धुळे स्थानिक गुन्हे शाखा कडून अवघ्या २४ तासांत दोन घरफोडी उघड; दोन सराईत आरोपी मुद्देमालासह जेरबंद….

धुळे स्थानिक गुन्हे शाखा कडून अवघ्या २४ तासांत दोन घरफोडी उघड; दोन सराईत आरोपी मुद्देमालासह जेरबंद….

धुळे || दि. १९ फेब्रुवारी २०२६ || (समीर शेख)-: धुळे शहरात अवघ्या २४ तासांच्या आत दोन घरफोडीचे गुन्हे उघड करत आझादनगर पोलीस ठाणे हद्दीतील प्रकरणांमध्ये दोन सराईत गुन्हेगारांना मुद्देमालासह जेरबंद करण्यात स्थानिक गुन्हे शाखेला यश आले आहे.

दि. 14 फेब्रुवारी 2026 रोजी सकाळी 11.00 ते दि. 17 फेब्रुवारी 2026 रोजी सकाळी 06.00 या कालावधीत धुळे शहरातील अभय कॉलेजजवळील रामनगर, प्लॉट क्र. 31 येथून अज्ञात चोरट्यांनी 45,950 रुपयांचे सोने-चांदीचे दागिने, इन्व्हर्टर व बॅटरी चोरी केली होती. याप्रकरणी गु.र.नं. 22/2026 भा.न्या.सं. कलम 305, 331(3), 331(4) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.

तसेच दि. 15 फेब्रुवारी 2026 रोजी दुपारी 12.00 ते दि. 17 फेब्रुवारी 2026 रोजी सकाळी 05.15 दरम्यान मनोहर टॉकीज मागील अमरनगर परिसरातील फिर्यादी पंकज मेकले यांच्या राहत्या घरातून 96,000 रुपयांचे सोने-चांदीचे दागिने व रोख रक्कम चोरीला गेली होती. या प्रकरणी गु.र.नं. 23/2026 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.

घटनेची माहिती मिळताच स्थानिक गुन्हे शाखेचे प्रभारी अधिकारी व पथकाने घटनास्थळी भेट देऊन परिस्थितीजन्य पुरावे आणि गोपनीय माहितीच्या आधारे तपास सुरू केला. तपासात रेहान उर्फ पोपण्या फरीद पठाण (वय 20, रा. अंबिकानगर, धुळे) व शाहरुख शेख सलीम (वय 20, रा. अंबिकानगर, धुळे) यांनी हे गुन्हे केल्याचे निष्पन्न झाले.

दोन्ही आरोपींना कॉटन मार्केट यार्ड परिसरातून ताब्यात घेऊन सखोल चौकशी केली असता त्यांनी गुन्ह्यांची कबुली दिली. त्यांच्याकडून एकूण सुमारे 90,500 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून त्यामध्ये सोने-चांदीचे दागिने, इन्व्हर्टर-बॅटरी तसेच 30,000 रुपये किमतीची हिरो पॅशन प्रो (क्र. MH-18/BB-0716) मोटारसायकलचा समावेश आहे.

या कारवाईमुळे दोन्ही घरफोडीचे गुन्हे उघडकीस आले असून पुढील तपास सुरू आहे.
ही कामगिरी पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे व अपर पोलीस अधीक्षक अजय देवरे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्रीराम पवार, सपोनि नामदेव सहारे तसेच पथकातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी यशस्वीरीत्या पार पाडली.

Call Us