विशाळगड घटनेची सखोल चौकशी CBI / विशेष न्यायाधीश मार्फत करण्यात यावी – अल्पसंख्याक विकास व हक्क फाउंडेशनची मागणी…
धुळे : दि.१९ जुलै (वसीम शेख)-: गाजापुर (विशालगड) मध्ये झालेल्या निंदणीय घटना ज्यामध्ये अतिक्रमणच्या नावाखाली विशेष करून मुस्लिम समाजाच्या धार्मिक स्थळांना (मस्जिद, दर्गा) व धार्मिक पुस्तके (पवित्र कुराण) यांची विटंबना करण्यात आली. तसेच विशेष करून मुस्लिम समाजाचे घरांना टार्गेट करण्यात आले. या झालेल्या भ्याड हल्ल्याचा जाहीर निषेध अल्पसंख्यांक विकास व हक्क फाऊंडेशनच्या वतीने करण्यात येत आहे.
मागण्या…
१. UAPA कायदे अंतर्गत हलेखोरांवर कडक कारवाई करण्यात यावी.
२ . संबंधित निष्क्रिय पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यावर तात्काळ निलंबन करण्यात यावे.
३. झालेल्या हल्ल्यामध्ये धार्मिक स्थळे व मुस्लिम समाजाचे घराची शासनाने नुकसान भरपाई देण्यात यावी.
४. हल्ल्यामध्ये जखमी झालेल्या प्रत्येकी ५ लाख रुपये सरकार तर्फे देण्यात यावे.
५. मुस्लिम समाजासाठी संरक्षण कायदे तात्काळ विशेष अधिवेशन बोलावून तात्काळ पारित करण्यात यावे.
६. भविष्यात अशा घटना घडू नयेत याची खबरदारी घ्यावी.
७. या सर्व घटनेची सखोल चौकशी CBI/ विशेष न्यायाधीश मार्फत करण्यात यावी जो कोणी दोषी असेल त्यांना कठोर शिक्षा होईल याची खात्री मुस्लिम समाजाला द्या.
जर हे मागण्या मान्य झाल्या नाही तर शिरपूर अल्पसंख्यांक विकास व हक्क फाऊंडेशन लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन करेल