#JalgaonEduction #Jalgaonschool #educationdepartment #trophy #award – Crime Fir News https://crimefirnews.com Online Sun, 15 Dec 2024 16:16:36 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.9.1 https://crimefirnews.com/wp-content/uploads/2024/06/cropped-cRIME-LOGO-1-1-32x32.png #JalgaonEduction #Jalgaonschool #educationdepartment #trophy #award – Crime Fir News https://crimefirnews.com 32 32 पठाण आसिफ खानसर अलफैज उर्दू हायस्कूल मुख्याध्यापकांना राज्यस्तरीय पुरस्कार… https://crimefirnews.com/795/ https://crimefirnews.com/795/#respond Sun, 15 Dec 2024 16:16:32 +0000 https://crimefirnews.com/?p=795 पठाण आसिफ खानसर यांना राज्यस्तरीय पुरस्कार…   जळगाव || दि.१५ डिसेंबर २०२४ || {विठ्ठल भालेराव}-: अलफैज फाउंडेशन संचलित अलफैज उर्दू हायस्कूल अलफैज कॅम्पस शिवाजी नगर […]

]]>
पठाण आसिफ खानसर यांना राज्यस्तरीय पुरस्कार…

 

जळगाव || दि.१५ डिसेंबर २०२४ || {विठ्ठल भालेराव}-: अलफैज फाउंडेशन संचलित अलफैज उर्दू हायस्कूल अलफैज कॅम्पस शिवाजी नगर जळगावचे मुख्याध्यापक पठाण आसिफ खान युसुफ खान यांना अनुश्री महिला बहुउद्देशीय सामाजिक तथा शैक्षणिक संस्था भुसावळ यांच्या वतीने भारतीय संविधानाच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त राज्यस्तरीय सन्मान गौरव सेवार्थ पुरस्कार देण्यात आला. हा पुरस्कार कृष्णचंद्र सभागृह भुसावळ येथे मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.

महाराष्ट्रातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या लोकांच्या कार्यास गती मिळावी व प्रेरणा मिळावी तसेच त्यामधून समाजात नवचैतन निर्माण व्हावे या हेतूने दरवर्षी राज्यस्तरीय महाराष्ट्ररत्न गुणगौरव पुरस्कार प्रदान केले जातात. यावर्षी अलफैज उर्दू हायस्कूलचे मुख्याध्यापक पठाण आसिफ खान यांना शिक्षण क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.

अशावेळी प्रमुख अतिथी म्हणून लॉर्ड बुद्धा टीव्ही चॅनेल चे भैय्याजी खैरकर, भुसावळ शहरातील हृदयरोग तज्ञ तथा समाजसेवक डॉक्टर राजेश मानवतकर, माजी उपनगराध्यक्ष लक्ष्मी मकासरे, लॉर्ड बुद्धा टीव्ही चॅनेल चे सचिन मून, गजेंद्र गवई, ऑल इंडिया एससी एसटी रेल्वे एम्प्लॉईज असोसिएशन झोनल अतिरिक्त सचिव आणि मंडळ अध्यक्ष भुसावळ डिव्हिजनचे सुधीर जंजाळे, कोळी समाजाच्या समाजसेविका रूपाली सूर्यवंशी यांच्यासह समाजसेवक विशाल सोळंके, वंचित बहुजन आघाडीचे माजी जिल्हाध्यक्ष विनोद सोनवणे, युवा जिल्हाध्यक्ष बाळा पवार, शमीभा पाटील, शहर पोलीस स्टेशनचे संदीप बडगे, दिनेश शिखरे, समाजसेविका संगीता भांबरे, समाजसेवक समाधान निकम, अंजूम खान, गोकुळ पाटील, समाजसेवक सुरेश यशोदे आदि मान्यवर उपस्थित होते.

 

सदर कार्यक्रमाचे आयोजन अनुश्री महिला बहुउद्देशीय संस्थेच्या अध्यक्षा जयश्रीताई इंगळे यांनी केले होते.पठाण आसिफ यांना शाळेचे अध्यक्ष अ. अजीज सालार, शाळेचे चेअरमन मुश्ताक सालार, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी शुभेच्छा दिल्या…

]]>
https://crimefirnews.com/795/feed/ 0