#Nandurbardistrict #Nandurbarcollector #NandurbarMLA – Crime Fir News https://crimefirnews.com Online Sat, 24 Jan 2026 19:53:44 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.9.4 https://crimefirnews.com/wp-content/uploads/2024/06/cropped-cRIME-LOGO-1-1-32x32.png #Nandurbardistrict #Nandurbarcollector #NandurbarMLA – Crime Fir News https://crimefirnews.com 32 32 आंतरराष्ट्रीय अल्पसंख्यांक हक्क दिवसानिमित्त नंदुरबार येथे विविध स्पर्धा व परिसंवाद कार्यक्रम संपन्न.. https://crimefirnews.com/1372/ Thu, 18 Dec 2025 14:42:48 +0000 https://crimefirnews.com/?p=1372 आंतरराष्ट्रीय अल्पसंख्यांक हक्क दिवसानिमित्त नंदुरबार येथे विविध स्पर्धा व परिसंवाद कार्यक्रम संपन्न.. नंदुरबार दि. १८ डिसेंबर २०२५ (फिरोज खान) -: अल्पसंख्यांक विकास विभाग, महाराष्ट्र राज्य […]

]]>
आंतरराष्ट्रीय अल्पसंख्यांक हक्क दिवसानिमित्त नंदुरबार येथे विविध स्पर्धा व परिसंवाद कार्यक्रम संपन्न..

नंदुरबार दि. १८ डिसेंबर २०२५ (फिरोज खान) -: अल्पसंख्यांक विकास विभाग, महाराष्ट्र राज्य तथा जिल्हा नियोजन विभाग, नंदुरबार यांच्या संयुक्त विद्यमाने आंतरराष्ट्रीय अल्पसंख्यांक हक्क दिवसानिमित्त जिल्हा नियोजन भवन, नंदुरबार येथील सभागृहात वक्तृत्व, भित्तीपत्र व निबंध स्पर्धांचे बक्षीस वितरण तसेच परिसंवाद कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अप्पर जिल्हाधिकारी धनंजय गोगटे होते. प्रमुख अतिथी म्हणून उपविभागीय पोलीस अधिकारी संजय महाजन, निवासी उपजिल्हाधिकारी आशा सांघवी, जिल्हा नियोजन अधिकारी शशांक काळे, प्राथमिक शिक्षणाधिकारी भानुदास रोकडे, मौलाना आझाद अल्पसंख्यांक आर्थिक विकास महामंडळाचे विजय सैंदाणे तसेच सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी एजाज बागवान, मौलाना जकरीया व अमिन कुरैशी उपस्थित होते.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राथमिक शिक्षणाधिकारी भानुदास रोकडे यांनी केले. त्यांनी आंतरराष्ट्रीय अल्पसंख्यांक हक्क दिवसाचे महत्त्व व आयोजित स्पर्धांची माहिती दिली.

यानंतर विद्यार्थी मनोगत कार्यक्रमात काजी निदा फातेमा, लायबा सैय्यद, फहमिना शाह, अतिफा मोमीन, आमेना सैय्यद, कादीर अन्सारी व दानिश कुरैशी यांनी आपले विचार मांडले.

यावेळी अल्पसंख्यांक विभागाच्या विविध योजनांची माहिती जिल्हा नियोजन अधिकारी शशांक काळे तसेच मौलाना आझाद अल्पसंख्यांक आर्थिक विकास महामंडळाचे विजय सैंदाणे यांनी दिली.

अध्यक्षीय समारोपात अप्पर जिल्हाधिकारी धनंजय गोगटे यांनी अल्पसंख्यांक विकासाच्या योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्याच्या सूचना दिल्या.

अल्पसंख्याक समुदायासाठी राबविण्यात येणाऱ्या प्रमुख योजना-:
नंदुरबार जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत पुढील महत्त्वाच्या योजना प्रभावीपणे राबविण्यात येत आहेत —

  1. अल्पसंख्याक बहुल शासनमान्य खाजगी शाळा, कनिष्ठ महाविद्यालय, औद्योगिक प्रशिक्षण संस्था व अपंग शाळांमध्ये पायाभूत सुविधा पुरविणे
  2. डॉ. झाकीर हुसेन मदरसा आधुनिकीकरण योजना
  3. धर्मदाय आयुक्तांकडे नोंदणीकृत व ५१% पेक्षा अधिक बौद्ध समाजातील विश्वस्त/सदस्य असलेल्या संस्थांना पायाभूत सुविधा पुरविणे
  4. निवासी पोलीस भरतीपूर्व प्रशिक्षण योजना (अल्पसंख्याक उमेदवारांसाठी)

संपर्क: जिल्हा नियोजन अधिकारी तथा जिल्हा अल्पसंख्यांक अधिकारी, नंदुरबार

  1. अल्पसंख्याक बहुल नागरी क्षेत्र विकास योजना
    संपर्क: मुख्याधिकारी, नगरपरिषद / नगरपंचायत
  2. अल्पसंख्याक बहुल ग्रामीण क्षेत्र विकास योजना
    संपर्क: उपमुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रामपंचायत), जिल्हा परिषद
  3. डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम शैक्षणिक कर्ज योजना
  4. डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम मुदत कर्ज योजना
  5. डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम सूक्ष्म पतपुरवठा योजना
  6. मौलाना आझाद शैक्षणिक कर्ज योजना

संपर्क: मौलाना आझाद अल्पसंख्यांक आर्थिक विकास महामंडळ, नंदुरबार

या प्रसंगी अल्पसंख्यांक विकासाच्या विविध योजनांची माहिती दर्शविणाऱ्या फलकाचे अनावरण व प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.

तसेच आयोजित वक्तृत्व, भित्तीपत्र व निबंध स्पर्धांमध्ये तालुकास्तरावर प्रथम क्रमांक प्राप्त विद्यार्थ्यांचा प्रमाणपत्र व ट्रॉफी देऊन गौरव करण्यात आला.

तसेच तालुकास्तरावर कार्यक्रमांचे यशस्वी आयोजन केल्याबद्दल प्राचार्य फैय्याज पठाण, हरीष बोरसे, रफिक जहांगीरदार, जव्वाद सैय्यद, सत्यजित नाईक, कालिदास पाठक, इसरार सैय्यद व मुदब्बीर पठाण यांचा सत्कार करण्यात आला.

पोलीस भरतीपूर्व प्रशिक्षणात उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल अशफाक इनामदार व जव्वाद कुरैशी यांचाही सत्कार करण्यात आला.

कार्यक्रमात विशेष बाब म्हणून दोन्ही डोळ्यांनी दिव्यांग असूनही वक्तृत्व स्पर्धेत सहभागी झालेल्या रहेबर शाळा, नंदुरबार येथील विद्यार्थी मोहम्मद दानिश कुरैशी यांचा अल्पसंख्यांक अधिकारी व कर्मचारी संघटनेमार्फत ₹1100/- रोख रकमेने गौरव करण्यात आला.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिक्षण विभागाचे डॉ. युनूस पठाण यांनी केले तर आभार जिल्हा नियोजन अधिकारी शशांक काळे यांनी मानले. राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली.

कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सहाय्यक जिल्हा नियोजन अधिकारी लक्ष्मण कोकणी व संतोष बोधडे तसेच मनीष सूर्यवंशी यांनी विशेष परिश्रम घेतले.

]]>
नगरपरिषद निवडणुकांसाठी नवापूर येथील मतदान यंत्र सुरक्षा कक्षाची जिल्हाधिकाऱ्यांकडून पाहणी…. https://crimefirnews.com/1342/ Thu, 27 Nov 2025 05:06:51 +0000 https://crimefirnews.com/?p=1342 नगरपरिषद निवडणुकांसाठी नवापूर येथील मतदान यंत्र सुरक्षा कक्षाची जिल्हाधिकाऱ्यांकडून पाहणी…. नंदुरबार || दिनांक 2७ नोव्हेंबर 2025 || (फिरोज खान) :- नगरपरिषद निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मतदान प्रक्रिया […]

]]>
नगरपरिषद निवडणुकांसाठी नवापूर येथील मतदान यंत्र सुरक्षा कक्षाची जिल्हाधिकाऱ्यांकडून पाहणी….

नंदुरबार || दिनांक 2७ नोव्हेंबर 2025 || (फिरोज खान) :- नगरपरिषद निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मतदान प्रक्रिया सुरळीत, सुरक्षित आणि पूर्णपणे पारदर्शक होण्यासाठी प्रशासनाकडून मोठ्या प्रमाणावर तयारी सुरू आहे.

या तयारीचा एक महत्त्वपूर्ण भाग म्हणून मतदान केंद्रांवर वापरण्यात येणाऱ्या मतदान यंत्रांच्या सुरक्षिततेची पाहणी आज मा.जिल्हाधिकारी डॉ.मित्ताली सेठी यांनी केली.

नवापूर तालुक्यातील शासकीय धान्य गोदाम येथे मतदानासाठी प्राप्त झालेली मतदार यंत्रे (EVM–VVPAT) मतदान सुरक्षा कक्षात ठेवण्यात आलेली आहेत. जिल्हाधिकाऱ्यांनी या संपूर्ण व्यवस्थेची प्रत्यक्ष पाहणी करून यंत्रांची सुरक्षितता, नोंदी, शासकीय प्रोटोकॉल यांची सविस्तर माहिती घेतली.

पाहणीदरम्यान डॉ. सेठी यांनी मतदान सुरक्षा कक्षात सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची संख्या वाढविण्याच्या, तसेच फायर एक्झ्टिंग्विशर बसविण्याच्या स्पष्ट सूचना दिल्या. मतदान यंत्र सुरक्षा कक्ष उच्च सुरक्षा मानकांनुसार असणे अत्यावश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.

नगरपरिषद निवडणूक 2025 साठी उभारण्यात आलेल्या मतदान यंत्र सुरक्षा कक्ष आणि मतमोजणी केंद्राचीही त्यांनी स्वतंत्रपणे पाहणी केली. संपूर्ण निवडणूक प्रक्रिया सुरक्षित, निष्पक्ष व काटेकोरपणे राबविण्यासाठी सर्व विभागांनी समन्वयाने काम करावे, असा संदेश त्यांनी दिला.

पाहणीदरम्यान नवापूर तहसीलदार, पोलीस निरीक्षक, मुख्याधिकारी, निवासी नायब तहसीलदार तसेच सर्व संबंधित अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते. प्रशासनाकडून निवडणूक तयारीचा वेग वाढला असून, मतदारांमध्येही या बाबत उत्सुकता आहे.

]]>
गहाळ झालेले 215 मोबाईल हस्तगत करण्यात नंदुरबार जिल्हा पोलीस दलास यश..! https://crimefirnews.com/1301/ Mon, 17 Nov 2025 15:20:14 +0000 https://crimefirnews.com/?p=1301 गहाळ झालेले 215 मोबाईल हस्तगत करण्यात नंदुरबार जिल्हा पोलीस दलास यश..! नंदुरबार दि.१७ नोव्हेंबर २०२५ ( फिरोज खान) :- 32 लाख 07 हजार 896 रुपये […]

]]>
गहाळ झालेले 215 मोबाईल हस्तगत करण्यात नंदुरबार जिल्हा पोलीस दलास यश..!

नंदुरबार दि.१७ नोव्हेंबर २०२५ ( फिरोज खान) :- 32 लाख 07 हजार 896 रुपये किमतीचे एकुण 215 मोबाईल हस्तगत, जिल्हा पोलीस अधीक्षक श्रवण दत्त. एस यांचे हस्ते मोबाईल मुळ मालकांना परत…

नंदुरबार जिल्हा पोलीस अधीक्षक श्रवण दत्त. एस यांचे मार्गदर्शनाखाली जिल्हयातील मागील काही महिन्यांमध्ये गहाळ झालेले नागरिकांचे विविध कंपन्यांचे मोबाईल फोन शोधण्यात नंदुरबार पोलीसांना यश मिळाले असुन त्यामध्ये तब्बल 32 लाख 07 हजार 896 रुपये किमतीचे एकुण 215 मोबाईल फोन हस्तगत करण्यात आले आहेत.

पोलीसांनी सी.ई.आय. आर. पोर्टलचे मदतीने मोबाईल ट्रॅकिंगसाठी IMEI क्रमांकाचा वापर करुन विविध ठिकाणी शोधमोहीम राबवली. यात गहाळ झालेले मोबाईल जिल्हयातुन तसेच जिल्हयाबाहेरुन देखील हस्तगत करण्यात आले असुन त्यामध्ये सायबर सेल, स्थानिक गुन्हे शाखा आणि स्थानिक पोलीस ठाणे यांनी संयुक्तरित्या कामगिरी करत मोबाईल्स हस्तगत केले आहेत.

आज रोजी संवाद हॉल, पोलीस अधीक्षक कार्यालय येथे उपस्थित गहाळ झालेल्या मोबाईलचे मुळ मालकांना त्यांचे मोबाईल जिल्हा पोलीस अधीक्षक श्रवण दत्त. एस यांचे हस्ते परत करण्यात आले असुन उपस्थितांनी पोलीसांचे कामगिरीबद्दल समाधान व्यक्त करुन आभार मानले आहे.

“यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक श्रवण दत्त. एस यांनी नागरिकांना आवाहन केले की, मोबाईल हरवल्यास तात्काळ सी.ई.आय.आर. पोर्टलवर ऑनलाईन तक्रार दाखल करावी तसेच आपल्या मोबाईलचा IMEI क्रमांक जपून ठेवणे गरजेचे आहे, जेणेकरुन मोबाईलचा लवकर शोध घेण्यात मदत होईल.”

सदर कार्यक्रमावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक श्रवण दत्त.एस, अपर पोलीस अधीक्षक आशित कांबळे, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील तसेच इतर अधिकारी व अंमलदार असे उपस्थित होते.

]]>
नंदुरबार जिल्हा पोलीस दलातील अंमलदार सेवेतून बडतर्फ… https://crimefirnews.com/1228/ Wed, 15 Oct 2025 17:19:13 +0000 https://crimefirnews.com/?p=1228 जिल्हा पोलीस दलातील अंमलदार सेवेतून बडतर्फ… नंदुरबार || दि १५ ऑकटोबर २०२५ || (फिरोज खान) :- दिनांक 16/09/2025 रोजी नंदुरबार शहरातील उपनगर पोलीस ठाण्याचे हद्दीत […]

]]>
जिल्हा पोलीस दलातील अंमलदार सेवेतून बडतर्फ…

नंदुरबार || दि १५ ऑकटोबर २०२५ || (फिरोज खान) :- दिनांक 16/09/2025 रोजी नंदुरबार शहरातील उपनगर पोलीस ठाण्याचे हद्दीत घडलेल्या जय वळवी नामक व्यक्तीचे खुनाचे प्रकरणातील मुख्य आरोपो नामे सुर्यकांत सुधाकर मराठे ऊर्फ भैय्या बोबडया याचे सोबत कपडे खरेदीसाठी गेलेल्या पोलीस शिपाई 489 चेतन निंबाजी चौधरी, नेमणूक- तळोदा पोलीस ठाणे यांचेसह इतर आरोपींवर उपनगर पोलीस ठाणे येथे गु.र.नं. 258/2025 भारतीय न्याय संहिता 2023 चे कलम 109,352, 351 इ. अन्वये दि.17/09/2025 रोजी गुन्हा दाखल करण्यात आला होता.

नमुद गुन्हयातील मुख्य आरोपी सुर्यकांत मराठे याचा गुन्हेगारीचा पुर्व इतिहास माहिती असतांना देखील त्याचे सोबत राहणे तसेच गुन्हा घडतेवेळी आरोपीस ताब्यात घेणे, नजिकच्या पोलीस ठाण्यात लागलीच घटनेबाबत कळविणे आवश्यक असतांनाही निलंबित पोशि/489 चेतन चौधरी यांनी आपले कर्तव्यात अत्यंत बेशिस्त, बेजबाबदार व निष्काळजीपणाचे तसेच हलगर्जिपणाचे वर्तन केले आहे. निलंबित पोलीस शिपाई चेतन चौधरी यांचे अशा नैतिक अधःपतन दर्शविणाऱ्या वर्तनामुळे पोलीस दलाची प्रतिमा मलीन झाली.

त्याअन्वये जिल्हा पोलीस अधीक्षक श्रवण दत्त. एस यांनी पोशि/489 चेतन निंबाजी चौधरी यास भारतीय संविधान – 1950 मधील अनुच्छेद 311 (2) (ब) मधील तरतुदीनुसार शासकीय सेवेतून बडतर्फ केले आहे.पोलीस दलात शिस्त, प्रामाणिकपणा व पारदर्शकता यांना सर्वोच्च प्राधान्य देण्यात येते. सेवेत असतांना कोणत्याही अधिकारी व अंमलदाराने नियमबाह्य वर्तन केल्यास त्यांचेवर कठोर शिस्तभंगविषयक कारवाई करण्यात येईल, असा इशारा जिल्हा पोलीस अधीक्षक श्रवण दत्त. एस यांनी यावेळी दिला आहे.

]]>
आगामी गणेशोत्सवाचे अनुषंगाने जिल्हा पोलीस दलातर्फे शांतता समिती बैठकीचे आयोजन..! https://crimefirnews.com/1084/ Tue, 12 Aug 2025 17:57:03 +0000 https://crimefirnews.com/?p=1084 आगामी गणेशोत्सवाचे अनुषंगाने जिल्हा पोलीस दलातर्फे शांतता समिती बैठकीचे आयोजन..! नंदुरबार || दि. १२ ऑगस्ट२०२५ || (फिरोज खान ) :- जिल्हयाभरातील विविध गणेश मंडळांचे पदाधिकारी […]

]]>
आगामी गणेशोत्सवाचे अनुषंगाने जिल्हा पोलीस दलातर्फे शांतता समिती बैठकीचे आयोजन..!

नंदुरबार || दि. १२ ऑगस्ट२०२५ || (फिरोज खान ) :- जिल्हयाभरातील विविध गणेश मंडळांचे पदाधिकारी तसेच प्रतिष्ठित नागरिकांची उपस्थित होती. आगामी गणेशोत्सवाचे औचित्य साधून जिल्हा पोलीस दलातर्फे आज दि. 12/08/2025 रोजी जिल्हास्तरीय शांतता समितीची बैठक पोलीस मुख्यालय मैदान, नंदुरबार येथे आयोजित करण्यात आली. जिल्हा पोलीस अधीक्षक श्रवण दत्त. एस यांचे अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीस जिल्हयातील विविध गणेश मंडळांचे पदाधिकारी, सामाजिक व धार्मिक संस्थांचे प्रतिनिधी, प्रतिष्ठित नागरिक तसेच प्रसारमाध्यमांचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

सदर बैठकीत आगामी गणेशोत्सवाचे काळात जिल्हयात कायदा व सुव्यवस्था कायम ठेवण्यासाठी आवश्यक त्या सर्व उपाययोजना राबविण्याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली.

त्यामध्ये गणेश मंडळांचे परिसरातील सुरक्षा व्यवस्था, वाहतुक कोंडी टाळण्यासाठी पर्यायी मार्ग, सार्वजनिक ठिकाणी गर्दीचे नियंत्रण, मिरवणूक मार्गावरील सुरक्षा व्यवस्था तसेच वेळेचे बंधन पाळणे, सी.सी.टी.व्ही. देखरेख, आपत्कालीन सेवांची उपलब्धता, तसेच ध्वनीप्रदुषण नियंत्रणासंबंधी नियम पाळणे अशा विविध मुद्दयावर पोलीस अधीक्षक श्रवण दत्त.एस यांचेकडुन सुचना तसेच मार्गदर्शन करण्यात आले.


बैठकीदरम्यान जिल्हयाभरातील विविध ठिकाणांहून आलेल्या गणेश मंडळांचे प्रतिनिधींनीही आपले मत व अडचणी मांडल्या. तसेच गणेशोत्सवाचे दरम्यान जिल्हा पोलीस दलास आवश्यक ते सहकार्य करण्याची तयारी दर्शविली आहे.

यावेळी बोलतांना जिल्हा पोलीस अधीक्षक श्रवण दत्त. एस यांनी नागरिकांना आवाहन केले की, ” गणेशोत्सव हा आनंद, भक्ती व एकतेचा सण असून तो शांततेत, सुरक्षिततेत व उत्साहात साजरा करण्यासाठी सर्वांनी परस्पर सहकार्य करावे.


कोणत्याही प्रकारचा धार्मिक वाद, अफवा किंवा गोंधळ निर्माण होऊ न देता पोलीस प्रशासनास सहकार्य करणे ही प्रत्येकाची जबाबदारी आहे. तसेच कुठल्याही प्रकारचा अनुचित प्रकार आपल्यास आढळून आल्यास त्याबाबत जिल्हा पोलीस दलास कळवावे.

सदर कार्यक्रमात जिल्हा पोलीस अधीक्षक श्रवण दत्त. एस, अपर पोलीस अधीक्षक आशित कांबळे, उपविभागीय पोलीस अधिकारी, नंदुरबार उपविभाग संजय महाजन, उपविभागीय पोलीस अधिकारी, शहादा, अक्कलकुवा उपविभाग दत्ता पवार, नगरपालीकेचे कार्यकारी अधिकारी राहूल वाघ, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील तसेच जिल्हयातील सर्व पोलीस ठाण्यांचे प्रभारी अधिकारी व अंमलदार तसेच जिल्हयाभरातील विविध गणेश मंडळांचे पदाधिकारी, प्रतिष्ठीत नागरिक असे 350 ते 400 नागरिकांची उपस्थिती होती.

]]>
०९ ऑगस्ट विश्व आदिवासी दिनाचे अनुषंगाने पोलीस दलातर्फे शहरात विशेष बैठकीचे आयोजन.. https://crimefirnews.com/1049/ https://crimefirnews.com/1049/#respond Tue, 05 Aug 2025 15:44:35 +0000 https://crimefirnews.com/?p=1049 ०९ ऑगस्ट विश्व आदिवासी दिनाचे अनुषंगाने पोलीस दलातर्फे शहरात विशेष बैठकीचे आयोजन.. नंदुरबार दि.०५ ऑगस्ट२०२५ (फिरोज खान) :- दिनांक 09 ऑगस्ट 2025 रोजी विश्व आदिवासी […]

]]>
०९ ऑगस्ट विश्व आदिवासी दिनाचे अनुषंगाने पोलीस दलातर्फे शहरात विशेष बैठकीचे आयोजन..

नंदुरबार दि.०५ ऑगस्ट२०२५ (फिरोज खान) :- दिनांक 09 ऑगस्ट 2025 रोजी विश्व आदिवासी दिनाचे अनुषंगाने जिल्हयात कायदा व सुव्यवस्था सुरळीत राखण्यासाठी तसेच विविध मंडळांकडून घेण्यात येणारे मिरवणुक कार्यक्रम शांततेत पार पडावे, यासाठी जिल्हा पोलीस दलातर्फे आज अटल बिहारी वाजपेयी सभागृह, नंदुरबार येथे विशेष बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.

जिल्हा पोलीस अधीक्षक श्रवण दत्त. एस यांचे मार्गदर्शनाखाली सदर बैठकीत उपविभागीय पोलीस अधिकारी, नंदुरबार संजय महाजन यांनी शहर तसेच उपनगर पोलीस ठाणे हद्दीतील विविध मंडळांचे तसेच संघटनांचे पदाधिकारी व सदस्य यांना मार्गदर्शनपर सुचना केल्या असुन त्यामध्ये 09 ऑगस्ट रोजी निघणाऱ्या मिरवणुक तसेच विविध कार्यक्रमात सहभागी मंडळांनी मिरवणुक मार्ग तसेच कार्यक्रमाचे वेळेत ऐनवेळी कोणत्याही प्रकारचा बदल करु नये, मिरवणुकीत आपले स्वयंसेवक नेमावेत, मिरवणुक कार्यक्रमात मदय पिवून कोणी येणार नाही याची खबरदारी घ्यावी. त्याचप्रमाणे मिरवणुक कार्यक्रमादरम्यान इतर समाजाच्या भावना दुखावतील अशी आक्षेपार्ह बॅनर, प्रतिमा, झेंडे, घोषणाबाजी, भाषण इत्यादी करणार नाही, याबाबतची काळजो संबंधित मंडळाचे पदाधिकाऱ्यांनी घ्यावी.

त्याचप्रमाणे मा. सर्वोच्च न्यायालयाने ठरवून दिलेल्या डेसीबल पेक्षा जास्त आवाज करुन ध्वनी प्रदुषण होणार नाही याची देखील खबरदारी घेणे आवश्यक असून मिरवणूकीत कोणीही प्राणघातक शस्त्रे सोबत आणणार नाहीत, याबाबतची दक्षता संबंधित मंडळांचे पदाधिकाऱ्यांनी घ्यावो बाबत संजय महाजन यांनी सुचना केल्या. सदर बैठकित उपस्थित मंडळांचे पदाधिकारी व सदस्य यांनी आपले मनोगत व्यक्त करुन सर्व मिरवणूका व कार्यक्रम शांततेत पार पडतील अशी यावेळी ग्वाही दिली आहे.

सदर बैठकीला संजय महाजन, उपविभागीय पोलीस अधिकारी, नंदुरबार शहर, राहुल वाघ, मुख्याधिकारी, नगरपालिका, नंदुरबार, हेमंतकुमार पाटील, पोलीस निरीक्षक, शहर पोलीस ठाणे, किरणकुमार खेडकर, पोलीस निरीक्षक, उपनगर पोलीस ठाणे, राजेश वळवी, अध्यक्ष- महाराष्ट्र आदिवासी डॉक्टर असोसिएशन तसेच विविध मंडळांचे 90 ते 100 पदाधिकारी व सदस्य असे उपस्थित होते.

]]>
https://crimefirnews.com/1049/feed/ 0
निवडणुकीत सार्वजनिक ठिकाणी तात्पुरती पक्ष कार्यालये स्थापण्यास निर्बंध; जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांचे निर्देश.. https://crimefirnews.com/655/ https://crimefirnews.com/655/#respond Sun, 27 Oct 2024 13:13:13 +0000 https://crimefirnews.com/?p=655 निवडणुकीत सार्वजनिक ठिकाणी तात्पुरती पक्ष कार्यालये स्थापण्यास निर्बंध; जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांचे निर्देश.. नंदुरबार, दिनांक 27 ऑक्टोबर, 2024 (फिरोज खान)-: विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 […]

]]>
निवडणुकीत सार्वजनिक ठिकाणी तात्पुरती पक्ष कार्यालये स्थापण्यास निर्बंध; जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांचे निर्देश..

नंदुरबार, दिनांक 27 ऑक्टोबर, 2024 (फिरोज खान)-: विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 च्या आदर्श आचारसंहिता कालावधीत जिल्ह्यातील कुठल्याही सार्वजनिक ठिकाणी तात्पुरती पक्ष कार्यालये स्थापन करण्यास मनाई करण्यात आली आहे. त्या संदर्भात स्वतंत्र आदेश जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांनी जारी केले आहेत.

भारत निवडणूक आयोगाकडून महाराष्ट्र विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 चा कार्यक्रम 15 ऑक्टोबर 2024 पासून घोषित केला आहे. या दिनांकापासून आदर्श आचार संहिता अंमलात आली आहे.

जिल्ह्यातील विधानसभा निवडणुकीची संपूर्ण प्रक्रिया शांततेत, निर्भय व न्याय वातावरणात पार पाडण्याच्या दृष्टिकोनातून भारतीय नागरी सुरक्षा संहिता 2023 चे कलम 163 अन्वये प्रदान करण्यात आलेल्या शक्तीचा वापर करून जिल्ह्यातील धार्मिक स्थळे, रूग्णालये, शैक्षणिक संस्था व सार्वजनिक ठिकाणांच्या आवारात तात्पुरती पक्ष कार्यालये स्थापन करण्यावर निवडणूक प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत म्हणजेच 25 नोव्हेंबर 2024 पर्यंत जिल्हाधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांनी निर्बंध घालण्याचे आदेश दिले आहेत.

हे आदेश निवडणूक प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत अंमलात राहतील. या आदेशाचा भंग करणाऱ्या व्यक्तीवर भारतीय न्याय संहिता, 2023 चे कलम 223 अन्वये कारवाई केली जाईल, असेही जिल्हादंडाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांनी आदेशित केले आहे.

]]>
https://crimefirnews.com/655/feed/ 0