#Jalgaoncrime #Jalgaonpolice #JalgaonGas #JalgaonLPG – Crime Fir News https://crimefirnews.com Online Sun, 15 Dec 2024 07:35:14 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=7.0 https://crimefirnews.com/wp-content/uploads/2024/06/cropped-cRIME-LOGO-1-1-32x32.png #Jalgaoncrime #Jalgaonpolice #JalgaonGas #JalgaonLPG – Crime Fir News https://crimefirnews.com 32 32 एमआयडीसी भागात अवैध गॅस भरणाऱ्या केंद्रावर पोलिसांचा छापा ; एमआयडीसी पोलिसांची धडक कारवाई ! https://crimefirnews.com/792/ https://crimefirnews.com/792/#respond Sun, 15 Dec 2024 07:35:05 +0000 https://crimefirnews.com/?p=792 एमआयडीसी भागात अवैध गॅस भरणाऱ्या केंद्रावर पोलिसांचा छापा ; एमआयडीसी पोलिसांची धडक कारवाई ! जळगाव: || दि:-१५ डिसेंबर २०२४ || (विठ्ठल भालेराव)-: एमआयडीसी पोलीस ठाण्याचा […]

]]>
एमआयडीसी भागात अवैध गॅस भरणाऱ्या केंद्रावर पोलिसांचा छापा ; एमआयडीसी पोलिसांची धडक कारवाई !

जळगाव: || दि:-१५ डिसेंबर २०२४ || (विठ्ठल भालेराव)-: एमआयडीसी पोलीस ठाण्याचा पदभार स्वीकारताच पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांच्या पथकाने धडक कारवाई केली आहे. एम आय डी सी भागातील फातेमा नगरात सुरू असलेल्या अवैध गॅस भरणा केंद्रावर पोलिसांनी छापा टाकला. भरवस्तीत घरातच सुरू असलेला कारखाना उध्वस्त करीत पोलिसांनी ३४ व्यावसायिक आणि घरगुती गॅस सिलेंडर जप्त केले आहेत.

पुढील माहिती अशी की जळगाव शहरातील इच्छादेवी चौकाजवळ महामार्गलगत एका अवैध गॅस भरणा केंद्रावर वाहनात गॅस भरणा करताना स्फोट झाला होता. घटनेत ७ नागरिकांना जीव गमवावा लागल्यानंतर मोठी खळबळ उडाली होती. घटनेनंतर शहरातील सर्वच अवैध गॅस भरणा केंद्र बंद होते.

घटनेचे गांभीर्य लक्षात घेता पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम यांची बदली करून संदीप पाटील यांची नेमणूक करण्यात आली आहे. व्यावसायिक आणि घरगुती सिलेंडरचा वापर
मिळालेल्या माहितीनुसार, एमआयडीसी पोलीस ठाणे हद्दीतील फातेमा नगर परिसरात एका घरात अवैधरित्या गॅस पंप सुरू असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली होती.

माहितीच्या आधारे ३.३० वाजेच्या सुमारास पथकाने सापळा रचून छापा टाकला असता शोएब शेख शफी वय-२०, रा. फातेमा नगर याला ताब्यात घेतले. घराची झडती घेतली असता हॉल, किचन, शौचालयातून २० घरगुती आणि १४ व्यावसायिक गॅस सिलेंडर पोलिसांनी जप्त केले आहेत.

पथकात यांचा होता समावेश संपूर्ण कामगिरी संपूर्ण कामगिरी पोलीस अधीक्षक डॉ.महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप गावीत यांच्या मार्गदर्शनाखाली एमआयडीसी पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांच्या पथकातील पोलीस उपनिरीक्षक शरद बागल, हवालदार दत्तात्रय बडगुजर, किशोर पाटील, नितीन ठाकूर, रतन गिते अशांनी केली.

]]>
https://crimefirnews.com/792/feed/ 0