महिलेशी गैरवर्तन; जातिवाचक भाष्य सेंट्रल बँकच्या मॅनेजरवर गंभीर कलमांवय गुन्हा दाखल…

महिलेशी गैरवर्तन; जातिवाचक भाष्य सेंट्रल बँकच्या मॅनेजरवर गंभीर कलमांवय गुन्हा दाखल….

नंदुरबार || दि.११ जुलै २०२५ || (फिरोज खान):– नंदुरबार शहरातील घी बाजार येथील सेंट्रल बँक ऑफ इंडिया, नंदुरबार शाखेचा बँक मॅनेजर शाम धुडकु खारकर ने एका महिलेला हाथ धरुन धक्काबुक्की, शिवीगाळ, जातिवाचक भाष्य करुन धमकी दिल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

या प्रकरणी संबंधित महिलेनं शहर पोलिसात तक्रार दाखल केल्यानंतर बँक मॅनेजरवर विनयभंगासह इतर गंभीर कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तक्रारदार महिलेने आपल्या फिर्यादित म्हटले आहे की, ती बँकेतील कामासाठी गेली असता बँक मॅनेजर खारकरने तिच्या हाथ धरून महिलेला लज्जा येईल अश्या प्रकारे धक्काबुक्की करत उद्धटपणेची वागणुक व जातीवाचक भाष्य करत धमकी दिली. एवढंच नव्हे, तर त्याने बाहेरचे लोक बोलावून तुला दाखवतो अश्या खुलेआम धमक्याही दिले.

या प्रकारामुळे बँकेतील इतर ग्राहकही काही काळ हादरून गेले होते. या घटनेमुळे ग्राहकांत संतापाचे वातावरण असून, बँक मॅनेजरने ग्राहकांशी वागताना संयम आणि शिस्त पाळणे आवश्यक असताना असे वागणे अत्यंत निषेधार्ह असल्याची चर्चा सुरू आहे.

सदर प्रकरणाचा अधिक तपास नंदुरबार पोलीस करीत असून, खारकर विरोधात कायदेशीर कारवाईची मागणी जोर धरत असतांना पोलिसांनी भारतीय न्याय संहितेची धारा 74, 115(2), 352, 351(2) अन्वय गुन्हा दाखल करत कार्रावाई सुरु केली असून घटनेच्या वेळची बँकेतील cctv फुटेज ही ताब्यात घेतली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Call Us