#Jalgaoncrime #Jalgaontheft #Jalgaonpolice – Crime Fir News https://crimefirnews.com Online Mon, 09 Feb 2026 15:37:58 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.9.4 https://crimefirnews.com/wp-content/uploads/2024/06/cropped-cRIME-LOGO-1-1-32x32.png #Jalgaoncrime #Jalgaontheft #Jalgaonpolice – Crime Fir News https://crimefirnews.com 32 32 आजंदे येथे आरोग्य उपकेंद्र कायम बंद; उपकेंद्र गाई-म्हशींसाठी की माणसांसाठी? https://crimefirnews.com/1511/ Mon, 09 Feb 2026 14:18:08 +0000 https://crimefirnews.com/?p=1511 आजंदे येथे आरोग्य उपकेंद्र कायम बंद; उपकेंद्र गाई-म्हशींसाठी की माणसांसाठी? जळगाव || दि.०९ फेब्रुवारी २०२६ || (हमीद तडवी):- जळगांव जिल्ह्यात रावेर तालुक्यातील आजंदे येथील आरोग्य […]

]]>
आजंदे येथे आरोग्य उपकेंद्र कायम बंद; उपकेंद्र गाई-म्हशींसाठी की माणसांसाठी?

जळगाव || दि.०९ फेब्रुवारी २०२६ || (हमीद तडवी):- जळगांव जिल्ह्यात रावेर तालुक्यातील आजंदे येथील आरोग्य उपकेंद्र गेल्या अनेक दिवसांपासून कायम बंद असल्याने ग्रामस्थांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. उपकेंद्र अस्तित्वात असूनही प्रत्यक्षात ते निष्क्रिय असल्याने परिसरातील नागरिकांना उपचारासाठी पाच ते दहा किलोमीटर अंतरावरील रावेर किंवा एनपूर येथे धाव घ्यावी लागत आहे.

आजंदे प्राथमिक आरोग्य केंद्राच्या अखत्यारीत असलेले हे उपकेंद्र केवळ लसीकरणाच्या दिवशीच उघडले जाते. इतर दिवशी अधिकारी व कर्मचारी येथे येत नसल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. उपकेंद्रात निवासाची व्यवस्था असतानाही कोणताही कर्मचारी येथे वास्तव्यास तयार नाही. परिणामी, उपकेंद्र असूनही आरोग्य सेवा पूर्णतः ठप्प आहे.

पावसाळ्यात रस्त्यांची अवस्था खराब असल्याने रुग्णांना अधिक त्रास सहन करावा लागतो. आरोग्य विभागाकडून कोणतीही ठोस उपाययोजना करण्यात आलेली नसून अधिकारी केवळ उडवाउडवीची उत्तरे देत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.

कोरोनानंतर नागरिक आरोग्याबाबत अधिक जागरूक झाले असून किरकोळ आजारासाठीही दवाखान्यात जाण्याची गरज निर्माण झाली आहे. शहरात खासगी व शासकीय रुग्णालयांची सुविधा उपलब्ध असताना ग्रामीण भागात मात्र हीच सुविधा नाही.

शासन आरोग्यासाठी मोठ्या प्रमाणावर निधी खर्च करत असले तरी त्या सुविधा ग्रामीण भागापर्यंत पोहोचत नसल्याने या सुविधा नेमक्या कोणासाठी, असा सवाल ग्रामस्थ उपस्थित करत आहेत.

बोगस डॉक्टरांचा सुळसुळाट..
ग्रामीण भागात शासकीय आरोग्य सेवा उपलब्ध नसल्यामुळे नागरिकांना खाजगी रुग्णालयात जावे लागत आहे. याच संधीचा फायदा घेत पश्चिम बंगाल, उत्तरप्रदेशसह इतर राज्यातील बोगस डॉक्टरांनी ग्रामीण भागात बेकायदेशीरपणे रुग्णालये थाटल्याचे चित्र आहे.

वैद्यकीय शिक्षण व परवानगी नसतानाही उपचार सुरू असल्याचा गंभीर प्रकार उघडकीस येत आहे.

ओपीडी बंदच..
प्रत्येक प्राथमिक आरोग्य उपकेंद्रात सकाळी ८.३० ते दुपारी १२.३० वाजेपर्यंत ओपीडी सुरू असणे बंधनकारक आहे. मात्र आजंदेसह अनेक ग्रामीण भागातील उपकेंद्रांमध्ये ओपीडी बंद असल्याचे वास्तव आहे. त्यामुळे नागरिकांना शासकीय आरोग्य सेवा मिळत नसून त्यांना खाजगी रुग्णालयात जावे लागते आहे.

आजंदे ग्रामस्थांनी उपकेंद्रात कायमस्वरूपी डॉक्टर व कर्मचारी नियुक्त करून नियमित ओपीडी सुरू करण्याची मागणी केली आहे. तालुका आरोग्य अधिकारी व जिल्हा प्रशासनाने तातडीने लक्ष घालावे, अशी जोरदार मागणी होत आहे.

]]>
जिल्हापेठ पोलिस स्टेशन नवनियुक्त गुन्हे शोधपथकाची कामगिरी २० दुचाकी वाहनांना शोधण्यात यश…. https://crimefirnews.com/799/ https://crimefirnews.com/799/#respond Sun, 15 Dec 2024 16:59:29 +0000 https://crimefirnews.com/?p=799 जिल्हापेठ पोलिस स्टेशन नवनियुक्त गुन्हे शोधपथकाची कामगिरी २० दुचाकी वाहनांना शोधण्यात यश…. जळगाव || दि.१५ डिसेंबर२०२४ || (विठ्ठल भालेराव)-: जिल्हा पेठ पोलिस स्टेशन गुरन 320/2024 […]

]]>
जिल्हापेठ पोलिस स्टेशन नवनियुक्त गुन्हे शोधपथकाची कामगिरी २० दुचाकी वाहनांना शोधण्यात यश….

जळगाव || दि.१५ डिसेंबर२०२४ || (विठ्ठल भालेराव)-: जिल्हा पेठ पोलिस स्टेशन गुरन 320/2024 बी एन एस कलम 303(2) दि 27/09/2024 रोजी दाखल आहे. या गुन्हयाचे तपासादरम्यान सी सी टी वी फुटेज गोपनिय माहिती, तांत्रिक विश्लेषणच्या आधारे आरोपींची नावे 1) शाहरुख रहमतुल्ला खाटीक वय:-28 रा.लक्ष्मी नगर जळगाव
2) सुरेश उत्तम मोरे वय:-45 रा. वाघळुद ता धरणगाव जि जळगांव
3) राजेंद्र ज्ञानेश्वर महाजन वय:-28 रा धानोरा ता धरणगाव ह मु कांचन नगर जळगाव
4) गणेश सुभाष पाथरवट वय:- 30 रा वाघळुड ता धरणगाव.
5) अविनाश सुनील पाथरवट वय :-20 रा वाघळूड ता धरणगाव.
6) विधीसंगर्षग्रस्त बालक ह मु सिन्नर जि नाशिक
वर नमूद आरोपींकडून जिल्हापेठ पोलिस स्टेशनचे नवनियुक्त गुन्हे शोध पथकाचे अंमलदार यांनी 20 दुचाकी दि 11/12/2024 रोजी हस्तगत केलेल्या आहेत.

सदर कार्यवाही ही मा पोलिस अधीक्षक श्री महेश्वर रेड्डी, मा अप्पर पोलीस अधीक्षक श्री अशोक नखाते, उपविभागीय पोलिस अधिकारी श्री संदीप गावीत मा पोलिस निरीक्षक राकेश मानगावकर यांचें मार्गदर्शनाखाली स पो नि संतोष चव्हाण, पोहेकॉ भरती देशमुख, पोना राजेश पदमर, पोकॉ मिलिंद सोनवणे, पोकॉ राहुल पाटील, पोकॉ अमितकुमार मराठे, पोकॉ प्रशांत सैंदाणे, पोकॉ नरेंद्र दिवेकर, पोकॉ प्रविण जाधव, पोकॉ विकास पहुरकर यांचें पथकाने कार्यवाही केली.

नमूद गुन्हातील आरोपीनी जिल्हापेठ पोलिस स्टेशन हद्दीतून चोरी केलेल्या असून त्या हस्तगत केलेल्या आहेत आरोपींनी मोटार सायकली बी जे मार्केट, बस स्टँड, सिव्हिल हॉस्पिटल, गोलाणी मार्केट येथून चोरी केल्याचं आरोपी सांगत आहे गर्दीचे ठिकाण टार्गेट केलं आहे आरोपींचे रेकॉर्ड चेक केले असता 1) राजेंद्र ज्ञानेश्वर महाजन वय:-28 रा धानोरा ता धरणगाव ह मु कांचन नगर जळगाव याचेवर जिल्हापेठ पोलिस स्टेशन येथे भादवी कलम 354 प्रमाणे गुन्हा दाखल आहे.

]]>
https://crimefirnews.com/799/feed/ 0
एमआयडीसी पोलिसांची उत्कृष्ठ कामगिरी; नाशिक जिल्ह्यातील चोरी गेलेल्या डंपर ला शोधण्यात आले यश… https://crimefirnews.com/789/ https://crimefirnews.com/789/#respond Fri, 13 Dec 2024 17:56:13 +0000 https://crimefirnews.com/?p=789 एमआयडीसी पोलिसांची उत्कृष्ठ कामगिरी; नाशिक जिल्ह्यातील चोरी गेलेल्या डंपर ला शोधण्यात आले यश… जळगाव || दि.१३डिसेंबर २०२४ || (विठ्ठल भालेराव):- नाशिक जिल्हा येथील मालेगाव तालुका […]

]]>
एमआयडीसी पोलिसांची उत्कृष्ठ कामगिरी; नाशिक जिल्ह्यातील चोरी गेलेल्या डंपर ला शोधण्यात आले यश…

जळगाव || दि.१३डिसेंबर २०२४ || (विठ्ठल भालेराव):- नाशिक जिल्हा येथील मालेगाव तालुका पोलिस स्टेशन यांचेकडील गु.र.न.716/2024 भारतीय न्याय संहिता कलम 303 (2) प्रमाणे गुन्हा दाखल असून सदर गुन्ह्यातील फिर्यादी नामे ऋषिकेश महारू मोरे यांचा मालकीचा 11,00,000 /- रुपये किमतीचा डंपर क्र एम एच 15 डी के- 9753 हा लोनवाडे येथून दि 11/12/2024 रोजी चोरी गेलं होता.

सदर गुन्ह्यातील तपास अधिकारी यांनी मा पोलिस निरीक्षक संदीप पाटील यांना सदरचा डंपरचा शोध घेणे बाबत कळविले असता पोलिस निरीक्षक यांनी गुन्हे शोध पथकातील पोउपनि शरद बागल यांना सदर डंपरचा शोध घेण्याच्या सूचना दिल्या होत्या त्यानुसार शरद बागल यांनी पोना योगेश बारी , पोका विशाल कोळी, राहुल रगडे यांच्यासह सदर डंपरची सी सी टी व्ही कॅमेऱ्याच्या सहाय्यानं पाहणी करीत असता सदरील डंपर हा एमआयडीसी परिसरात गेल्याचे दिसून आल्याने सतत दोन दिवस संपूर्ण परिसर शोधून काढत असताना आज दि 13/12/2024 रोजी सदर डंपर हा फातिमा नगर परिसरात निर्जन स्थळी उभा असल्याचे दिसून आल्याने सदरचा डंपर हा पंचनामा कारवाई करून ताब्यात घेऊन मालेगाव तालुका पोलिस स्टेशनशी संपर्क करून त्यांचा ताब्यात देण्यात आला.

सदरची कार्यवाही ही मा पोलिस अधीक्षक श्री महेश्वर रेड्डी, मा अप्पर पोलीस अधीक्षक श्री अशोक नखाते, मा उपविभागीय पोलिस अधिकारी श्री संदीप गावीत यांचे मार्गदर्शनाखाली मा पोलिस निरीक्षक संदीप पाटील , पोउपनि शरद बागल , पोना योगेश बारी, पोका विशाल कोळी, राहुल रगडे यांनी केली आहे.

]]>
https://crimefirnews.com/789/feed/ 0