#Jalgaoncrime #Jalgaon #Jalgaonpolice #foodanddrugs – Crime Fir News https://crimefirnews.com Online Thu, 12 Dec 2024 12:03:05 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=7.0 https://crimefirnews.com/wp-content/uploads/2024/06/cropped-cRIME-LOGO-1-1-32x32.png #Jalgaoncrime #Jalgaon #Jalgaonpolice #foodanddrugs – Crime Fir News https://crimefirnews.com 32 32 जळगांव शहरात अन्न व औषध प्रशासनाची धडक कारवाई; बेकरी अन्न पदार्थांचा मोठा साठा जप्त…          https://crimefirnews.com/785/ https://crimefirnews.com/785/#respond Thu, 12 Dec 2024 12:03:02 +0000 https://crimefirnews.com/?p=785 जळगांव शहरात अन्न व औषध प्रशासनाची धडक कारवाई; बेकरी अन्न पदार्थांचा मोठा साठा जप्त   जळगाव || दि. ११ डिसेंबर २०१४ || (विठ्ठल भालेराव)-: जळगाव […]

]]>
जळगांव शहरात अन्न व औषध प्रशासनाची धडक कारवाई; बेकरी अन्न पदार्थांचा मोठा साठा जप्त

 

जळगाव || दि. ११ डिसेंबर २०१४ || (विठ्ठल भालेराव)-: जळगाव जिल्हयात सुरु असलेल्या ख्रिसमस व नवीन वर्ष-2025 आगमनानिमित्त ‍विशेष तपासणी मोहिमेअंतर्गत अन्न व औषध प्रशासन कार्यालयाने बेकरी तपासणी मोहीम तीव्र केलेली आहे. ग्राहकांच्या वाढत्या मागणीनुसार केक व खादयपदार्थांची विक्री सुरु आहे.

या पार्श्वभूमीवर अन्न व औषध प्रशासनाच्या जळगाव कार्यालयाकडून जिल्हयातील सर्व हॉटेल्स, केक उत्पादक व विक्रेते, बेकरी अन्न पदार्थ उत्पादक व विक्रेते अशा आस्थापनांची तपासणी केली जात आहे.

या तपासणीत आस्थापनांच्या उलाढालीनुसार परवाना-नोंदणी केली आहे का?, कामगारांचे वैदयकीय तपासणी अहवाल, अन्नपदार्थ तयार करण्यासाठी वापरलेल्या पाण्याचे अहवाल, कर्मचा-यांना योग्य प्रशिक्षण दिले आहे का? सर्वसाधारण स्वच्छता, त्याप्रमाणे मुदतबाहय कच्चा माल व अन्नपदार्थांचा वापर होत आहे का? आदी बाबींची तपासणी केली जात आहे. याशिवाय बेक-यांमध्ये विक्रीसाठी उपलब्ध असलेले तयार अन्नपदार्थ व अन्नपदार्थ बनविण्यासाठी वापरले जाणारे घटकपदार्थ रवा, पीठ, मैदा, तूप आदींचे नमुने यांची तपासणी करण्यात येत आहे.

या मोहीमेअंतर्गत गोपनीय माहीतीच्या आधारे अन्न व औषध प्रशासन, यांचे पथकाने आज बुधवार ११ डिसेंबर रोजी दुपारी ४ वाजता जळगावातील मेहरुण परिसरातील न्यू बॉम्बे सुपर बेकरी यांचा पेढीच्या तपासणी (Unhygeinic Condition) मध्ये साठा करुन ठेवलेला मावा टोस्ट व पिस्ता टोस्टचा 2792 किग्रॅ वजनाचा एकूण 3,31,440 रुपयांचा साठा जप्त करण्यात आला आहे.  या अन्न पदार्थावर पॅकींग तारीख तसेच बिलाचा उल्लेख नव्हता.

ही कारवाई ही अन्न सुरक्षा अधिकारी श्री.कि.आ.साळुंके व त्यांचे सहकारी अन्न सुरक्षा अधिकारी श्री. के.एच.बाविस्कर, श्री. श.म.पवार यांनी अन्न व औषध प्रशासन यांनी केली आहे.

]]>
https://crimefirnews.com/785/feed/ 0