?p=2232 विदेशी दारूसह ४ लाख ४४ हजारांचा मुद्देमाल जप्त, उपनगर पोलिसांची कारवाई…. नंदुरबार : दि.०९ ऑक्टॉबर २०२६ ( फिरोज खान ) :- विनापरवाना विदेशी दारूची वाहतूक […]

]]>
विदेशी दारूसह ४ लाख ४४ हजारांचा मुद्देमाल जप्त, उपनगर पोलिसांची कारवाई….

नंदुरबार : दि.०९ ऑक्टॉबर २०२६ ( फिरोज खान ) :- विनापरवाना विदेशी दारूची वाहतूक करणाऱ्यांविरुद्ध नंदुरबार उपनगर पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. विदेशी दारूची चोरीछुप्या पद्धतीने विक्री करण्याच्या उद्देशाने वाहतूक होत असल्याची गोपनीय माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी सापळा रचला. या कारवाईदरम्यान विदेशी दारूसह एकूण ४ लाख ४४ हजार ५५० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ६ ऑक्टोबर २०२६ रोजी रात्री १० वाजण्याच्या सुमारास उपनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील काकाच्या ढाब्याजवळ, उड्डाणपुलाखाली पांढऱ्या रंगाच्या कारमध्ये विनापरवाना विदेशी दारूची वाहतूक केली जाणार असल्याची माहिती पोलीस निरीक्षक अमोल सातोदकर यांना गुप्त बातमीदारामार्फत मिळाली.

या माहितीच्या आधारे उपनगर पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाने तसेच नंदुरबार उपविभागीय पोलीस कार्यालयातील पथकाने संबंधित ठिकाणी छापा टाकण्याची तयारी केली. मात्र, पोलिस आल्याचे लक्षात येताच कारजवळ उभा असलेला अज्ञात आरोपी कार सोडून घटनास्थळावरून पळून गेला. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी उभी असलेली पांढऱ्या रंगाची इको स्पोर्ट कार (क्रमांक GJ 27 AP 2060) तपासली. या कारमध्ये एकूण ४ लाख ४४ हजार ५५० रुपये किमतीची विदेशी दारू मिळून आली. पोलिसांनी विदेशी दारूसह वाहन जप्त केले असून, फरार आरोपीचा शोध सुरू आहे.

या प्रकरणी पोलीस शिपाई संकेत वामन चौधरी यांच्या फिर्यादीवरून अज्ञात आरोपीविरुद्ध नंदुरबार उपनगर पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक ३७७/२०२६ अन्वये महाराष्ट्र दारूबंदी कायदा कलम ६५(ई) व १०८ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई

ही कारवाई पोलीस अधीक्षक अश्विनी सानप, अपर पोलीस अधीक्षक आशित कांबळे आणि नंदुरबार उपविभागीय पोलीस अधिकारी हनुमंत गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.

उपनगर पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी पोलीस निरीक्षक अमोल सातोदकर यांच्या नेतृत्वाखाली गुन्हे शोध पथकातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी या कारवाईत सहभाग घेतला.

पोलिसांनी विदेशी दारूची वाहतूक करणारे वाहन जप्त केले असले, तरी घटनास्थळावरून पळून गेलेल्या आरोपीचा शोध घेण्याचे काम सुरू आहे.

]]>
१ कोटी ३१ लाखांचा २६२ किलो गांजा जप्त; स्थानिक गुन्हे शाखेची धडक कारवाई…. https://crimefirnews.com/2229/ Wed, 07 Oct 2026 15:46:58 +0000 https://crimefirnews.com/?p=2229 १ कोटी ३१ लाखांचा २६२ किलो गांजा जप्त; स्थानिक गुन्हे शाखेची धडक कारवाई…. नंदुरबार || दि. ०७ ऑक्टोबर २०२६ || (फिरोज खान) -: आगामी सण-उत्सवांच्या […]

]]>
१ कोटी ३१ लाखांचा २६२ किलो गांजा जप्त; स्थानिक गुन्हे शाखेची धडक कारवाई….

नंदुरबार || दि. ०७ ऑक्टोबर २०२६ || (फिरोज खान) -: आगामी सण-उत्सवांच्या पार्श्वभूमीवर अवैध दारूची वाहतूक व साठा, अवैध अग्निशस्त्रे तसेच अंमली पदार्थांची लागवड आणि विक्रीविरोधात कठोर कारवाई करण्याच्या सूचना नंदुरबार जिल्ह्याच्या पोलीस अधीक्षक अश्विनी सानप यांनी सर्व पोलीस ठाण्यांच्या प्रभारी अधिकाऱ्यांना दिल्या होत्या. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेने मोठी कारवाई करत २६२ किलो गांजाची झाडे जप्त केली असून, त्याची किंमत तब्बल १ कोटी ३१ लाख १५ हजार रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले.

दिनांक ६ ऑक्टोबर २०२६ रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील यांना गोपनीय बातमीदारामार्फत माहिती मिळाली. धडगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मांडवी गावाच्या शेतशिवारातील रुणमालपाडा परिसरात एका व्यक्तीने स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी बेकायदेशीररीत्या गांजाची लागवड करून त्याची जोपासना केल्याची माहिती पोलिसांना मिळाली.

माहिती मिळताच पोलीस निरीक्षक हेमंत पाटील यांनी तात्काळ पथक तयार करून कारवाईचे आदेश दिले. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मांडवी गावाच्या शेतशिवारातील वनपट्ट्यात पाहणी केली असता, तेथे मोठ्या प्रमाणात गांजाची झाडे आढळून आली.

पोलिसांनी केलेल्या कारवाईत एकूण २६२ किलो वजनाची गांजाची झाडे जप्त करण्यात आली. या मुद्देमालाची अंदाजे किंमत १ कोटी ३१ लाख १५ हजार रुपये असल्याचे नमूद करण्यात आले आहे.

या प्रकरणी पिंटू ऊर्फ पिंट्या मिठ्या पटले, रा. मांडवी बु., रुणमालपाडा, ता. धडगाव, जि. नंदुरबार याच्याविरुद्ध कारवाई करण्यात आली आहे. आरोपीने वनजमिनीमध्ये बेकायदेशीररीत्या गांजाची लागवड करून त्याची जोपासना केल्याचे पोलिसांच्या तपासात आढळून आले.

जप्त करण्यात आलेली गांजाची झाडे गुन्ह्याच्या पुढील तपासासाठी आवश्यक ती कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून पोलिसांनी ताब्यात घेतली आहेत. तसेच आरोपीविरुद्ध धडगाव पोलीस ठाण्यात गुंगीकारक औषधी द्रव्ये व मनोव्यापारावर परिणाम करणारे पदार्थ अधिनियम, १९८५ मधील संबंधित कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही कारवाई नंदुरबार जिल्ह्याच्या पोलीस अधीक्षक अश्विनी सानप आणि अपर पोलीस अधीक्षक आशित कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली.

या पथकात पोलीस उपनिरीक्षक मुकेश पवार, विकास गुंजाळ, महेश निकम, पोलीस हवालदार दिनेश चित्ते, स्वप्नील गोसावी, मुकेश तावडे, सुनील येलवे, सचिन वसावे तसेच पोलीस अंमलदार मनोज महाजन, अभय राजपूत, निशीगंध गवळे, हेमंत बारी, विनोद पाटील आणि राहुल पांढारकर यांचा सहभाग होता.

]]>
महाराष्ट्र कुस्ती संघटनेकडून ज्येष्ठ मल्लांचा महासन्मान; नंदुरबारच्या पै. नायाब कुरैशी यांची जिल्हाध्यक्षपदी सर्वानुमते निवड…. https://crimefirnews.com/2225/ Mon, 05 Oct 2026 16:11:52 +0000 https://crimefirnews.com/?p=2225 महाराष्ट्र कुस्ती संघटनेकडून ज्येष्ठ मल्लांचा महासन्मान;नंदुरबारच्या पै. नायाब कुरैशी यांची जिल्हाध्यक्षपदी सर्वानुमते निवड…. नंदुरबार || दि. ०५ ऑक्टोबर २०२६ || (फिरोज खान)-: नंदुरबारच्या कुस्ती क्षेत्रासाठी […]

]]>
महाराष्ट्र कुस्ती संघटनेकडून ज्येष्ठ मल्लांचा महासन्मान;
नंदुरबारच्या पै. नायाब कुरैशी यांची जिल्हाध्यक्षपदी सर्वानुमते निवड….

नंदुरबार || दि. ०५ ऑक्टोबर २०२६ || (फिरोज खान)-: नंदुरबारच्या कुस्ती क्षेत्रासाठी अभिमानाची आणि आनंदाची बातमी समोर आली आहे. महाराष्ट्र कुस्ती संघटनेच्या नंदुरबार जिल्हाध्यक्षपदी सुप्रसिद्ध पैलवान पै. नायाब कुरैशी यांची सर्वानुमते निवड करण्यात आली आहे. कोल्हापुरात पार पडलेल्या महाराष्ट्र कुस्ती महासन्मान सोहळ्यात त्यांच्या निवडीची अधिकृत घोषणा करण्यात आली. कोल्हापूर येथील राजर्षी शाहू स्मारक भवनात महाराष्ट्र कुस्ती संघटनेच्या वतीने ‘महाराष्ट्र कुस्ती महासन्मान सोहळा व पहिले अधिवेशन’ मोठ्या उत्साहात पार पडले.

या अधिवेशनात नंदुरबार जिल्ह्याला विशेष सन्मान मिळाला. नंदुरबारचे सुप्रसिद्ध पैलवान पै. नायाब कुरैशी यांची महाराष्ट्र कुस्ती संघटनेच्या नंदुरबार जिल्हाध्यक्षपदी सर्वानुमते निवड करण्यात आली. कुस्तीचा प्रचार आणि प्रसार, भव्य कुस्तीच्या दंगलींचे आयोजन तसेच युवा पैलवानांना प्रोत्साहन देण्यासाठी पै. नायाब कुरैशी यांनी केलेल्या उल्लेखनीय कार्याची दखल घेत त्यांच्यावर ही महत्त्वाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.

संघटनेचे अध्यक्ष संग्राम कांबळे आणि उपाध्यक्ष अमोल मदने यांनी त्यांच्या निवडीची अधिकृत घोषणा केली. या भव्य सोहळ्याचे अध्यक्षस्थान पद्मश्री मुरलीकांत पेटकर यांनी भूषविले. यावेळी हिंदकेसरी, रुस्तमे हिंद आणि १९६६ चे महाराष्ट्र केसरी दीनानाथ सिंह, ज्येष्ठ छायाचित्रकार बापू मकानदार, तसेच बंडा पाटील रेंट्रेकर यांच्या वतीने त्यांचे पुत्र दिनेश पाटील यांनी जीवनगौरव पुरस्कार स्वीकारला.

याशिवाय कुस्ती क्षेत्रातील विविध मान्यवरांसह एकूण ४२ मान्यवरांचा विशेष सन्मान करण्यात आला. यावेळी महाराष्ट्र केसरी समाधान घोडके, शामराव जाधव, भगवान बापू करणकाळ, राम कानडे, गोरख पाटील, संजय आवळे, नितीन ठोंबरे, नजीब तांबोळी यांच्यासह अनेक मान्यवरांची उपस्थिती होती. विशेष म्हणजे, ऑलिम्पिक वीर खाशाबा जाधव यांचे सुपुत्र रणजीत खाशाबा जाधव यांच्यासह कुस्ती क्षेत्रातील अनेक मान्यवरांचा या सोहळ्यात गौरव करण्यात आला.

नंदुरबारसाठी अभिमानाचा क्षण..

पै. नायाब कुरैशी यांची जिल्हाध्यक्षपदी झालेली निवड ही नंदुरबारच्या कुस्ती क्षेत्रासाठी निश्चितच अभिमानाची बाब आहे. या निवडीमुळे नंदुरबार जिल्ह्यातील कुस्तीला नवी दिशा मिळण्यास मदत होणार असून, ग्रामीण भागातील होतकरू आणि युवा पैलवानांना अधिक चांगले व्यासपीठ उपलब्ध होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

]]>