#Assemblyelection #election #independentcandidate #election #Jalgaonpolice – Crime Fir News https://crimefirnews.com Online Mon, 18 Nov 2024 06:06:56 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.9.4 https://crimefirnews.com/wp-content/uploads/2024/06/cropped-cRIME-LOGO-1-1-32x32.png #Assemblyelection #election #independentcandidate #election #Jalgaonpolice – Crime Fir News https://crimefirnews.com 32 32 अपक्ष जळगाव विधानसभा उमेदवार यांच्या घरावरती अज्ञात हल्लेखोरांचा गोळीबार…. https://crimefirnews.com/752/ https://crimefirnews.com/752/#respond Mon, 18 Nov 2024 06:06:54 +0000 https://crimefirnews.com/?p=752 पोलीस ताफ्यासह पोलीस अधीक्षक घटनास्थळी दाखल.. जळगाव || दि.१८ नोव्हेबर २०२४ || {प्रतिनिधि विठ्ठल भालेराव} -: जळगाव शहरातील मेहरून (मास्टर कॉलनी) परिसरातील विधानसभा निवडणुकीतील अहेमद […]

]]>
पोलीस ताफ्यासह पोलीस अधीक्षक घटनास्थळी दाखल..

जळगाव || दि.१८ नोव्हेबर २०२४ || {प्रतिनिधि विठ्ठल भालेराव} -: जळगाव शहरातील मेहरून (मास्टर कॉलनी) परिसरातील विधानसभा निवडणुकीतील अहेमद सर अपक्ष उमेदवाराच्या घरावरती २ राऊंड फायर करून गोळीबार झाल्याची धक्कादायक घटना आज रोजी पहाटे चार/पाच वाजेच्या सुमारास घडली आहे.

या हल्ल्या प्रकरणी विधानसभा अपक्ष उमेदवार अहेमद सर यांनी पोलिसात तक्रार केलेली असून एलसीबी व एमआयडीसी पोलीस स्टेशनचे अधिकारी व कर्मचारी तपास करीत असून अज्ञात हल्लेखोरांचा तपास करीत आहे

अपक्ष विधानसभा उमेदवार अहेमद हुसेन शेख (वय ५०, रा. मेहरून मास्टर कॉलनी जळगाव) विधानसभा निवडणुकीमध्ये अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढवीत आहेत. अहेमद सर एमआयएम पक्षाचे माजी जिल्हाध्यक्ष असुन ते आपल्या परिवारासह मास्टर कॉलनी मेहरून शेरा चौकात भागात राहतात.

दरम्यान, सोमवारी दि. १८ नोव्हेंबर रोजी पहाटे मास्टर कॉलनी शेरा चौकातील नागरिक साखर झोपेत असताना पहाटे चार वाजेच्या सुमारास २ अज्ञात दुचाकीस्वारांनी येऊन त्यांच्या घरावर २ राऊंड फायर केले. यात त्यांच्या घराच्या खिडकीचा काच फुटले आहे. गोळीबार असा आवाज आल्यानंतर कुटुंबीय खडबडून जागे झाल्यानंतर त्यांनी तात्काळ एमआयडीसी पोलीस स्टेशनला या हल्ल्या संदर्भात माहिती कळवली. नागरिकांना घटना कळताच अहेमद सर यांच्या घराजवळ गर्दी केली.

आज सकाळ पासुन पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, अप्पर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, डीवायएसपी संदीप गावित, एमआयडीसी पोलीस स्टेशन निरीक्षक दत्तात्रय निकम यांच्यासह अधिकारी घटनास्थळी दाखल असुन. कर्मचाऱ्यांनी आजूबाजूचे सीसीटीव्ही फुटेज गोळा केले असता त्यात घटना कैद झाल्याचे दिसून आले आहे. दरम्यान हल्लेखोरांची माहिती काढून त्यांचा शोध घेणे सुरू झाले आहे.

अहेमद सर यांनी माध्यमांशी माहिती देताना सांगितले की, सकाळी मी गाढ झोपेत असताना अचानक काहीतरी फुटल्याचा आवाज आला. थोड्यावेळाने पाहिले तर खिडकीचा काच तुटलेला दिसला आणि एक गोळी दिसली. आणखी एक गोळी पोलीस शोधण्याचे काम करीत आहे.

 

घटनेमागे नेमके कौण व काय कारण असू शकते हे निश्चित माहिती सांगता येत नाही. तरी मी आज शेवटच्या दिवशी प्रचार सुरूच ठेवणार व अशा हल्ल्याने मी काही घाबरणार नाही व माघार घेणार नाही विधानसभा अपक्ष उमेदवार अहेमद सर यांनी ठामपणे सांगितले सांगितले.

काही दिवसापूर्वी मुक्ताईनगर बोदवड विधानसभा मतदार संघातील अपक्ष उमेदवार विनोद सोनवणे यांच्यावर बोदवड येथे एका प्रचार रॅलीत गोळीबार केल्याचा प्रकार घडला होता. त्यानंतर पोलीस यंत्राने कडून जिल्ह्यातील जवळपास सर्वच उमेदवारांना संरक्षण देण्यात आलेला आहे.

त्यानंतर जिल्ह्यातील हा विधानसभा उमेदवारावरती दुसऱ्यांदा हल्ला झाल्याची घटना घडलेली असून पोलीस याची कसून तपास करीत आहे.

]]>
https://crimefirnews.com/752/feed/ 0