#Jalgaoncrime #Jalgaon #Jalgaonpolice – Crime Fir News https://crimefirnews.com Online Sat, 24 Jan 2026 19:53:42 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.9.4 https://crimefirnews.com/wp-content/uploads/2024/06/cropped-cRIME-LOGO-1-1-32x32.png #Jalgaoncrime #Jalgaon #Jalgaonpolice – Crime Fir News https://crimefirnews.com 32 32 गोरक्षेच्या नावाखाली जमावशाहीचा कहर? फैजपूरमध्ये मजुरावर प्राणघातक हल्ला; अल्पवयीन फरहानलाही लोखंडी रॉडने बेदम मारहाण. https://crimefirnews.com/1476/ Thu, 22 Jan 2026 06:54:05 +0000 https://crimefirnews.com/?p=1476 गोरक्षेच्या नावाखाली जमावशाहीचा कहर? फैजपूरमध्ये मजुरावर जीवघेणा हल्ला, अल्पवयीन पुतण्या फरहानलाही लोखंडी रॉडने अमानुष मारहाण BNS अंतर्गत गंभीर कलमांखाली गुन्हा दाखल करून तात्काळ अटक करण्याची […]

]]>
गोरक्षेच्या नावाखाली जमावशाहीचा कहर? फैजपूरमध्ये मजुरावर जीवघेणा हल्ला, अल्पवयीन पुतण्या फरहानलाही लोखंडी रॉडने अमानुष मारहाण

BNS अंतर्गत गंभीर कलमांखाली गुन्हा दाखल करून तात्काळ अटक करण्याची मागणी…

फैजपूर/जळगाव || दि.२२ जानेवारी २०२६ || {हमीद तडवी}-: गोरक्षेच्या नावाखाली कायदा हातात घेऊन उन्माद माजवणाऱ्या टोळ्यांचे धाडस दिवसेंदिवस वाढत असतानाच फैजपूर तालुक्यातील आंदलवाडी परिसरात मानवतेला काळीमा फासणारी धक्कादायक घटना समोर आली आहे. जलील शेख साबीर (वय 53, मजूर) व त्यांचा अल्पवयीन पुतण्या फरहान शेख (वय 17) यांच्यावर गौमांस विक्रीच्या खोट्या संशयावरून अमानुष मारहाण, जिवे मारण्याच्या धमक्या व जबरी चोरी करण्यात आल्याचा गंभीर आरोप आहे.
दिनांक 18 जानेवारी 2026 रोजी रात्री जलील शेख हे बागोदा येथून फैजपूरकडे मोटरसायकलने जात असताना आंदलवाडी गावाबाहेर काही तरुणांनी त्यांची दुचाकी अडवली. “तू गौमांस विकतोस” असा खोटा आरोप करत शिवीगाळ सुरू करून लोखंडी फायटर व रॉडने छाती, पोट व संपूर्ण शरीरावर बेदम मारहाण करण्यात आली.

मारहाणीदरम्यान “यांना जिवंत सोडू नका” अशा धमक्या देण्यात आल्या. याचवेळी आरोपींनी ₹2000 ते ₹2200 रोख रक्कम व मोबाईल फोन जबरदस्तीने हिसकावून घेतला. घटनास्थळी आलेल्या स्थानिक महिलेने समजावून सांगण्याचा प्रयत्न केला तरीही हल्लेखोर थांबले नाहीत. धक्कादायक बाब म्हणजे पोलिसांच्या उपस्थितीतही पीडिताला जबरदस्तीने मोटरसायकलवर बसवून नेत दसनूर परिसरात पुन्हा मारहाण व शिवीगाळ करण्यात आली. या अमानुष हल्ल्यात जलील शेख यांची प्रकृती गंभीर झाली. चक्कर येणे, उलट्या, अंतर्गत दुखापती वाढल्याने प्रथम रावेर व नंतर जळगाव जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार करण्यात आले. 19 जानेवारी रोजी डिस्चार्ज देण्यात आला असला तरी आजही तीव्र वेदना व दुखापती कायम आहेत.

या प्रकरणी भूषण बाळू कोळी, सागर प्रकाश कोळी, हर्षल विजय कोळी, हर्षल ज्ञानेश्वर कोळी, गज्या रमेश, अश्विन सोपान कोळी, ओम योगेश कोळी, चेतन चंदू कोळी, कुलदीप पवार, वृषाली हॉटेलवाला (वाघोदा) तसेच 10 ते 15 अज्ञात व्यक्तींविरोधात BNS अंतर्गत गंभीर कलमांखाली गुन्हा दाखल करून तात्काळ अटक करण्याची मागणी करण्यात आली आहे.
पीडितांच्या वतीने ही तक्रार निंभोरा पोलीस स्टेशन येथे दाखल करण्यात आली असून, या घटनेमुळे परिसरात भीती व संतापाचे वातावरण पसरले आहे.

या प्रकरणी दोषींवर कठोर कलमांखाली कारवाई करून तात्काळ अटक करावी, जमावशाहीला आळा घालावा व पीडितांना संरक्षण द्यावे, अशी जोरदार मागणी निवेदनाद्वारे पोलिस व प्रशासनाकडे करण्यात आली आहे. कायदा हातात घेणाऱ्या जमावशाहीवर पोलिसांचा कडक अंकुश कधी? असा संतप्त सवाल आता जनतेतून उपस्थित केला जात आहे.

]]>
त्र्यंबकेश्वर येथे पत्रकारांवर झालेल्या हल्ल्याचा मुक्ताईनगरात निषेध;तहसीलदार व पो. निरीक्षकांना निवेदन.. https://crimefirnews.com/1172/ Tue, 23 Sep 2025 16:43:15 +0000 https://crimefirnews.com/?p=1172 त्र्यंबकेश्वर येथे पत्रकारांवर झालेल्या हल्ल्याचा मुक्ताईनगरात निषेध;तहसीलदार व पो. निरीक्षकांना निवेदन.. जळगाव/मुक्ताईनगर || दि. २३ सप्टेंबर २०२५ || (कैलास कोळी)-: त्र्यंबकेश्वर येथे कुंभमेळ्याच्या वार्तांकनासाठी गेलेल्या […]

]]>
त्र्यंबकेश्वर येथे पत्रकारांवर झालेल्या हल्ल्याचा मुक्ताईनगरात निषेध;तहसीलदार व पो. निरीक्षकांना निवेदन..

जळगाव/मुक्ताईनगर || दि. २३ सप्टेंबर २०२५ || (कैलास कोळी)-: त्र्यंबकेश्वर येथे कुंभमेळ्याच्या वार्तांकनासाठी गेलेल्या पत्रकारांवर स्थानिक गुंडांकडून करण्यात आलेल्या भ्याड हल्ल्याचा मुक्ताईनगर तालुका इलेक्ट्रॉनिक मीडिया पत्रकार संघटनेतर्फे तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला. यासंदर्भात तहसीलदार व पोलीस निरीक्षक यांना निवेदन देण्यात आले.

पत्रकार संघटनेतर्फे सांगण्यात आले की, या घटनेत पत्रकारांवर झालेली मारहाण गंभीर असून पत्रकार संरक्षण कायद्याअंतर्गत आरोपींवर कठोर कारवाई करण्यात यावी. घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर सर्वत्र व्हायरल असून नाशिक पोलिसांनी आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला आहे. तथापि, त्र्यंबकेश्वर येथे प्रवेशकर वसुली करणाऱ्या ए. एस. मल्टी सर्विसेस या कंपनीच्या मालकाविरोधातही गुन्हा दाखल करावा तसेच कंपनीला ब्लॅकलिस्ट करून महाराष्ट्रात कुठेही ठेका देऊ नये, अशी मागणी निवेदनात करण्यात आली.

पत्रकारांनी यावेळी शासनाकडे प्रश्न उपस्थित केला की, नोव्हेंबर 2019 मध्ये पत्रकार संरक्षण कायदा लागू झाल्यानंतरही राज्यभरात 300 हून अधिक पत्रकारांवर हल्ले झाले आहेत. मात्र यापैकी केवळ 43 प्रकरणांमध्येच पत्रकार संरक्षण कायद्याचा वापर करण्यात आला. त्यामुळे या कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करण्यात शासनाकडून गंभीर दुर्लक्ष होत असल्याचे स्पष्ट होत आहे.

त्यामुळे गृहमंत्रालयाने पत्रकार संरक्षण कायद्याच्या प्रकरणांसाठी स्वतंत्र समिती गठित करून प्रलंबित प्रकरणांची चौकशी करावी, अशी मागणीही संघटनेतर्फे करण्यात आली.

या प्रसंगी तालुका इलेक्ट्रॉनिक मीडिया पत्रकार संघटनेचे अध्यक्ष पंकज कपले, उपाध्यक्ष अक्षय काठोके, सचिव विठ्ठल धनगर, विनायक वाडेकर सर, सचिन झनके, किरण पाटील, अतिख खान, पंकज तायडे, कैलास कोळी, सुभाष धाडे, टीव्ही 9 प्रतिनिधी रवी गोरे, मंगेश ढोले, सुमित बोदडे आदी उपस्थित होते.

]]>
यावलमध्ये सहा वर्षीय मुलाचा मृतदेह संशयास्पदरित्या सापडल्याने खळबळ… https://crimefirnews.com/1141/ Sun, 07 Sep 2025 04:04:25 +0000 https://crimefirnews.com/?p=1141 यावलमध्ये सहा वर्षीय मुलाचा मृतदेह संशयास्पदरित्या सापडल्याने खळबळ… जळगाव || ७ सप्टेंबर २०२५ || (विठ्ठल भालेराव)-: जळगाव जिल्ह्यातील यावल शहरातील बाबुजीपुरा परिसरात बेपत्ता झालेल्या सहा […]

]]>
यावलमध्ये सहा वर्षीय मुलाचा मृतदेह संशयास्पदरित्या सापडल्याने खळबळ…

जळगाव || ७ सप्टेंबर २०२५ || (विठ्ठल भालेराव)-: जळगाव जिल्ह्यातील यावल शहरातील बाबुजीपुरा परिसरात बेपत्ता झालेल्या सहा वर्षीय मुलाचा मृतदेह शेजाऱ्यांच्या घरात सापडल्याने शनिवारी शहरात खळबळ उडाली. संतप्त नागरिकांनी संशयिताच्या दुकानावर दगडफेक केली असून परिसरात तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले आहे.

घटना कशी घडली_ शुक्रवारी (६ सप्टेंबर) सायंकाळी सुमारे सहा वाजता मोहमंद हन्नान खान मजीद खान (वय ६) हा मुलगा अचानक बेपत्ता झाला. कुटुंबीय व नातेवाईकांनी परिसरात सर्वत्र शोध घेतला, परंतु त्याचा मागोवा लागला नाही. शनिवारी सकाळपासून पुन्हा शोधमोहीम सुरू केली असता, शेजारी राहणारे बिस्मिल्ला खलिफा यांच्या दुमजली घराच्या वरच्या मजल्यावरील कोठीत सकाळी ११ वाजता मुलाचा मृतदेह संशयास्पदरित्या आढळला.

संताप व तणाव_ धक्कादायक बातमी वाऱ्यासारखी पसरताच परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने घटनास्थळी जमले. संतप्त जमावाने मुख्य रस्त्यावरील बारी चौकाजवळील संशयिताच्या दुकानावर दगडफेक केली. खबरदारीचा उपाय म्हणून व्यापाऱ्यांनी दुकाने बंद ठेवली.

पोलिसांची धावपळ_ गणेश विसर्जनाच्या दिवशीच तणाव वाढू नये म्हणून पोलिसांनी तातडीने दंगा नियंत्रण पथकाला पाचारण केले. हाजी शब्बीर खान, उपविभागीय पोलीस अधिकारी अनिल बडगुजर, पोलीस निरीक्षक रंगनाथ धारबडे, सहायक पोलीस निरीक्षक अजय वाढवे, उपनिरीक्षक अनिल महाजन, एम.जे. शेख, अयाज खान आदी अधिकारी व मुस्लिम समाजातील मान्यवरांनी नागरिकांना शांततेचे आवाहन केले. न्यायवैद्यक पथकानेही घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला.

सद्यस्थितीही_ परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी बाबुजीपुरा परिसरासह शहरात कडेकोट पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. या घटनेमुळे यावल शहरात शोककळा पसरली असून पुढील तपास पोलीस करत आहेत.

]]>
एमआयडीसी पोलसांनी परजिल्ह्यातील आरोपी कडून पाच चोरीच्या मोटार सायकली केल्या हस्तगत.. https://crimefirnews.com/810/ https://crimefirnews.com/810/#respond Sun, 22 Dec 2024 18:03:16 +0000 https://crimefirnews.com/?p=810 एमआयडीसी पोलसांनी परजिल्ह्यातील आरोपी कडून पाच चोरीच्या मोटार सायकली केल्या हस्तगत.. जळगाव || दि .२२ डिसेंबर 2024 || (विठ्ठल भालेराव):- एमआयडीसी पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक […]

]]>
एमआयडीसी पोलसांनी परजिल्ह्यातील आरोपी कडून पाच चोरीच्या मोटार सायकली केल्या हस्तगत..

जळगाव || दि .२२ डिसेंबर 2024 || (विठ्ठल भालेराव):- एमआयडीसी पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक संदीप पाटील यांना गुप्त माहिती मिळाली की अजिंठा चौकात एक इसम हाचोरीच्या मोटार सायकली विक्री साठी येणार आहे.

अशा गोपनीय बातमीनुसार गुन्हे शोध पथकाचे पोकॉ विशाल कोळी ,राहुल रगडे यांना माहिती काढण्याचे सांगितले. त्यांनी आपले कौशल्य पणाला लावून सोबत पोऊपनी राहुल तायडे, पाउपनि चंद्रकांत धनके,पोना योगेश बारी,पोकॉ फिरोज तडवी अशांसह अजिंठा चौफुली येथे साध्या वेषात थांबून दीपक प्रेमसिंग सोळंके रा वरठाण ता सोयगाव जि छत्रपती संभाजी नगर यास ताब्यात घेतले व त्याचे जवळ मिळून आलेल्या एच एफ डिलक्स कंपनीच्या मोसा बद्दल माहिती काढली असता तो उडवाउडवीची उत्तरे देत असल्याने सदर मोसा बाबत अधिक माहिती घेतली असता जिल्हा पेठ पोलिस स्टेशन येथे मोटार सायकल चोरीचा गुन्हा दाखल असल्याची माहिती मिळून आली .

यावरून दिपक सोळंके यास विश्वासात घेऊन विचारपूस केली असता त्याने अजून जळगांव शहरातून 03 , छत्रपती संभाजी नगर येथून 01 आणि अडावद येथून 01 अशा एकूण 05 मोटार सायकली चोरी केल्याची कबुली दिली. सदर मोसा ह्या त्याच्या कडून हस्तगत कऱण्यात आलेल्या आहेत.

 

खालील पोलिस स्टेशन हद्दीतील मोसा मिळून आलेल्या आहे.
1) हिरो एच एफ डिलक्स मो सा क्रं MH-19 DL-0980 चेसीस नं MBLHAR234J5J01493 जिल्हापेठ पो स्टे गुरनं 399/2024 BNS कलम 303( 2) प्रमाणे
2) हिरो एच एफ डिलक्स मोसा क्रं MH-19 CA-4293 चेसीस क्रं MBLHA11ALE9E27230 जळगांव शहर पो स्टे गूरनं 132/2024 भा द वि कलम 379 प्रमाणे
3) हिरो एच एफ डिलक्स मो सा क्रं MH-19 DH-6528 चेसीस नं MBLHAR239JHH04151 अडावद पो स्टे
4) हिरो एच एफ डिलक्स MH-18 AV-2312 चेसीस क्रं MBLHA11ATG9H37159 जळगाव शहर पो स्टे गुरनं 637/2024 बीएनएस कलम 303 (2) प्रमाणे
5) हिरो एच एफ डिलक्स MH-20 DZ-6817 चेसीस क्रं MBLHA11ATG9B38558 क्रांती चौक पो स्टे छ संभाजी नगर गुरनं 365/2024 बीएनएस कलम 303(2) प्रमाणे आहे.

सदरची कार्यवाही ही मा पोलिस अधिक्षक सो महेश्वर रेड्डी, मा अप्पर पोलीस अधीक्षक श्री अशोक नखाते, मा उपविभागीय पोलिस अधिकारी श्री संदीप गावीत, मा पोलिस निरीक्षक संदीप पाटील यांचे मार्गदर्शना खाली पाउपनि राहुल तायडे, पोउपनि चंद्रकांत धनके, पोना योगेश बारी, पोकॉ राहुल रगडे, विशाल कोळी, फिरोज तडवी यांनी केलेली आहे. आरोपितास जळगांव शहर पोलीस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आले आहे.

]]>
https://crimefirnews.com/810/feed/ 0
तलाठी हल्ला प्रकरणातील आरोपींना 24 तासांच्या आत अटक; जळगाव पोलिसांची कारवाई.. https://crimefirnews.com/807/ https://crimefirnews.com/807/#respond Fri, 20 Dec 2024 16:08:43 +0000 https://crimefirnews.com/?p=807 तलाठी हल्ला प्रकरणातील आरोपींना 24 तासांच्या आत अटक; जळगाव पोलिसांची कारवाई.. जळगाव || दि. २० डिसेंबर २०२४ || (विठ्ठल भालेराव)-: धरणगाव तालुक्यातील चांदसर येथे गिरणा […]

]]>
तलाठी हल्ला प्रकरणातील आरोपींना 24 तासांच्या आत अटक; जळगाव पोलिसांची कारवाई..

जळगाव || दि. २० डिसेंबर २०२४ || (विठ्ठल भालेराव)-: धरणगाव तालुक्यातील चांदसर येथे गिरणा नदीतून अवैध वाळू उपसा आणि वाहतूक रोखण्यासाठी गेलेल्या महसूल विभागाच्या पथकावर गुरुवारी मध्यरात्री अडीचच्या सुमारास वाळू माफियांनी प्राणघातक हल्ला केला.

या हल्ल्यात आरोपी आबा ईश्वर कोळी, योगेश ईश्वर कोळी, दिनेश सोमा कोळी, गणेश सोमा कोळी यांनी तलाठी दत्तात्रय पाटील यांच्यावर हल्ला चढवला ज्यात त्यांच्या पायावर फावड्याने वार केल्यामुळे फॅक्चर झाले आहे. या घटनेत तलाठी दत्तात्रय पाटील गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर सध्या उपचार सुरु आहेत.

याप्रकरणी नायब तहसीलदार संदीप मोरे यांनी पोलिसात तक्रार दाखल केली असून कलम 109, 132, 121(2), 303(2) 112(2), 189(2), 191, 190 प्रमाणे गुन्ह्यांची नोंद करण्यात आली आहे.

गुन्हा दाखल झाल्यानंतर आरोपींना तात्काळ अटक करण्याच्या सुचना जिल्हा पोलिस अधिक्षक मा. महेश्वर रेड्डी यांनी स्थानिक गुन्हे शाखा जळगाव व पाळधी दुरक्षेत्र धरणगाव पोलीसांनी चोविस तासाच्या आत गुन्हयातील आरोपी आबा ईश्वर कोळी, योगेश ईश्वर कोळी, दिनेश सोमा कोळी, गणेश सोमा कोळी यांना अटक करण्यात आली आहे.

यासोबतच गुन्ह्यात वापरलेले 2 ट्रॅक्टर सुद्धा जप्त करण्यात आले आहे. प्रशासनाने या घटनेची गंभीर दखल घेतली आहे.

जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी तातडीने घटनास्थळी भेट देत वाळू माफियांन विरोधात प्रशासन अधिक कठोर पावले उचलणार असल्याचे सांगितले. तसेच जिल्ह्यातील सर्व मंत्री, विभागीय आयुक्त यांनी या घटनेची गंभीर दखल घेत योग्य ती कडक कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत.

]]>
https://crimefirnews.com/807/feed/ 0
रामानंद पोलिसांची दहशत माजविणारा ३ आरोपींवर कारवाई… https://crimefirnews.com/768/ https://crimefirnews.com/768/#respond Wed, 27 Nov 2024 12:56:34 +0000 https://crimefirnews.com/?p=768 रामानंद पोलिसांची दहशत माजविणारा ३ आरोपींवर कारवाई…   जळगाव || दि.२७ नोव्हेंबर २०२४ || {प्रतिनिधी – विठ्ठल भालेराव} -: गावठी कट्ट्यासह दहशत मजविनाऱ्या 3 आरोपींना […]

]]>
रामानंद पोलिसांची दहशत माजविणारा ३ आरोपींवर कारवाई…

 

जळगाव || दि.२७ नोव्हेंबर २०२४ || {प्रतिनिधी – विठ्ठल भालेराव} -: गावठी कट्ट्यासह दहशत मजविनाऱ्या 3 आरोपींना रामानंद पोलिसांनी केली अटक जळगाव रामानंद पोलिस स्टेशन हद्दीत पिंप्राळा हुळको दूध फेडरेशन येथे ३ संशयित फिरत असल्याचे रामानंद पोलिस स्टेशन प्रभारी पोलिस निरीक्षक राजेंद्र गुंजाळ यांना गुप्त बातमी मिळाली.

सदर बातमी वरून रामानंद पोलिस स्टेशनचे सहाय्यक पोलिस निरीक्षक विठ्ठल पाटील, सफो संजय सपकाळे, पोहेकॉ इरफान मलिक, सुनील चौधरी, जितेंद्र राजपूत,जितेंद्र राठोड, पोना हेमंत कळसकर, रेवानंद साळुंखे, विनोद सूर्यवंशी, रविंद्र चौधरी, पोशि उमेश पवार, जुलालशिंग परदेशी या सर्वांनी परिसर सापळा रचून त्याठिकाणी दहशत मजविणाऱ्या ३ गुंडास ताब्यात घेतले असता त्यांचे नाव १) कल्पेश ( प्रबुद्ध ) गुलाब सपकाळे वय -21 रा पिंप्राळा हूडको दूध फेडरेशन जळगांव , २) गौरव समाधान सोनवणे वय -21 रा गलॅक्सी कॉलनी प्लॉट नो 25 गुजराल पेट्रोल पंपमागे जळगांव, ३) लिलाधर देविदास कोळी वय -35 रा ह मु हिरशिवा कॉलनी खोटेनगर जळगांव मू पो मुंगसे सवखेडा अमळनेर असे असून यापुर्वीही वेगवेगळ्या स्वरूपाचे गुन्हे दाखल असून सदर एसम ही सराईत गुन्हेगार असून त्याच्या ताब्यातून घटना स्तळाहून एकूण ७५००० रु किमतीचे गावठी बनावटीचे ३ लोखंडी पिस्टल ३ जिवंत काडतुसा सह हस्तगत करून त्यांच्यावर रामानंद पोलिस स्टेशन येथे भारतीय शस्त्र अधिनियम 1959 चे कलम 3,25 प्रमाणे गुन्हा दाखल केला असून आरोपींना अटक करण्यात आली आहे.

सदर गुन्ह्याचा पुढील तपास सपोनि विठ्ठल पाटील करीत आहेत. आरोपींच्या हातून सामान्य जनतेच्या जीवितास व मलमत्तेस नुकसान होवू नये याकरिता मा पोलिस अधिक्षक श्री डॉ महेश्वर रेड्डी , मा अप्पर पोलीस अधिक्षक अशोक नखाते, मा उपविभागीय पोलिस अधिकारी श्री संदीप गावीत यांच्या मार्गदर्शनाने सदर कार्यवाही पोलिस निरीक्षक राजेंद्र गुंजाळ, सहाय्यक पोलिस निरीक्षक विठ्ठल पाटील , साफो संजय सपकाळे , पोहेको इरफान मलिक, सुशील चौधरी, जितेंद्र राजपूत,जितेंद्र राठोड, पोना हेमंत कळसकर, रेवानंद साळुंखे,विनोद सूर्यवंशी, पोशि रवींद्र चौधरी ,उमेश पवार , जुलालाशिंग परदेशी यांनी पार पडली.

]]>
https://crimefirnews.com/768/feed/ 0
रामानंद नगर पोलीसांनी गावठी कट्ट्यासह दहशत माजविणाऱ्या गुंडास केले जेरबंद….. https://crimefirnews.com/743/ https://crimefirnews.com/743/#respond Thu, 14 Nov 2024 17:40:38 +0000 https://crimefirnews.com/?p=743 रामानंद नगर पोलीसांनी गावठी कट्ट्यासह दहशत माजविणाऱ्या गुंडास केले जेरबंद….. जळगाव || दि.१४ नोव्हेंबर २०२४ || {प्रतिनिधी शाहिद खान}-: रामानंद नगर पोलीस स्टेशन हद्दितील गिरणा […]

]]>
रामानंद नगर पोलीसांनी गावठी कट्ट्यासह दहशत माजविणाऱ्या गुंडास केले जेरबंद…..

जळगाव || दि.१४ नोव्हेंबर २०२४ || {प्रतिनिधी शाहिद खान}-: रामानंद नगर पोलीस स्टेशन हद्दितील गिरणा टाकी परीसर कंपाऊंडजवळ एक इसम इसम संशयास्पदरित्या फिरत असल्याचे रामानंद नगर पोलीस स्टेशन चे प्रभारी अधिकारी पोलीस निरीक्षक राजेंद्र गुंजाळ यांना गुप्त बातमी मिळाल्या वरुन सदर बातमी वरुन रामानंद नगर पोलीस स्टेशनचे सहा. पोलीस निरीक्षक विठ्ठल पाटील, सफौ / संजय सपकाळे, पोहेकॉ/इरफान मलिक, पोहेकॉ / सुशिल चौधरी, पोहेकॉ /जितेंद्र राजपुत, पोहेकॉ / जितेंद्र राठोड, पोना /
हेमंत कळसकर, पोना/रेवानंद साळुखे, पोना/विनोंद सुर्यवंशी, पोशि/रविंद्र चौधरी, पोशि/ उमेश पवार पोशि/जुलालसिंग परदेशी अशांनी सदर परिसरात जावुन सापडा रचुन त्याठिकाणी गावठी कट्ट्यासह दहशत माजविणाऱ्या गुंडास ताब्यात घेतले.

Oplus_131072

त्याचे नाव शुभम ऊर्फ मणी दिनेश अहिरे वय-27 वर्षे रा. प्लॉट नं 02 सिध्दार्थ हौसींग सोसायटी, हरिविठ्ठल नगर जळगाव असे असल्याचे त्याने सांगितल्या वरुन त्याचेवर यापुर्वीही वेगवेगळया स्वरुपाचे गुन्हे दाखल असुन सदर इसमहा सराईत गुन्हेगार असुन त्याचे ताब्यातुन घटनास्थळा वरुन एक 20,000/- रु किंचे गावठी बनावटीचे लोखंडी पिस्टल हस्तगत करुन त्यास रामानंद नगर पोलीस स्टेशन येथे आणुन त्याचेवर कायद्याचा वचक रहावा व भिती रहावी तसेच त्याच्या हातुन सामान्य लोकांच्या जिवीतास नुकसान होऊ नये याकरीता त्याचे वर शस्त्र अधिनियम 1959 चे कलम 3,25 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असुन आरोपीतास अटक करण्यात आली आहे. सदर गुन्हयाचा पुढील तपास सपोनि /विठ्ठल पाटील, हे करीत आहेत.

]]>
https://crimefirnews.com/743/feed/ 0